Tanvi Pol
कढईत थोडं तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग आणि हळद टाका.
त्यात चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
हवं असल्यास थोडासा लसूण-आद्रक पेस्ट घालू शकता.
नंतर लाल तिखट, धने-जिरं पावडर, मीठ टाकून चांगलं परतून घ्या.
तयार मसाल्यात थोडं पाणी घालून उकळा आणा.
पापडाचे तुकडे करून त्यात घालावेत
झाकण ठेवून २-३ मिनिटं वाफ आणा अन् तयार झाली चविष्ट पापडाची भाजी