
बावनकुळे यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री माधुरी मिसाळ सुद्धा उपस्थितीत
भाजप नेत्यांकडून सदस्यता नोंदणीचा आढावा घेण्यात आलाय. पुणे शहरात गेल्या ४ दिवसात १ लाख सदस्यांची नोंदणी झालीय. भाजप नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.
सदस्यता नोंदणी वर भर देण्यासाठी नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
घाटकोपरच्या गरोडिया नगरमध्ये झाड अंगावर कोसळून एक महिलेचा मृत्यू झालाय. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मीनाक्षी शहा या ७२ वर्षीय महिलेचा यात मृत्यू झाला आहे, तर वंदना शहा या गंभीर जखमी असून राजवाडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गारोडीया नगर येथे गारोडीया नगर वेलफेयरचे एक गार्डन आहे. याच्या बाजूच्या सोसायटीमध्ये एक सुकलेले झाड होते. हे झाड आज संध्याकाळी या गार्डनमध्ये कोसळले. यावेळी इथे फिरण्यास आलेल्या दोन महिला या झाडाखाली आल्या. यात एका महिलेचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस आणि पालिका अधिकारी दाखल झाले असून पुढील चौकशी सुरू आहे.
कल्याण स्टेशन परिसरात पोलिसांनी छापा टाकलाय. वेशा व्यवसाय करणाऱ्या १३ महिलांची सुटका करण्यात आलीय. वेशा व्यवसायाला भाग पाडणाऱ्या चार दलालांना अटक देखील केलीय. दलालांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आलीय.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ( हॉल तिकीटे) शुक्रवारपासून (ता. १०) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या 'www.mahahsscboard.in ' या संकेतस्थळावरून शुकवारपासून ऍडमिट कार्ड लिंकद्वारे डाऊनलोड करता येणार आहेत.
भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत मस्के यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. तर आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे असणारे जिल्हाध्यक्ष पद आता राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. खासदार शरद पवार, जयंत पाटील यांच्या हस्ते आज मस्के यांना त्यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये मुलींचे घटते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. गर्भलिंग चाचणी करणे हा कायद्याने गुन्हा आहे मात्र काही असमाजिक घटक, व्यक्ती हे चालत्या ट्रॅक्टर, ट्रक कारमध्ये गर्भलिंग चाचणी करत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. या घटनांना आळा घालणं अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टोल फ्री क्रमांक देण्यात आलाय तर अशा घटना लक्षात येतात सुजाण नागरिक म्हणून सर्वांनी त्या आमच्यापर्यंत पोहोचावाव्या, नाव गुपित ठेवण्यात येईल आणि माहिती देणाऱ्याला रोख इनाम देखील देण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला. कॅबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर असल्याचं हायकोर्टाने म्हटलंय.
सांगलीच्या कुरळप मध्ये 10 ते 15 एकर ऊस आग लागून जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन आणि शेतकऱ्याचे विहिरीवरील सोलर सेट जळाला आहे. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाळवा तालुक्यातील कुरळप येथील बाबुराव धोंडीराम कुंभार या शेतकऱ्याचा ऊस गेल्या महिन्यांपूर्वी कारखान्याला गेला होता.
ते आज सकाळी उसातील पाचट पेटवण्यासाठी शेतात गेले. फडातील पाचट पेटवला आणि वाऱ्याने पाचट शेजारील ऊसाला लागल्याने आग लागली. आणि पाहता पाहता आग मोठ्या प्रमाणात पसरली. आणि आजूबाजूच्या शेतातील जवळपास 10 ते 15 एकर उभा असलेला ऊस जळून खाक झाला.
वाईच्या एमआयडीसीत श्रीनिवास मंगल कार्यालया शेजारी असणाऱ्या एटीएम वर अज्ञात चोरट्यांच्या टोळीने कटरच्या साह्याने तोडफोड करून त्यातील १७ लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे.या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
नागपूर पोलिसांनी मागील काही दिवसात जप्त 400 पेक्षा जास्त सायलेन्सर चालवणार रोडरोलर..
मॉडीफाईद सायलेन्सर लावत फटाके फोडणारे तसेच कर्कश आवाज करणारे आणि दुचाकी वाहन चालवणाऱ्यावर कारवाई केली. या करवाईतून जप्त करण्यात सायलेन्सरवर रोडरोलर चालवले जाणार आहे...
यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल आणि वाहतूक पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांच्यासह वाहतूक विभागाचे सर्व पोलीस अधिकारी उपस्थित असणार आहे...
- अॅपल कंपनीचे बनावट मोबाईलचे स्पेअर पार्ट विकणाऱ्या दुकानांवर नाशिक पोलिसांचा छापा
- नाशिकच्या एमजी रोड परिसरात असलेल्या मोबाईल दुकानांमध्ये पोलिसांचा छापा
- एप्पल कंपनीचे बनावट मोबाईल पार्ट ओरिजनल सांगून ग्राहकांची सर्रासपणे होत होती लूट...
- पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर...
- ग्राहकांच्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांची मोठी कारवाई...
जालन्यात एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभाग सज्ज.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि शिंकणे टाळावे तसाच नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आरोग्य विभागाचे आवाहन.
जिल्हयातील सर्दी ,ताप आणि खोकला या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना सूचना
तीन एजन्सी चौकशी करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
चौकशीत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल.
