Maharashtra News Live Update: नवी मुंबईतील बेलापूर येथील इन्कम टॅक्स कॉलनीत पाणी साचले; नागरिकांचे हाल

Marathi Breaking Live Headlines Updates : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, ठाणे-नवी मुंबईत शाळांना सुट्टी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam TV Marathi
Published On

नवी मुंबईतील बेलापूर येथील इन्कम टॅक्स कॉलनीत पाणी साचले; नागरिकांचे हाल

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील बेलापूर येथील इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कॉलनीतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने स्थानिक रहिवासी तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने पादचाऱ्यांची तसेच वाहनचालकांची गैरसोय झाली आहे. पाण्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला असून नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने पाण्याचा निचरा करण्याची आणि आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ, पूल गेला वाहून

गेल्या दोन तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवर भडगाव येथे नवीन पुलाचे काम चालू होते. नागरिकांच्या सोयीसाठी वाहतुकीकरिता एक पर्यायी पूल केला होता. परंतु नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढत चालल्यामुळे पर्यायी पुलाचा काही भाग शुक्रवारी खचला होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यायी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली होती.

इंगळून घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू, प्रशासन सतर्क

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, इंगळून घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरडीमुळे दगड आणि माती रस्त्यावर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून, सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर पावशी घावनळे फाटा येथे कारचा अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर पावशी घावनळे फाटा येथे कारचा अपघात झाला. सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने भरधाव वेगात ही कार जात होती. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याची लेन निसरडी बनल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर चढून विरूद्ध बाजूच्या लेनवर उतरली. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. कारचे मात्र नुकसान झाले.

खोपोलीतील प्रसिद्ध झेनिथ धबधबा पाण्याच्या प्रवाहात अडकेलेल्या नागरिकांची सुटका

खोपोलीतील झेनीथ धबधबा येथे अडकलेल्या नागरिकांची विहारी ठाकूरवाडी ग्रामस्थांनी मदत करत पाण्याच्या प्रवाहातून सुखरूप बाहेर काढले.खोपोलितील झेनिथ धबधबा येथे अडकेलेले नागरिक यांना स्थानिकांनी जिवाची परवा न करता दोरीच्या माध्यमातून सुखरूप बाहेर काढले.

पुणे- सातारा महामार्गावरील देगांव फाट्याजवळ भरधाव कंटेनरचा अपघात

सुदैवाने अपघातात जीवितहानी नाही.. कंटेनर चालक किरकोळ जखमी,भरधाव कंटेनर साताऱ्याच्या दिशेने जात असताना पावसामुळं निसरड्या झालेल्या रस्त्यावर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यानं कंटेनर थेट दुभाजकाला धडकून पलटी झाल्याने हा अपघातात झाल्याची प्राथमिक माहिती..अपघातानंतर या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.. कंटेनर पलटी होऊन संपूर्ण महामार्गचं अडल्यानं वाहनांच्या जवळपास 2 ते 3 किलोमीटर लांब पर्यंत रांगा लागल्या होत्या..महामार्ग पोलीस आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेत.. वाहतूक सुरळीत करत कंटेनर क्रेनच्या साह्याने बाजूला केला..

रायगडच्या अंबा, कुंडलिका आणि पाताळ गंगा नदीने धोका पातळी ओलांडली

उत्तर रायगडला जोरदार पावसाने झोडपले

पेण, खोपोली, पाली परिसरात जोरदार पाऊस

रायगड जिल्‍ह्यात जोरदार पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला फटका

रायगड जिल्‍ह्यात जोरदार पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला फटका

० कर्नाळा खिंडी परिसरातील बांधणवाडी जवळचा रस्‍ता पाण्‍याखाली

० रस्‍त्‍यावरुन वाहत आहे गुडघाभर पाणी

० साचलेल्या पाण्यातुन मार्ग काढताना वाहन चालकांना करावी लागत आहे मोठी कसरत

TET पेपरफुटी प्रकरणी आणखी तिघांना अटक, आरोपींची संख्या 10 वर

TET पेपर फुटी प्रकरणी आणखी तिघांना आग्ऱ्याहून एका प्रिंटिंग प्रेसमधून ताब्यात घेवून अटक करण्यात आले आहे.संजयकुमार सुरेशचंद्र शर्मा(44),बाबुलाल नारायणसिंह कुशवाह (45), नरेशकुमार पुरनचंद माहौर उर्फ निकी (35) अशी आरोपींची नावे असून त्यांना आज एस एम सुतार यांच्या कोर्टात हजर केले असता तिघांनाही 9 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अमरावती शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती ते शेगाव नाका रोडवर वाहतूक कोंडी

अमरावती शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती ते शेगाव नाका रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी....

