Maharashtra Rain: वादळी वारे अन् तुफान गारपीट, पुणे- सातारा, सांगलीला अवकाळी पावसाने झोडपलं; पाहा VIDEO

Maharashtra Unseasonal Rain: या पावासामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. त्यामुळे बळीराज्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
Maharashtra Rain
Maharashtra RainSaam Tv

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या अवकाळी पाऊस (Unseasonal Rainfall) पडत आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. या पावसामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. या पावासामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. त्यामुळे बळीराज्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. राज्यात आज पावसाची काय परिस्थीती होती ते आपण जाणून घेणार आहोत...

रायगड -

रायगडला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. माथेरान परिसरात तुफान पाऊस पडत आहे. या ठिकाणी मुसळधार पावसासोबत गारा देखील पडल्या. उद्याही रायगडला हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

पुणे -

पुण्याच्या खेड तालुक्यातील पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या आवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे पाईट परिसरात पॉलिहाऊसची तीन शेड उद्धवस्त झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. उत्तर पुणे परिसरातील खेड, आंबेगाव, शिरुर तालुक्यात सलग तिस-या दिवशी आवकाळी पावसाने हजेरी लागली. या पावसामुळे उन्हाळी बाजरीचे नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बारामती -

बारामती शहरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

छत्रपती संभाजीनगर -

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज पुन्हा अवकाळी पाऊस झाला. कन्नड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत.

नागपूर -

नागपूरच्या नरखेड तालुक्यातील मोवाड येथे गारपिटसह जोरदार पाऊस झाला. याठिकाणी लहान आकाराच्या गारा देखील पडल्या. गारपिटीचा फटका फळबागांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणचे शेतकरी चिंतेत आले आहेत.

लातूर -

लातूरच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. निलंगा, शिरूर आणि ताजबंद भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले. या पावसामुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता.

चिपळून -

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे चिपळूण तालुक्यातील पेंढाबे गावात केळी बागेचे मोठे नुकसान झाले. संतोष शिंदे यांची ही केळीची बाग आहे. पाच एकरात त्यांनी २५ लाखांच्या केळीची लागवड केली होती. पण अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळीबाग जमीनदोस्त झाली. यामध्ये त्यांचे ८ लाखांचे नुकसान झाले आहे.

सातारा -

साताऱ्याच्या कराड तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. कालेगावच्या बाजारात या पावसामुळे पाणीच पाणी झाले होते. कराड- रत्नागिरी महामार्गावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वादळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

बीड -

बीडसह वडवणी आणि धारूर तालुक्यात अवकाळी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून फळबागांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान या पावसामुळे वातावरात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Rain
Maharashtra Weather News: पुढच्या ४८ तासांत या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com