कोणालाही सोडणार नाही. दोषींना पाठीशी घालणार नाही. तुम्ही काळजी करु नका.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संतोष देशमुख हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया
एप्पल कंपनीचे बनावट मोबाईलचे स्पेअर पार्ट विकणाऱ्या दुकानांवर नाशिक पोलिसांचा छापा...
नाशिकच्या एमजी रोड परिसरात असलेल्या मोबाईल दुकानांमध्ये पोलिसांचा छापा
एप्पल कंपनीचे बनावट मोबाईल पार्ट ओरिजनल सांगून ग्राहकांची सर्रासपणे होत होती लूट...
पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर...
ग्राहकांच्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांची मोठी कारवाई...
ट्रॅक्टर, ट्रक, कारमध्ये गर्भलिंग चाचणी करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम
गर्भलिंग चाचणी माहिती देणाऱ्याला इनाम म्हणून रोख रक्कम
गर्भ लिंक चाचणी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
उच्य न्यायालयातील सुनावणीला थोड्याच वेळात होणार सुरुवात
याचिकाकर्ते सुनील मोदी ऑनलाईन कामकाजात सहभागी झाले
न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात...
न्यायाधीश बोरकर आणि उपाध्याय निकलाच वचन करणार
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी सरपंच संघटनेच्या वतीने पुकारलेल्या बंद ला धाराशिव जिल्ह्यातील सरपंचानी उत्स्फुर्त प्रतिसाद देत कामकाज बंद ठेवत ग्रामपंचायत कार्यालय देखील बंद ठेवले दरम्यान मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरपंच व सदस्यांनी केलीय.
सोलापुरात तब्बल 10.83 कोटींची जीएसटी बुडावणाऱ्या दोन व्यापारी भावांना सोलापूर जीएसटी विभागाने अटक केलीय.
या व्यापाऱ्यांनी 69.35 कोटी रुपयांच्या उलाढालीत तब्बल 10.83 कोटींची अनियमितता केल्याचे उघड झाले आहे.
त्यांनी खोटी खरेदी दाखवत जीएसटी बुडवला.या प्रकरणी एसआरएल ऑइल इंडिया प्रा. लिमिटेडच्या दोन भावांना अटक करण्यात आली आहे.
श्रीकांत लड्डा आणि लक्ष्मीकांत लड्डा अशी या व्यापारी भावंडांची नावे आहेत.
काल दिवसभर ही कारवाई सुरु होती. या दोन्ही व्यापाऱ्यांची 20 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठाडीत रवानगी करण्यात आली आहे.
सावरगावतळ गावातील श्री श्री रवीशंकर इंग्लिश स्कुलच्या बसला आज सकाळी अपघात झाला..
चालकाच्या बेजबाबदार पणामुळे अनेकांना जिव गमवावा लागला असता..
चालक मोबाईलवर बोलत असताना नियंत्रण सुटले आणि बस विजेच्या खांबाला धडकून पलटी झाल्याची प्राथमिक माहीती आहे..
शाळा व्यवस्थापन मुलांची ने आण करण्यासाठी चक्क खाजगी बस वापरत असून नियमांची पायमल्ली करत असतानाही शिक्षण प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत असल्याचं चित्र आहे..
आज सुदैवाने मुलांचा जिव वाचलाय मात्र शाळा व्यवस्थापनासह बसचालकावर कारवाई होणं गरजेचं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला भाजप लागली कामाला
आज रात्री उशिरा चंद्रशेखर बावनकुळे घेणार भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा घेणार आढावा
पुणे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू
सदस्यता नोंदणीचा चंद्रशेखर बावनकुळे घेणार आढावा
नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांनी एका बाईक चोराकडून तब्बल तब्बल 20 मोटारसायकल हस्तगत केल्यात....
- नवीन रासा असं ह्या आरोपीच्या नाव आहे.. तो चंद्रपूरवरून नागपूरला येत. गर्दीच्या ठिकाणची पार्किंग बघायचा आणि मास्टर की लावून पसार होत होता..
- ओळखीच्या लोकांना बाईक स्वस्तात विकायचा....हा त्याचा क्रम अनेक दिवसांपासून सुरू होता..मात्र एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आणि सगळं बिंग फुटलं...
- त्याने विकलेल्या सगळ्या बाईक जप्त करत त्याच्या मूड मालकांना द्यायला पोलिसांनी सुरुवात केली आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञ महोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली तसेच देवीला शिवकालीन दागिन्यांनी मडवण्यात आले तर तुळजाभवानी मातेने दैत्याचा वघ केल्यानंतर सर्व देव,देवता दैत्याच्या त्रासातून मुक्त झाल्या त्याप्रसंगी श्रीकृष्णाने आपली मुरली श्री देवीस अर्पण केली त्यामुळे मुरली अलंकार महापूजा बांधली जाते अशी अख्यायिका सांगितली जाते.
- नायलॉन मांजाने 25 वर्षीय मुलाचा गळा कापला
- 25 वर्षीय मुशरन सय्यद गंभीर जखमी
- मुशरनच्या गळ्यावर पडले तब्बल 75 टाके
- खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू
- वडाळा नाका परिसरातील घटना
HMPV विषाणू बाबत अजित पवार यांनी आढावा घेतला. आरोग्य प्रमुख डॉ नीना बोराडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती दिली. महापालिका सतर्कता घेत आहे.
नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी रस्त्याचे काम सध्या सुरू आहे.पण या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता हाताने देखील उखडता येत आहे.डांबरी रस्ता बनवलेला या गावकऱ्यांनी उखडून दाखवत संताप व्यक्त केला. हाताने डांबरी रस्ता उखडत असल्याने या रस्त्याचा दर्जा उघड झाला आहे.गुत्तेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा बोरगडी गावकऱ्यांनी निषेध केला.
आरोग्य विभागाची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. HMPV या संसर्गाच्या अनुषंगाने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी,सर्दी ताप खोकला आल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी, नागरिकांनी घाबरून जाऊ नये,मात्र काळजी घ्या असे सांगण्यात आलेय.
मोक्कामध्ये येरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल उर्फ गुड्या गणेश कसबे हा २ दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सुमारे ५०-६० समर्थकांनी येरवडा बाजार परिसरात आलिशान कारमधून रॅली काढली. रॅलीचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. परिसरातील नागरिकांना रॅलीमधील युवकांनी धमकावले होते असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे. आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली. व्हिडिओ आणि घडलेल्या प्रकाराबाबत नागरिकांनी लक्ष्मीनगर (शास्त्रीनगर) पोलीस चौकीमध्ये माहिती दिली पण कारवाई झाली नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली अथवा नाही ही गोष्ट सोडली तर मोक्कातील आरोपीने येरवडा जेलमधून बाहेर आल्यानंतर रॅली काढली हे मात्र व्हिडिओ वरून स्पष्ट झाले आहे.
एप्रिल ते डिसेंबर 2024 या नऊ महिन्यांत महावितरणकडून वर्धा जिल्ह्यातील 826 ठिकाणी थेट वीजचोरी करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. सोबतच प्रत्यक्ष कारणाव्यतिरिक्त इतर कारणासाठी अथवा अप्रत्यक्ष वीज वापर करणाऱ्या ४४ ग्राहकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूकही झाली. पण लोकसभा निवडणुकीचे कामकाज केलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भत्ता देण्यात आलेला नाही.हा भत्ता तात्काळ कर्मचाऱ्यांना वितरित करावा आणि तलाठ्यांना लॅपटॉप, स्कॅनर व प्रिंटर द्यावा, साझा पुनर्रचनेनुसार साझा फोड करणे सह ग्राम महसूल अधिकारी यांची सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करावी या मागण्यांसाठी ग्राममहसूल अधिकारी आणि मंडल अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तलाठ्याच्या आंदोलनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांमधून त्रिव्र नाराजी व्यक्त होत आहे. तलाठ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे शेतकऱ्यांची अनेक कामे अडली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन मार्ग काढावा अश्या मागणीचे निवेदन उत्तर सोलापूर तालुक्यातील तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक..
तर धस समर्थकांचे आंदोलन मागे..
पाटोदा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू..
वंजारी समाजाविषयी आणि धनंजय मुंडे यांच्या विषयीची चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटलांवर 353( 2 ) नुसार गुन्हा दाखल करावा
त्याचबरोबर वंजारी समाजाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी, अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करावा..
या प्रमुख मागण्यांसाठी पाटोदा पोलीस ठाण्याच्या दारात ठिय्या आंदोलन सु
शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जवळ अज्ञात व्यक्तीं कडून हवेत गोळीबार
एका खून प्रकरणातील संशयित आरोपी च्या घरासमोर हा गोळीबार करण्यात आला आहे...
दहशत निर्माण करण्यासाठी पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे...*
- गोळीबार करून संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार होताना सीसीटीव्हीत कैद.....
- *पोलिसांनी संशोध आरोपींच्या घराची झडती घेतली असता त्या ठिकाणाहून घातक हत्यारे तसेच जिवंत काडतुस पोलिसांचा दावा
- पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून पुढील तपास चाळीसगाव पोलीस करत आहे....
बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट हाती येत आहे... बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.. तर पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालंय.. गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरतंय.. खारपाण पट्ट्यातील या गावात पिण्याची पाण्याची वेगळी सोय केलेली आहे, मात्र वापरण्याच्या पाण्यात नाइट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य देखील नसल्याचं धक्कादायक वात्सव समोर आल आहे... पाणी तपासणीचा अहवाल साम टीव्ही हाती लागलाय..
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभरातील ग्रामपंचायतींनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. नांदेड जिल्ह्यात देखील या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळतोय.नांदेड जिल्ह्याती सर्वच ग्रामपंचायती या काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे.असून सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फ़ाशी देण्यात यावी अशी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आलीय.
- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभर ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन
- अखिल भारतीय सरपंच परिषदेच्यावतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव ग्रामपंचायतीचे काम बंद आंदोलनाला सुरुवात
- संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, देशमुख कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीत समाविष्ट करावे.
- त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांना संरक्षण कायदा लागू करावा यासह विविध मागण्या करत काम बंद आंदोलन सुरू
पावसामुळे यंदा तिळाच्या उत्पादनावर परिणाम झाला असताना ब्राझील आणि आफ्रिकेतून तिळाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी घट झाली आहे.
बनावट चावीने चोरलेली वाहने कर्नाटकात नेऊन विकणारी आंतरराज्य टोळी कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केली आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील दोन सराईत वाहन चोरट्यांसह कर्नाटकातील तिघांकडून चोरीतील 3 ट्रक, 3 कार, 1 बोलेरो पिकप आणि 5 दुचाकी अशी 60 लाख 12 हजारांची वाहने जप्त केली आहेत. या टोळीकडून महाराष्ट्रातील आणखीन काही गुन्हे उघडतील येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून वाहन चोरीतील ही सराईत टोळीवर महाराष्ट्रासह कर्नाटकात गुन्हे दाखल आहेत. ही टोळी चेसिस आणि नंबर प्लेट बदलून गाड्यांची विक्री करत असल्याचं तपासात समोर आले..