अनियंत्रित वाहतूक पुढे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी...

दोन किलोमीटर चा रस्ता पार करण्यासाठी 15 ते 20 मिनिटांचा लागतोय कालावधी.....

रस्त्यावर वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी..

मुंबई-गोवा महामार्गावरील उक्षी मार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उक्षी पुलाजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि चिखल उक्षी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर साचला आहे. त्यामुळे वाहतूक धोकादायक बनली असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्त्यावरील चिखल तातडीने हटवून संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करावे आणि पाण्याचा योग्य निचरा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे खोपोलीतील झेनित धबधबा पर्यटकांसाठी बंद

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा आणि मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन खोपोलीतील प्रसिद्ध झेनित धबधब्यावर पर्यटकांच्या प्रवेशास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. धबधब्यावरील वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि दरड कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. पर्यटकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि बंदीच्या काळात धबधब्याकडे जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा प्रवाहित; पर्यटकांची मोठी गर्दी

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूरजवळील प्रसिद्ध कोंडेश्वर धबधबा प्रवाहित झाला आहे. धबधब्याचे मनमोहक रूप पाहण्यासाठी शनिवार-रविवारच्या सुट्टीचा आनंद घेत पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. परिसरात उत्साहाचे वातावरण असून पर्यटक निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. मात्र, वाढलेला पाण्याचा प्रवाह लक्षात घेता प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

वसईच्या मधुबन टाऊनशिपमधील ठाकूर स्कूलमध्ये अडकलेल्या ४१ शिक्षकांची सुखरूप सुटका

वसईतील मधुबन टाऊनशिप परिसरातील ठाकूर स्कूलमध्ये सुमारे ४१ शिक्षक पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत अडकून पडले होते.

हे सर्व शिक्षक शाळेत गेले असताना परिसरात पाणी साचल्याने आणि पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही.

प्रशासन आणि बचाव पथकाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सर्व ४१ शिक्षकांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे वसई रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचविण्यात आले, जेथून ते आपल्या घरी रवाना झाले.

या यशस्वी बचाव मोहिमेमुळे शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला असून प्रशासनाने नागरिकांना अतिवृष्टीदरम्यान आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

परभणीत 7 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा

परभणीत येत्या ७ जुलै रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आला आहे या मेळाव्याची माहिती खासदार संजय जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शिंदे खासदार संजय जाधव यांनी शिंदे सेनेत पक्षप्रवेशानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परभणीत होणारा या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत श्रीकांत शिंदे ही उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे परभणी शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम येथे हा शेतकरी संवाद मेळावा पार पडणार असून या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे,

पुणे शहरात पावसामुळे झाडपडीच्या २९ घटना

वाहनांचे नुकसान,सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

शहरात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध भागांत झाडे व झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

काल सकाळी सात वाजल्यापासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत शहरात झाडपडीच्या एकूण २९ घटना घडल्या.

या सर्व घटनांवर अग्निशमन दलाने तातडीने प्रतिसाद देत मदत व बचावकार्य पूर्ण केले असून, कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही.

वसईच्या मोरी गावात पूराचा कहर; ७०-१०० नागरिकांची सुखरूप सुटका

वसईच्या ग्रामीण भागातील मोरी गावात पूरस्थितीमुळे अडकलेल्या सुमारे ७० ते १०० नागरिकांचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आणि नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याची पाहणी केली.

वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि वालीव पोलिसांनी संयुक्तपणे हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडले.

