Shreya Maskar
कोल्हापुरी मिसळ बनवण्यासाठी मटकी, तेल, कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, हळद, लाल तिखट, गरम मसाला, कोथिंबीर, फरसाण आणि पाव इत्यादी साहित्य लागते.
कोल्हापुरी मिसळ बनवण्यासाठी सर्वप्रथम मटकीला स्वच्छ धुवून शिजवून घ्या.
मटकी शिजवताना त्यात पाणी आणि हळद टाका.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, हळद आणि लाल तिखट घालून छान परतून घ्या.
मिश्रणाला एक उकळी आल्यावर त्यात मटकी मिक्स करा.
आता यात गरम मसाला आणि कोथिंबीर घालून मिसळ एकजीव करा.
एका बाऊलमध्ये मटकीची मिसळ कांदा, फरसाण, कोथिंबीर मिक्स करून वरून लिंबाचा रस पिळा.
गरमागरम कोल्हापुरी मिसळचा बटर पावसोबत आस्वाद घ्या.