अहिल्यानगर जिल्ह्यातील 1316 ग्रामपंचायतींनी घेतला बंदमध्ये सहभाग...
सरपंच संतोष देशमुख हत्येचा निषेध करत आरोपींना कठोर शासन व्हावे याकरिता अखिल भारतीय सरपंच महासंघाच्या वतीने राज्यातील ग्रामपंचायतींना बंदच आवाहन...
अखिल भारतीय सरपंच महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय शेटे आणि उपाध्यक्ष बाळासाहेब जपे यांची माहिती...
हत्येत सहभागी असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा मिळावी याची मागणी करत ग्रामपंचायती आज बंद...
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांच्या खासदारांना फोन येत असल्याच बोललं जातं आहे.
यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही फोन करत नाही तर त्यांचे मिसकॉल पक्षाच्या अध्यक्ष अजित पवारांना येत आहे आणि त्यामुळे पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आम्ही येणाऱ्या लोकांचे स्वागत करू.
फक्त खासदारचं नाही तर आमदार देखील घड्याळ तेच मात्र वेळ नवीन या दृष्टीकोनातून यश पाहायला मिळणार असल्याचा टोला लागावत प्रतिक्रिया दिली आहे.
वाशिमच्या वनोजा येथील समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज वरील वळणावर मालवाहू कंटेनर पलटी झाला. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून, कंटेनरमधील सामानाचेही नुकसान झाले आहे. जखमी चालकाला तातडीने उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनास्थळी आपत्कालीन सेवा व पोलीस दाखल झाले असून, मार्गावर वाहतूक सुरळीत करण्यात आला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला संतोष देशमुख यांची कन्येसह मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, बजरंग सोनवणे आणि इतर नेते देखील उपस्थित राहणार आहे. शहरातील कावसाणकर मैदानाहून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा मोर्चा जाणार आहे. या ठिकाणी प्रमुख नेते मोर्चाला संबंधित करणार आहेत.
- नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा घसरला..
- अवघ्या 24 तासात पारा दोन अंशांनी खाली
- काल 12 अंशांपर्यंत होता पारा
- तर नाशिकमध्ये आज दहा अंश तापमानाची नोंद
- निफाडमध्ये पारा 6.8 अंशापर्यंत खाली घसरला
- उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र गारठले..
- पुढील काही दिवस थंडीचा पारा आणखी खाली येण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या १५७ उमेदवारांनी निकालावर आक्षेप घेत उच्च न्यायालयासह विविध खंडपीठांमध्ये याचिका दाखल केल्या आहेत. यात सर्वाधिक ७५ याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या असून त्याखालोखाल ४५ याचिका नागपूर खंडपीठात,तर ३५ याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत लाभले.भाजपसह शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे सरकार सत्तारूढ झाले आहे.मात्र, महायुतीला निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेमुळे बहुमत मिळाल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
मतदार याद्यांमधील घोळ, निवडणुकीबाबतची कागदपत्रे व सीसीटीव्ही फुटेज देण्यास निवडणूक आयोगाचा नकार,अपारदर्शकता, धार्मिक प्रचार,मतदारांना आमिष, पैसेवाटप, ईव्हीएमचा गैरवापर आदी मुद्द्यांचा याचिकांमध्ये समावेश आहे. मंबई उच्य न्यायालयात महाविकास आघाडीच्या सर्वाधिक उमेदवारांनी निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत.
जालन्यात जन्मदात्या वडीलानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . या नराधम वडिलाने 2018 पासून स्वतःच्याच मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार बलात्कार करून कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं देखील समोर आहे...यासंदर्भात मुलीच्या फिर्यादीवरून जालन्यातील मौजपुरी पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत वडिलावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला भोजपुरी पोलिसांनी अटक देखील केली आहे. आरोपीने मुलीवर 2018, 2022, 2023 आणि 2025 मध्ये बलात्कार केल्याचा मुलीने दिलेले तक्रारीत म्हटलं आहे.
धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा घसरला, आज धुळ्यात 4.4° तापमानाची नोंद करण्यात आली आहे, गेले काही दिवस धुळ्यात तापमानाचा पारा 10° पेक्षा जास्त होता, परंतु तापमानामध्ये पुन्हा अचानक बदल झाल्यामुळे आज धुळ्यात चार पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे धुळेकर पुन्हा एकदा गारठले आहेत,
या वाढत्या थंडीमुळे नागरिकांना पुन्हा एकदा जोरदार थंडीचा सामना करावा लागत असून, या थंडीपासून बचाव करण्यासाठी धुळेकर नागरिकांना ऊबदार कपड्यांचा व शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.
उदगीर शहरातल्या जळकोट रोड परिसरात अवैद्य देहविक्रीचा व्यवसाय चालवणाऱ्या कुंटणखाण्यावर उदगीर ग्रामीण पोलिसांनी अचानक धाड टाकत कारवाई केली आहे....