मुंबई पुणे महामार्गावर लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

मावळात सर्वात जास्त पाऊस बरसतो, लोणावळ्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार सुरुवात झाली असून पुणे मुंबई पर्यटकांची पाऊले लोणावळ्याकडे वळू लागली असून, विकएंड चं अवचित साधत पर्यटनासाठी पर्यटक लोणावळ्यात दाखल होऊ लागलेत, त्यामुळे पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने, जुना पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्यातील कुमार चौकात वाहनांची गर्दी पहायला मिळाली, वाहतूक कोंडी ही लोणावळाकर आणि पर्यटकांनसाठी डोकेदुखी ठरत आहे

नाणेघाटात पर्यटकांची गर्दी; स्वच्छतेसाठी वनविभागाकडून ‘उपद्रव शुल्क’

राज्यात मान्सूनने दमदार हजेरी लावल्यानंतर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक नाणेघाटात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. धुके, धबधबे आणि गारव्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दाखल होत असताना, वाढत्या पर्यटनामुळे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी वनविभाग आणि स्थानिक वनसमितीने ‘उपद्रव शुल्क’ आकारण्यास सुरुवात केली आहे.

मध्यप्रदेशच्या बैतूलमध्ये झालेल्या पावसामुळे तापी नदीला पूर

आणि हतनूर धरणाचे 22 दरवाजे 1 मीटरने उघडले

धरणातून 49 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे

धरण क्षेत्राच्या नदीकाठच्या गावांना सतर्क ते इशारा देण्यात आला आहे....

नदी आणि धरण क्षेत्रात न जाण्याचा प्रशासनाचा इशारा

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची सकाळपासून संतधार सुरु

पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ

राजापूरची कोदवली नदीच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ

असाच पाऊस पडत राहिला तर राजापूरच्या जवाहर चौकात शिरू शकते पाणी

कोदवली नदीची सध्याची पाणी पातळी २. ८५ मीटर इतकी

तर खेडची जगबुडी नदी देखील इशारा पातळीवर जगबुडी नदी ची सध्याची पाणी पातळी 5.40 मीटर

रत्नागिरी जिल्ह्याला सहा जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट

बदलापुरात जोरदार पावसाची हजेरी

कोसळणाऱ्या पावसामुळे बदलापुरातल्या जुवेली परिसरात कल्याण कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली गेलाय. या ठिकाणी पाणीच पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागतीय.

पावसाळी पर्यटनावर निर्बंध! रायगडमधील धबधबे आणि नदी परिसरात जाण्यास मनाई

रायगड जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन असलेल्या धबधबे, नद्यांचे ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जारी

माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हाणी घाट, कुंभे धबधबा परिसरात निर्बंध

० खोल, धोकादायक पाण्यात उतरणं, दारू पिऊन मौजमजा करणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यावर निर्बंध

सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी

सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे बेलापूर रस्त्यांवर महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी झाली आहे

मुंबई पुणे एक्सप्रेस वर वाहनांच्या रांगाचा रांगा

पुण्यात मुसळधार पावसाचा कहर! कादवे आणि पाबे घाटात दरड, झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

पुण्याच्या राजगड तालुक्यातील घाटमाथ्यांवर गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेल्या पावसानं, कादवे घाट आणि पाबे घाटातील रस्त्यावर दरड आणि झाड कोसळ्याची घटना

यामुळं कादवे घाट आणि पाबे घाटात रस्त्यावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती..

सार्वजनिक बांधकाम विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांतून दरड, आणि झाडं हटवून रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला..

दरम्यान, घाटमाथ्यांवरील सततचा पाऊस लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे..

घाटरस्त्यांवरून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा तसेच दरडग्रस्त किंवा धोकादायक ठिकाणी थांबून सेल्फी काढणे, व्हिडिओ चित्रीकरण करणे किंवा गर्दी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे..

तुर्भे एमआयडीसी पाण्याखाली

तुर्भे एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे वाहन चालक अडकून पडले आहेत तसेच गुडघा इतके पाणी मोठ्या प्रमाणात सासल्या असल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईवर हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे याचा आढावा घेतला.

बदलापुरात जोरदार पावसामुळे कात्रप भागातील रस्ता पाण्याखाली

गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने बदलापूर शहर आणि परिसराला पावसानं झोडपून काढलय. या मुसळधार पावसामुळे कल्याण-कर्जत महामार्गावरील कात्रप भागातील घोरपडे चौकातील रस्त्याला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलय.

अंबरनाथ पूर्वेतील पार्किंगच्या ठेकेदारांचे ठेके रद्द! 

अंबरनाथ नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि स्टेट बँकेसमोरील पार्किंगच्या ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याचा निर्णय अंबरनाथ नगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यानंतर सोमवारपासून पालिकेचे कर्मचारी हे पार्किंग ताब्यात घेणार असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत दिली.

