Maharashtra News : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक! पुणे नाशिक महामार्ग रोखला, तरुणाचा विषारी औषध पिण्याचा प्रयत्न

Maharashtra Onion Farmers Protest News : कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने मंचर येथे शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखून आंदोलन केले. अनेक मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले असून सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
ONION FARMERS BLOCK PUNE-NASHIK HIGHWAY AT MANCHAR DEMANDING MSP AND NAFED PROCUREMENT
ONION FARMERS BLOCK PUNE-NASHIK HIGHWAY AT MANCHAR DEMANDING MSP AND NAFED PROCUREMENTSaam Tv
Published On
Summary
  • मंचर येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन

  • शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरला

  • विविध मागण्या मांडल्या

  • शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

रोहिदास गडगे, पुणे

राज्यात सतत बदलणाऱ्या हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अवकाळी पाऊस, वाढतं तापमान या संकटांनी बळी राजा हवालदिल झाला आहे. यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. पिकांना योग्य भाव नाही,त्यामुळे आता जगायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आला आहे. विविध मागण्यांसाठी आज शेतकऱ्यांनी मंचर येथे पुणे-नाशिक महामार्ग रोखून जोरदार आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान एका तरुणाने विषारी बॉटल उघडून औषध पिण्याचा प्रयत्न केला, मात्र तो थोडक्यात टळला

सध्या कांद्याला मिळणारा दर अत्यंत कमी असून उत्पादनासाठी केलेला खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतीसाठी केलेली गुंतवणूक परत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मंचरमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र आले आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मांडल्या.

ONION FARMERS BLOCK PUNE-NASHIK HIGHWAY AT MANCHAR DEMANDING MSP AND NAFED PROCUREMENT
Weather Update : पुढील ४८ तासांत केरळमध्ये मान्सून, महाराष्ट्रात वादळी पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेले अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनीही सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून शेतकऱ्यांचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी हितासाठी दिल्लीपासून राज्य स्तरापर्यंत अनेक बैठका झाल्या, मात्र त्यातून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले,"लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोचवणे ही आमची जबाबदारी आहे . सरकारने ही परिस्थिती गांभीर्याने घेत तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले."

आंदोलनादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. एका तरुणाने स्टेजवरच खिशातून औषधाची बाटली काढून ती पिण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने हस्तक्षेप केला आणि त्याला रोखले. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. या घटनेमुळे सभास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com