MLC Election: जय पवारांना विधान परिषदेत पाठवा! आमदार मिटकरींचं सुनेत्रा पवारांना पत्र

Amol Mitkari On MLC Election : अमोल मिटकरी यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून जय पवार यांना विधान परिषदेत संधी देण्याची विनंती केली आहे. या घडामोडीमुळे महाराष्ट्रात नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.
Amol Mitkari On MLC Election
Amol Mitkari’s letter supporting Jay Pawar for Legislative Council seat creates political buzzsaam tv
Published On
Summary
  • अमोल मिटकरी यांनी सुनेत्रा पवारांना पत्र लिहिलं

  • जय पवार यांना विधान परिषदेत पाठवण्याची मागणी

  • अजित पवार गटातील नेतृत्व चर्चेला वेग

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महायुतीमधून अनेक नावांच्या चर्चा सुरू आहे. महायुतीमधून अजित पवार गटाला एक जागा सुटली आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. आगामी काळात पक्षवाढीसाठी अजितदादांचा वारसदार म्हणून जय पवार यांनाच संधी मिळावी, अशी उघड भूमिका मिटकरींनी मांडली आहे. जय पवार यांना विधान परिषदेत पाठवा अशी विनंती करणारे पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिले आहे.

विधान परिषदेच्या एका जागेसाठी नेते आणि कार्यकर्त्यांच्या जवळच्या लोकांची लॉबिंग सुरू आहे. त्याच दरम्यान मिटकरींनी थेट जय पवार यांचे नाव पुढे केले आहे. अमोल मिटकरींनी पक्ष अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यामुळे पक्षाच्या भविष्यातील बळकटीकरणाचा आणि विस्ताराचा विचार करून निर्ण घेणं आवश्यक आहे.

Amol Mitkari On MLC Election
Political News : शिवसेनेत पुन्हा बंडाळी? विधानपरिषद निवडणुकीसाठी ८ जणांची नावे चर्चेत, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार?

पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सक्षम, अभ्यासू, ऊर्जावान आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणारे नेतृत्त्व पुढे आलं पाहिजे. यापार्श्वभूमीवर आपण विधान परिषदेसाठी जय पवार यांचे नाव सुचवत असल्याचं म्हटलंय. जय पवार हे एक सक्षम, समर्पित आणि विश्वासार्ह नेतृत्तव म्हणून पुढे येत आहेत. त्यांच्या कार्यशैलीत सातत्य , संघटनात्मक समज आणि जनसंपर्क ताकद दिसून येते असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

Amol Mitkari On MLC Election
परभणीचे खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार? ठाकरे गटानं दिली महत्त्वाची अपडेट

अमोल मिटकरी यांनी ट्विटही केले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, "पक्षवाढीसाठी अजितदादांसारखा विश्वासू आणि युवा चेहरा पुढे आणण्याची गरज आहे. सध्या जय पवार हे नाव या जागेसाठी सर्वोत्तम आहे." कदाचित इतरांना ही घराणेशाही वाटेल, पण ते वाटू देत. अजितदादांनंतर भविष्यात हा चेहरा महाराष्ट्रासाठी आश्वासक वाटतो, असं मिटकरी ट्विटमध्ये म्हणाले आहेत. अजितदादांची उणीव भरून काढण्याची क्षमता असलेला जय पवार यांचा चेहरा राष्ट्रवादीसाठी 'संजीवनी' ठरेल," असा विश्वास मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. मिटकरींच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com