पुणे-सोलापूर महामार्गावर टेम्पोला आग

पुणे-सोलापूर महामार्गालगत एका पंजाबी ढाब्याजवळ उभ्या असलेल्या मालवाहू टेम्पोला अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने विक्राळ रूप धारण केले आणि संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

पुण्यातील कोंढवा परिसरात मोठी वाहतूक कोंडी

रिमझिम पाऊस आणि कोंढवा परिसरात अनेक ठिकाणी रस्ते खोदल्याने कोंढव्यात प्रचंड वाहतूक कोंडी

गेल्या अर्धा तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा

१ तासांपासून स्थानिक नागरिक अडकले कोंढवा परिसरात झालेल्या वाहतूक कोंडीत

महानगरपालिकेच्या कामांमुळे रोज वाहतूक कोंडी होत असल्याचा स्थानिकांचा दावा

सिया गोयल हिचे तिच्या मैत्रीणसोबतचे चॅट व्हायरल

सिया गोयल हिचे स्नॅपचॅट वर असणारे मित्रासोबत चे संभाषण समोर

लग्नाबाबत सियाचे मैत्रणीसोबत स्नॅपचॅट वर महत्त्वाचं विधान

"तुझे आधार कार्ड पाठवून दे लग्नाचं तिकीट काढायचा आहे, लग्न होणार नाही तरीही तुझं तिकीट काढून ठेवते"

सिया गोयल हिचे तिच्या मित्रासोबत चे संभाषण समोर

समृद्धी महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट, समृद्धी महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक ठप्प

वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज मालेगाव जवळ धावत्या कारने पेट घेतल्याची घटना समोर आलीये.. कारने पेट घेतल्याचे लक्ष देतात कार लगेच रस्त्याच्या कडेला लावली.. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाणीच पाणी

नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून खारघर बेलापूर वाशी या ठिकाणी पाऊस जोरदार पडत आहे. तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुख्य प्रवेशद्वारामुळे पाणीच पाणी साचलं असल्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांना पाण्यातून मार्ग काढत बाहेर पडावा लागत आहे

उड्डाणपुलासह पाणीपुरवठा आणि आयटी पार्क, विमानसेवेचा विषय मुख्यमंत्र्यांकडून लागला मार्गी

सोलापूर शहरातील दोन उड्डाणपूल बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या पोस्ट आणि रेल्वे खात्याच्या तसेच राज्य शासनाच्या जागा पुढील १५ दिवसात ताब्यात घेऊन ऑगस्टपूर्वी वर्क ऑर्डर देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.तसेच शहराच्या अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी मंजूर झालेल्या १ हजार ४०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची निविदा १५ सप्टेंबर पर्यंत प्रकाशित करून ३० नोव्हेंबरच्या आत वर्क ऑर्डर काढण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

उत्तर पुण्यात मान्सून सक्रिय; संततधार पावसाने खरीप हंगामाला दिलासा

उत्तर पुणे जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. अखेर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून, खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांत संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

जालन्यातील अंबड वडीगोद्री रस्त्यावरील शहापूर परिसरात दोन एसटी बसची समोरासमोर धडक

अंबड -वडीगोद्री रोडवरील शहापूर परिसरात दोन बसमध्ये भीषण अपघात..

अपघातात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी असून बसमधील विद्यार्थ्यांसह 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहे..

मानव विकासची बस विद्यार्थ्यांना घेऊन भांबेरी येथून अंबडला जात असल्याची माहिती...

मानव विकासच्या बसमध्ये 25ते30 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती तर दुसऱ्या बसमध्ये बारा ते पंधरा प्रवासी असल्याची माहिती...

डोंबिवली बदलापूर रस्त्यावर साचले मोठ्या प्रमाणात पाणी

कल्याण डोंबिवली परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने डोंबिवली बदलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यात वाहन चालक आपल्या वाहना घेऊन जाताना दिसत आहेत. दोन दिवसापूर्वी या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात वेळ वाहनातून पोलिसांवर आली होती. पाऊस असाच सुरू राहिला तर पुन्हा या रस्त्यावर वाहतूक बंद करण्याची वेळ येऊ शकते. प्रशासनाकडून योग्य रित्या नाले सफाई झाली नसल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