रात्री अचानक धाड टाकून तीन महिलांची यामधून सुटका करण्यात आली आहे..तर 2 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय ... दरम्यान अवैद्य विक्रीचा व्यवसाय चालवणारी महिला आणि तिचा मुलगा पसार झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नवी मुंबई पोलीसांनी घुसखोरी करुन भारतात आलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात आपली मोहीम तीव्र केलेय. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पृथ्वीराज घोरपडे यांच्या नेतृत्वात तुर्भे एमआयडीसी मधील बंगाली पाडा आणि कोपरीगाव सेक्टर 26 येथून 7 बांगलादेशी नागरिकांना अटक करत त्यांच्यावर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी न करता त्यांना घर भाड्याने देणाऱ्या तसेच कामावर ठेवणाऱ्या नागरिकांना देखील यामध्ये सहआरोपी करण्यात येणार असून यापुढे कोणालाही घर भाड्याने अथवा कामावर ठेवायचे असल्यास कागदपत्रांची तपासणी करण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आलेय.
राज्यातील काही शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बस चालवण्याचा लोकहितार्थ निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतलाये. याअंतर्गत अकोला शहरासाठी लवकरच 50 'ई-बस' मिळणारायेत. मंजूर या 'ई-बसेस' मिळण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेय. या बस वातानुकुलित असल्याने अकोलेकरांचा प्रवास आता गारेगार होणारेय.
अनेक वर्षांपासून अकोलेकर नागरिक सिटी बसगाड्यांची प्रतीक्षा करीत आहेय. महापालिकेची सिटी बससेवा बंद पडल्यामुळे अकोलेकरांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ऑटो रिक्षाचालकांकडून लूट होतीये. महापालिकेच्या नियंत्रणाखाली 2003 मध्ये शहर बस वाहतूक सुरू झाली होतीय. आर्थिक डबघाईमुळे 2010 मध्ये ही सिटी बससेवा बंद पडलीय. त्यानंतर 2017 मध्ये 20 बस सुरू केल्या होत्या. परंतु 2020 मध्ये काही कारणांमुळे परत ही बससेवा बंद पडलीय. आता राज्य सरकारच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने ई-बस मंजूर केल्यानंतर खडकी येथे चार्जिंगसाठी डेपो उभारला जाणारेय. त्यासाठी केंद्र सरकारतर्फे जवळपास 10 कोटी रुपये अनुदान लवकरच मिळणारेय.
धाराशिवच्या खोंदला गावातील शेतकऱ्याला टरबुजाच्या बोगस बियाणाचा फटका बसलाय खोंदला येथील शेतकरी बालासाहेब अरविंद लांडगे यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावर टरबुजाची लागवड केली.मात्र बियाणे उगवले नाही,थंडीमुळे बियाणे उगवले नसल्याच्या अंदाजाने दुबार लागवड केली तरीही बियाणे उगवले नाही.शेतीत लावलेल्या बियाणाला अंकुरच फुटत नसल्याचं लक्षात आल्यावर नामदेव उमाजी ॲग्रीटेक कंपनीचं बियाणं बोगस असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केली.कृषी विभागाकडून पीक पंचनामा करण्यात आला आहे.बियाणे न उगवल्याने शेतकऱ्याच मोठं नुकसान झालं आहे.
वही हरवल्याने शिक्षकानं विद्यार्थ्याला काठीने बदडल्याची घटना नाशिकमध्ये घडली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्षच्या जिल्हा परिषद शाळेतील प्रकार समोर आलाय.
- तिसरीत शिकणाऱ्या आयुष सदगीर या विद्यार्थ्याकडून वही हरवल्याने शिक्षकानं काठीने पाठीवर मारहाण केली. पाठीवर मारहाणीचे वळ दिसल्याने पालकांना प्रकार समजला. शिक्षकावर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे. गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून मारहाण करणाऱ्या शिक्षकाला समज देण्यात आलाय. शिक्षण विभाग शिक्षकावर काय कारवाई करणार?
छत्रपती संभाजी नगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65 व्या दीक्षांत सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा सोहळा कुलपती तथा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या नेतृत्वातील पहिला दीक्षांत सोहळा 13 जून 2024 रोजी नाट्यगृहात झाला होता. 65 व्या दीक्षांत सोहळ्यासाठी उपराष्ट्रपतींना आमंत्रण देण्यात आले. ते स्वीकारल्याचा संदेश कुलगुरू डॉ. फुलारी यांना नुकताच प्राप्त झाला.
छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाची 500 कोटींतून धावपट्टी रुंदीकरणाचे होणार आहे. संभाजीनगर येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचना जिल्हा प्रशासनाने जारी केली आहे. अंदाजे 500 कोटी रुपयांतून धावपट्टीच्या रुंदीकरणाचे टेकऑफ होणार आहे. चिकलठाणा, मूर्तिजापूर, मुकुंदवाडी या गावांतील मालमत्तांचे संपादन धावपट्टी विस्तारीकरणासाठी करण्यात येणार आहे. यात चिकलठाण्यातील एकूण 44 गट, मूर्तिजापूरमधील 4, तर मुकुंदवाडीतील 8 गटांचा समावेश आहे. सुमारे 58 हेक्टरची प्रारंभिक अधिसूचना आहे. 143 हेक्टर क्षेत्र विस्तारीकरणासाठी लागणार आहे. पाच वर्षांपासून भूसंपादन प्रक्रियेची पहिली अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या डोणगाव तांबे येथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यात प्रवेश करून बिबट्याने गायीवर हल्ला करून तिचा फडशा पाडला. ही घटना पहाटे तीन वाजता घडली. या घटनेने परिसरात शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्या फिरत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत, मात्र वन विभागाकडून कोणती कारवाई केली जात नसल्यामुळे शेतकरी संतप्त होत आहेत. याप्रकरणी तांबे यांना वन विभागाने नुकसानभरपाई देऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
वाल्मीक कराडचे ३ मोबाइल सीआयडीकडून जप्त करण्यात आले आहेत. या ३ मोबाइलची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे.
