Gokul Dudh Sangh : 'गोकुळ' ला उच्च न्यायालयाचा दणका, आजपासून सभासदांना भेटणार : शाैमिका महाडिक (पाहा व्हिडिओ)

Shoumika Mahadik News : प्रत्येक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी गोकुळला पुरेसा वेळ दिला मात्र गोकुळने प्रतिसाद दिला नाही असे महाडिक यांनी नमूद केले.
Shoumika Amal Mahadik, Gokul Dudh Sangh, Kolhapur
Shoumika Amal Mahadik, Gokul Dudh Sangh, Kolhapursaam tv

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : गोकुळ दूध संघाच्या (gokul dudh sangh latest marathi news) चाचणी लेखापरीक्षणाला स्थगिती मिळावी यासाठी गाेकुळ दूध संघाने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याची माहिती संचालिका शाैमिका महाडिक (Shoumika Mahadik Addressed Media In Kolhapur) यांनी आज (मंगळवार) काेल्हापूरात माध्यमांशी बाेलताना दिली. दरम्यान गाेकुळच्या सभासदांची जागृती करण्यासाठी आजपासून काेल्हापूर दाैरा करणार असल्याचेही महाडिक यांनी नमूद केले (Maharashtra News)

Shoumika Amal Mahadik, Gokul Dudh Sangh, Kolhapur
Jejuri Khandoba Mandir : खंडोबारायाच्या दर्शनासाठी जेजुरीला निघालात? भाविकांसाठी असे असेल बंधन

सत्तांतर झाल्यानंतर गाेकुळ मध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप शाैमिका महाडिक यांनी केला. त्या म्हणाल्या गोकुळचे लेखापरीक्षण करावं अशी राज्य शासनाकडे मागणी केली होती. पाच महिने लेखापरीक्षण सुरू झालं. दरम्यान या लेखापरीक्षणा विरोधात गोकुळ हायकोर्टात गेलं. लेखापरीक्षण थांबवावं अशी मागणी गोकुळची होती.

Shoumika Amal Mahadik, Gokul Dudh Sangh, Kolhapur
Mumbai Ahmedabad National Highway Traffic Update: ट्रकने घेतला पेट, गुजरातकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतुक खाेळंबली

लेखापरीक्षण रद्द झालं तर पुढे होणारी कारवाई टाळता येईल अशी गोकुळची नीती होती असेही महाडिक यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या गोकुळच्या कारभारात गैरकृती आढळल्या, दोष दुरुस्ती ऑडिटमध्ये सुद्धा आहेत. समाधानकारक माहिती न मिळाल्यामुळे आम्ही कोर्टात गेलो. प्रत्यक्षात वेगळी कृती आणि कागदावर वेगळी मांडणी दिसून आली. त्यामुळे लेखापरीक्षण सुरू झाले.

लेखापरीक्षणाबाबत 7 दिवसांची गोकुळात नोटीस देण्यात आली होती. प्रत्येक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी गोकुळला पुरेसा वेळ दिला मात्र गोकुळने प्रतिसाद दिला नाही. लेखा परीक्षण विरोधात गोकुळ कोर्टात गेलं. न्यायालयाने गोकुळची याचिका फेटाळलेली आहे असे महाडिक यांनी नमूद केले.

Shoumika Amal Mahadik, Gokul Dudh Sangh, Kolhapur
Loksabha Election 2024: आनंदित झालेल्या शरद पवारांनी शाहू महाराज यांच्या लाेकसभेच्या तिकिटाविषयी स्पष्ट सांगितलं (पाहा व्हिडिओ)

आजपासून काेल्हापूर दाैरा : शाैमिका महाडिक

शाैमिका महाडिक म्हणाल्या गोकुळ दूध संघाची सभा येत्या 15 सप्टेंबरला आहे. या सभेत गोकुळ मध्ये सुरु असलेल्या गैरकारभाराविषयी जाब आम्ही विचारणार आहाेत. याबराेबरच घटलेले दूध संकलन, कर्मचाऱ्यांना होणारी मारहाण यासह विविध प्रश्नांचा त्यात समावेश असेल असेही महाडिक यांनी नमूद केले. त्यापूर्वी सभासदांमध्ये जागृती करण्यासाठी आजपासून कोल्हापूर जिल्हा दौरा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com