

- बालाजी सुरवसे
Dharashiv News : शेतीचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु नुकसान भरपाईसाठी नावे वगळल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले. या शेतक-यांनी त्यांची व्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपूढे मांडली. या प्रश्नावर ताे़डगा काढावा या मागणीसाठी आज (मंगळवार) मनसेने कळंब-ढोकी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. (Maharashtra News)
धाराशिव जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतक-यांच्या प्रश्नावर आक्रमक झाली आहे. त्यातूनच आज मनसेने कळंब ढोकी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मनसैनिकांनी सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मनसे पदाधिकारी म्हणाले धाराशिव जिल्ह्यात शेती पिकांचे नुकसान होऊन देखील पिक विम्याच्या अग्रीम नुकसान भरपाईसाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणातून अनेक मंडळांना वगळण्यात आले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
पुढील आठ दिवसांत गोविंदपुर महसूल मंडळाचा समावेश करा अन्यथा पिकविमा कंपनीची कार्यालये फोडु असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला. दरम्यान मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रस्ता अडवल्याने कळंब ढोकी महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.