आज सीआयडीकडून कराडच्या आवाजाचे नमुने घेतले जाण्याची शक्यता आहे. काल बुधवारीच सीआयडीकडून कराडच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार होते. मात्र काल चाटेच्या चौकशीत आणि आवाजाचे नमुने घेण्यात अधिक वेळ गेल्याने वाल्मीक कराडच्या आवाजाचे नमुने आज घेणार आहेत. पण अद्याप विष्णू चाटेचा मोबाइल तपास पथकाला मिळालेला नाही. विष्णू चाटेचा मोबाईल मिळेपर्यंत कराडने खंडणीसाठी फोनवर बोलल्याचे स्पष्ट होणार नाही ? अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे
रायगड जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचा जिल्हा मेळावा अलिबाग येथे पार पडला. या मेळाव्यात वयाची 80 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाभरातून संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षा ७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. ही परीक्षा २३ जानेवारीपर्यंत असणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या हिवाळी सत्रातील प्रवेशित नियमित विद्यार्थांची सत्र परीक्षा व मे २०२४ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची ही परीक्षा घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र भरातून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावर प्रवेश घेतलेले जवळपास एक लाख ९ हजार २३७ विद्यार्थी ही परीक्षा देतील. राज्यातील विविध २३५ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसंदर्भातील आवश्यक ती सर्व शैक्षणिक व प्रशासकीय तयारी विद्यापीठातर्फे पूर्ण करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी मदत यंत्रणाही कार्यरत करण्यात आलेली आहे. काही समस्या उद्भवल्यास विद्यार्थ्यी विद्यापीठ मदत केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा आयोजनाच्या सर्व मार्गदर्शक सूचना विभागीय केंद्रांमार्फत परीक्षा केंद्रांना देण्यात आलेल्या आहेत. पोर्टलवरच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार विद्यापीठाच्या या परीक्षा सुरू होत आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यापीठाकडून आवश्यक ती काळजी घेतली जाणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक विभागाने दिली आहे.
सासुला तू माझ्या घरातून निघून जा, असे म्हणून तिला हाताने मारहाण केली.तेव्हा मध्ये पडलेल्या मेव्हणीवर चाकूने वार करुन जखमी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जावायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नी, सासू आणि मेहुणीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना धानोरी परिसरात घडली आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबई आणि मुंबई उपनगरात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला आहे. गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोर मोठ्या हात चलाखीने प्रवाशांचे मोबाईल घेऊन प्रसार होतात मात्र मुंबईच्या मेघवाडी पोलिसांनी अशाच सराईत तीन मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळल्या आहत. त्यांच्याकडून चोरीत गेलेले तब्बल 105 मोबाईल हस्तगत करण्यात मेघवाडी पोलिसांना यश मिळाले आहे. मोबाईल चोरीच्या गुन्ह्या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी इम्तियाज सिद्दीकी अटक केली अधिक चौकशी केली असता चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्या वाजीद जावेद खान आणि नरसिमलु दत्तात्रय गुज्जरवार या दोघांनाही मेघवाडी पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तब्बल 105 मोबाईल हस्तगत केले आहेत. सर्व मोबाईल्सची किंमत सुमारे १६ लाख ४५ हजार रुपये असल्याचा अंदाज आहे.
मराठी माणसाच्या न्याय व हक्कासाठी शिवसेना पक्षाची निर्मिती झाली. मात्र आता याच शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मराठी माणसावरच अन्याय सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील इराणी वाडी येथे राहणाऱ्या पै कुटुंबीयांच्या मालकीचे दुकान विकत घेऊन फक्त इसार म्हणून काही रक्कम देऊन उर्वरित रक्कम देण्यास शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख लालसिंग राजपूत यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याच दुकानाच्या जागेवर आता शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख लालसिंग राजपूत यांनी आपले संपर्क कार्यालय उभारले आहे. दुकानाच्या व्यवहारातील उर्वरित रक्कम पै कुटुंब राजपूत यांच्याकडे मागण्यासाठी गेले असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप पै कुटुंबीयांनी केला आहे. आम्हाला आमच्या दुकानाचे पैसे द्यावेत किंवा आमचे दुकान आम्हाला परत मिळवून देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पै कुटुंबीयांनी केली आहे.
- कन्हान जलशुद्धीकरणं केंद्रावर शटडाऊनमुळे निम्म्या नागपूरात उद्या पाणीपुरवठा बंद
- शुक्रवारी सकाळी १० ते शनिवारी दुपारी ४ पर्यंत कन्हान जलशुद्धीकरणाचे ३० तासांचे शटडाऊन
- नागपूर महापालिका आणि ॲारेंज सीटी वॅाटरच्या विविध पाईपलाईननदुरुस्तीच्या व्हाल बद्दलवण्याचा कामासाठी शटडाऊन
- शुक्रवारी लकडगंज, सतरंजीपुरा, आशिनगर, नेहरूनगर झोनमधील ३३ जलकुंभावरुन पाणीपुरवठा होणार नाही..