अमरावती जिल्ह्यातील आजपासून शाळा सकाळच्या सत्रात

मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेसाठी बीएलओ म्हणून कार्यरत शिक्षकांना दुपारी २ नंतर कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ४ ते १९ जुलैदरम्यान जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे निर्देश शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिले आहेत. या कालावधीत बीएलओंनी दुपारनंतर घराघरांत जाऊन मतदार पडताळणी व माहिती संकलनाचे काम पूर्ण करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

घराशेजारी केली गांजाच्या झाडांची लागवड... पोलिसांनी छापा टाकत एकाला घेतले ताब्यात

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे.. सुरेगाव गावठाण येथे घराशेजारीच गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, कोपरगाव तालुका पोलिसांनी छापा टाकत तब्बल 22 किलो वजनाची गांजाची जीवंत झाडे जप्त केली आहेत

राऊतवाडीचा धबधबा प्रवाहित

वर्षा पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे कोल्हापूरचा प्रसिद्ध राऊतवाडी चा धबधबा सुरू झाला आहे राधानगरी तालुक्यातील हा धबधबा पर्यटकांचे नियमित आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो पावसाचे आगार समजले जाणाऱ्या राधानगरी मधला हा धबधबा 50 ते 60 फुटावरून कोसळतो. त्याचे विहंगम दृश्य पाहण्यासारखे असते. सध्या पावसाचा जोर वाढला असून हा धबधबा आता प्रवाहित झाला आहे. या धबधब्याचे तुषार अंगावर झेलत वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक येथे दाखल होतात .आता पर्यटकांची पावलं या धबधब्याकडे वळू लागले आहेत.

खांद्यावर नांगर ओढत तरुणांनी दिला वयोवृद्ध शेतकऱ्याला आधार...

धडगाव तालुक्यातील तोरणमाळ परिसरातील सिंदीदिगर ,पाटीलपाडा गावात ग्रामीण संस्कृतीतील सहकार्याचे एक अनोखे दर्शन घडले. येथील वयोवृद्ध शेतकरी सयदाम पावरा हे त्यांच्या तीन एकर कोरडवाहू शेतात बैलजोडीच्या साहाय्याने पेरणीपूर्व नांगरटी करत होते. यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे चिंतेत असलेले सयदाम हे पाऊस येण्याच्या आशेने एकटेच शेत तयार करण्यासाठी मेहनत घेत होते.

वसई विरार शहराला हवामान विभागाने आज दोन दिवशीय रेड अलर्ट जारी केला आहे

याच पार्श्वभूमीवर शहरात पावसाने दमदार हजेरी लावायला सुरुवात केली असून काळेकुट्ट ढगाळ निर्माण झाले आहेत

धो धो पडणाऱ्या पावसामुळे शहरातील साखळभाग जलमय झाले आहेत

पावसाचा जोर असाच कायम राहिला तर वसई विरार शहराचा संपर्क तुटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे

महाड तालुक्यात 20 गावांना आपत्ती विभागाकडून स्थलांतरित होण्याच्या सूचना

दरडी दुर्घटनेत जिवीत हानी टळावी यासाठी रायगडच्या आपत्ती व्यवस्थापनाने संभाव्य दरडग्रस्त गावांमधील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतराच्या सुचना दिल्या आहेत. यामध्ये महाड तालुक्यातील 72 गावे दरडप्रवन क्षेत्रात असून यांपैकी 20 गावे ही अतिधोकादायक परिस्थिती असल्याने येथील 1 हजार 146 नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खबरदारी म्हणून नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही दुर्घटना होऊ नये याकरिता अतिधोकादायक असलेल्या 20 गावांना नोटीस बजावण्यात सुरक्षित स्थळी जाण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

Maharashtra News Live Update:  पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट

पालघर _ पालघर जिल्ह्यात आज रेड अलर्ट. जिल्ह्यात आज आणि उद्या असे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता . खबरदारी म्हणून आज जिल्हा प्रशासनाकडून शाळा , महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर . जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यादेश काढत केली सुट्टी जाहीर.जिल्ह्यात आज पावसाचा जोर वाढणार . अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा जिल्हा प्रशासनाच नागरिकांना आवाहन . तर सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ. जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असून किनारपट्टी भागासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसह किनारपट्टीचा भाग असलेल्या वेंगुर्ला व मालवण तालुक्यातही आज पावसाचा जोर दिसून येत आहे. हवामान विभागाकडून आज आॅरेज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com