Maharashtra Weather News: मान्सूनची आनंदवार्ता, उकाड्यापासून मिळणार दिलासा; 'या' तारखेपर्यंत राज्यात मान्सून हजेरी लावणार

Maharashtra Rain News: मान्सूनची आनंदवार्ता समोर येत आहे. राज्यात १२ जूनपर्यंत मान्सून बरसणार असल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra Weather Report: मान्सूनची आनंदवार्ता, उकाड्यापासून मिळणार दिलासा; 'या' तारखेपर्यंत राज्यात मान्सून हजेरी लावणार
Maharashtra Rain Update Monsoon Will Enter On 12 June In MaharashtraSaam Tv
Published On

मागील काही दिवसांपासून राज्यात नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत. राज्यात मान्सून केव्हा हजेरी लावणार? हा प्रश्न सगळ्यांच्या ओठावर आहे. या संदर्भात मान्सूनची आनंदवार्ता समोर येत आहे. राज्यात १२ जूनपर्यंत मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती मिळत आहे. ही राज्यातील पावसासंदर्भात मोठी अपडेट आहे. सर्वजण वरूणराज्याच्या प्रतिक्षेत आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हालचालींवरून हे संकेत मिळत आहे. राज्यातील पावसासंदर्भात (Maharashtra Rain Update) ही आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे. १९ मेपर्यंत नैऋत्य मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. तर १९ मेपर्यंत मान्सून भारतात येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. यावरून महाराष्ट्रामध्ये मान्सून १२ जून रोजी दाखल होऊ शकतो, असा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. आता काही दिवसांतच राज्यात मान्सून (Rain Update) धडकणार आहे.

Maharashtra Weather Report: मान्सूनची आनंदवार्ता, उकाड्यापासून मिळणार दिलासा; 'या' तारखेपर्यंत राज्यात मान्सून हजेरी लावणार
Maharashtra Rain: वादळी वारे अन् तुफान गारपीट, पुणे- सातारा, सांगलीला अवकाळी पावसाने झोडपलं; पाहा VIDEO

बळीराजासाठी खुशखबर आहे. यंदा राज्यात मान्सून लवकर हजेरी लावणार आहे. ३० जून रोजी दिल्लीत तर त्याअगोदर १० जून रोजी चेन्नईमध्ये मान्सूनची शक्यता वर्तविली जात आहे. भारतात यंदा मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस (Maharashtra Monsoon Update) पडु शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आयएमडीने मे महिन्याच्या सुरुवातीला सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज देखील वर्तवला होता.

दक्षिणेकडील राज्य तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळमध्ये पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह (Monsoon Update) पाऊस सुरू राहु शकतो. बंगालच्या उपसागरामधून भारताकडे मान्सून सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लवकरच मान्सून राज्यात धडकणार आहे. यावर्षी जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभाग वर्तवित आहे. सध्या तरी राज्यात अवकाळीचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. गारपीट अन् वादळी वाऱ्याने नागरिकांची दाणादाण उडवून दिली आहे.

Maharashtra Weather Report: मान्सूनची आनंदवार्ता, उकाड्यापासून मिळणार दिलासा; 'या' तारखेपर्यंत राज्यात मान्सून हजेरी लावणार
Rain Alert : मुंबई, ठाण्यासह राज्यातील 'या' भागात कोसळणार तुफान पाऊस; IMD कडून अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com