ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चणा कोळीवाडा खायला सर्वांनाच आवडतो. तुम्ही घरीच अवघ्या १० मिनिटांत चना कोळीवाडा बनवू शकतात.
चणा कोळीवाडा बनवण्यासाठी सर्वात आधी काबूली चणे रात्रभर भिजवत ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये टाकून शिजवा.
चणे शिजवताना त्यात मीठ टाका. यानंतर एका भांड्यात कॉर्न फ्लोअर आणि तांदळाचे पीठ घ्या.
त्यात लाल तिखट, गरम मसाला, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉर आणि फूड कलर टाका.
या सर्वांची मस्त पेस्ट बनवा. यात शिजवलेले चणे मस्त मिक्स करा.
यानंतर तेल चांगले तापत ठेवा. त्यात हलक्या हाताने हे चणे टाका. त्यानंतर अर्धवट फोडून लसुणदेखील तळून घ्या.
यानंतर लसूण आणि चणे मस्त मिक्स करा. तुमचे हॉटेल स्टाईल चणा कोळीवाडा तयार आहे.
हा चणा कोळीवाडा तुम्ही कोणतीही चटणी, शेजवान चटणीसोबत खाऊ शकतात.