पुण्यातील साखर संकुल येथे काही वेळात सहकार मंत्री यांच्यासोबत बैठक होणार आहे. साखर आयुक्त कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयाचे कामकाजाचा अजित पवार आज आढावा घेणार आहेत.
कर्जत तालुक्यातील कडाव येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत केंडे यांना 1 लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून दहिगाव येथील खरेदी केलेल्या जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी केंडे यांनी एक लाख रुपये स्वीकारले.
यवतमाळ शहरातील मालमत्ता धारकांकडे थकीत असलेल्या 15 कोटीचा कर वसूल करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे एक लाखापेक्षा अधिक तर थकीत असलेल्या 400 मालमत्ता धारकांना नोटीस बजावली असून 31 मार्चपूर्वी कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याची नगरपरिषदेची धावाधाव सुरू झाली आहे.
तुळजाभवानी मातेचा छोटा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुळजाभवानी मातेच्या प्रक्षाळ पुजेनंतर गरुड वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली दरम्यान शांकभरी नवरात्र महोत्सवानिमित्त देवीची छबिना मिरवणूकीसह विविध धार्मिक कार्यक्रम 14 जानेवारी पर्यंत पार पडणार आहेत.
अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी भागात जाऊन चिखलदरा येथे सर्वच विभागाचा प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला, बालमृत्यू, माता मृत्यू, आरोग्यसेवा, शिक्षण रोजगार आदी आदिवासींना भेडसावणाऱ्या समस्या बाबत आढावा घेत, आदिवासींना मिळणाऱ्या योजना का प्रलंबित आहे? त्यांच्या योजना त्यांचा लाभ का त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आदिवासींकडे जातीने लक्ष देण्याची तंबी खासदार बळवंत वानखडे यांनी अधिकाऱ्यांना दिली, यावेळी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर आपापल्या समस्या घेऊन या बैठकीला उपस्थित होते.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पंढरपूरची चंद्रभागा लवकरच शुध्द होणार आहे. चंद्रभागेच्या पात्रातील पाणी शुद्धीकरण करण्यासाठी परदेशी टॅक्नालिजीचा वापर केला जाणार आहे. येत्या 26 जानेवारी रोजी प्रत्यक्ष चंद्रभागा शुद्धी करण्याचे काम सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे भाविकांना स्वच्छ आणि शुद्ध पाण्यात स्नान करता येणार आहे.
येथील चंद्रभागेचे स्नान पवित्र मानले जाते. दररोज हजारो भाविक चंद्रभागेत स्नान करतात. अलीकडे चंद्रभागा स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नदी पात्रातील घाणीमुळे पाणी अस्वच्छ असते. याच अशुध्द आणि घाण पाण्यात भाविक स्नान करतात. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील समोर निर्माण झाला आहे. येथील चंद्रभागा नदी स्वच्छतेचा प्रश्न वारंवार मांडला होता. त्यानंतर आता राज्य सरकारने चंद्रभागेतील पाणी शुद्धीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी इंग्लंडच्या सेबर टॅक्नालिजीचा वापर केला आहे.
उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त विकास ढाकणे यांची अवघ्या साडेचार महिन्यातच बदली झाली असून, त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान आयुक्त विकास ढाकणे यांच्या जागी आयुक्त पदासाठी भिवंडी महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त तसेचअंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या नावाची चर्चा महानगरपालिका वर्तुळात सुरू झाली आहे.22 ऑगस्ट 2024 रोजी विकास ढाकणे यांनी आयुक्त पदाचा पदभार हाती घेतला होता.त्यानंतर त्यांनी सेवानिवृत्त कामगारांची थकीत देणी देण्याला त्यांनी प्राधान्य दिले तसेच . कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. तसेच मिशन 50 अंतर्गत महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या जागी 15 मजल्याची पिरॅमिड आकाराची इमाइत, एमएमआरडीएच्या 7 काँक्रीट रस्त्यांचे काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण करून त्यापैकी 5 रस्त्यांना आदर्श लूक देणे हि कामे हातात घेतली होती.
नंदुरबार जिल्ह्यात थंडीची लाट पुन्हा परतली आहे. सकाळच्या सुमारास थंडीचा तडाखा जाणवत आहे. पहाटेच्या सुमारास थंडीपासून वाचण्यासाठी नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. शहरी भागात तापमानाचा पारा 10 अंश खाली तर सातपुडा पर्वत रांगेत तापमान 8° अंश सेल्सिअस इतके राहिलेय. वाढत्या थंडीमुळे नागरिकांनी उबदार कपडे वापरून काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन
नंदुरबार बाजार समितीत कापसाची आवक वाढली आहेा. बाजार समिती कापसाची एक लाख क्विंटल आवक कापूस खरेदीतून 70 कोटीची उलाढाल झाली. 70 % कापूस खरेदी सीसीआयच्या मार्फत, 5100 ते 5 हजार 521 पर्यंतच्या हमीभावाने कापूस खरेदी झाली. पुढील दिवसात आणखीन आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.
शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी असलेल्या भोनगाव, मनसगाव, मंडळामध्ये रेतीची अवैध वाहतुक होत असून ग्राम पातळीवरील महसूल कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.....त्यामुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांची चांदी होताना दिसत आहे.....अवैध रेती वाहतूक करणारे चोरटे रस्त्याच्या बाजूला रेतीचे ढीग टाकत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाहि.... मनसगांव या ठिकाणी महसूल मंडळ अधिकारी म्हणून तांबारे हे कार्यरत असून त्यांच्या हाताखाली 5 ते 7 तलाठी काम पाहतात, तरीही या रस्त्याने व पूर्णा नदी पात्रात अवैध रेतीची वाहतूक कशी होते? अश्या प्रकारचा प्रश्न जनतेला पडलेला आहे.... याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी तत्काळ लक्ष देवून ठोस कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत...
पाचगणी जवळच्या कासवंड येथील हिराबाग हॉटेलमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीत पाचगणी पोलिसांनी मारलेल्या छाप्यात बारबालांसह 20 जणांवर कारवाई,पाचगणी पोलिसांकडून 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
साताऱ्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या पाचगणीसारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर कासवंड गावच्या हद्दीत'हॉटेल हिराबाग'मध्ये विविध ठिकाणांहून आणलेल्या 12 बारबाला अश्लील हावभाव करत नृत्य सुरू असल्याची माहिती अज्ञात खबऱ्याने पाचगणी पोलिसांना दिली यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत हॉटेलमधील डान्स करणाऱ्या बारबालांसह 20 जणांना ताब्यात घेतले असून त्या ठिकाणाहून 25 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेची नोंद पाचगणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
जळगावजामोद शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथील संविधान विटंबना तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
आक्रोश मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने बहुजन समाजातील महिला पुरुष तरुण नवयुवक, युवती यांचेसह समता सैनिक दलाचे जवान तसेच जळगाव जामोद तालुक्यातील संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील भीम नगर येथून या मोर्चाचा प्रारंभ होऊन चावडी, स्थानिक दुर्गा चौक, तहसील चौक मार्गाने मार्गक्रमण करीत नंतर आंबेडकर चौकात एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा इंटरचेंजजवळ सुशोभीकरणासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर झाडे लावली होती, मात्र आता या झाडांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पाण्याअभावी काही झाडे पूर्णपणे वाळून गेली असून काही झाडे अजूनही सुकत आहेत.
यासाठी लाखो रुपये खर्च झाले, मात्र झाडांची योग्य देखभाल न झाल्यामुळे शासनाचा हा प्रयत्न व्यर्थ ठरतोय... यामुळे स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, झाडे वाचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे. संपूर्ण विषयावर प्रशासन काय भूमिका घेते आणि झाडे वाचवण्यासाठी कोणते पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
झारखंड राज्यातील रांची येथे सुरू असलेल्या 68 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत शहादा तालुक्यातील लोनखेडा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 12 वीचा विद्यार्थी पंकज गवळे हा भालाफेक स्पर्धेत देशात द्वितीय क्रमांकाने विजयी झाला असून तो रजतपदकाचा मानकरी ठरला आहे.....
रांची (झारखंड)येथे सुरू असलेल्या 68 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत भालाफेक या क्रीडा प्रकारात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला,विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय शहादा येथील खेळाडू पंकज गवळे याने 69.92 मिटर भाला फेकून उत्कृष्ट कामगिरी करत देशात द्वितीय क्रमांकाचे रजत पदक पटकाविले आहे. महाविद्यालयासस जिल्हा व राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर चमकविल्याबद्दल पंकज गवळे या विद्यार्थ्याचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या वतीने करण्यात आले...
पुण्यात फर्गसन रस्ता परिसरातील पदपथावर बेकायदा पथारीवाल्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या अतिक्रमणविरोधी पथकाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी सायंकाळी फर्गसन रस्त्यावरील सागर आर्केड परिसरात ही कारवाई केली होती.याप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांनी डेक्कन पोलिसांत फिर्याद दिली.
रुग्णालयात उपचारादरम्यान ज्येष्ठ व्यक्तीच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून तोडफोड केल्याची घटना भारती हॉस्पिटलमध्ये घडली. याबाबत हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महाराष्ट्र वैद्यकीय संस्था अधिनियम आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी सहा नातेवाईकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
धनकवडी परिसरातील भारती हॉस्पिटलमध्ये तेजराज जैन (वय ८६) यांचा उपचारादरम्यान मंगळवारी (ता. ७) मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यूस रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप करून नातेवाइकांनी बाह्यरुग्ण विभागातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. लाकडी खुर्चीने केबिनच्या काचेची तोडफोड केली
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पालकांचे नुकसान टाळण्यासाठी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. शिक्षण विभागाकडून तेरा शाळांची नावे जाहीर केली असून, या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे.तर अनधिकृत शाळांनी जर शाळा सुरू ठेवली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिलाय.
भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकी महिला जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी उंड्रीतील कानडे नगर येथे घडली.
अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ.प्रणाली तन्मय दाते ( वय,३४वर्ष रा.अर्बन नेस्ट सोसायटी,उंड्री) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
दाते या साडे बारा वाजण्याच्या सुमारास उंड्रीकडून हांडेवाडीच्या दिशेने जात होत्या,त्याच वेळेस मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली.त्या रस्तावर पडल्या असता त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले.त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सरपंच संतोष देशमुख यांचे मारेकरी पुण्यात सापडले.तसेच वाल्मिक कराड हा ही पुण्याया सी आय डी ला शरण आला होता
पुण्यातील जन आक्रोश मोर्चात सुरेश धस यांनी पुण्यात आरोपी सापडत आहेत पुण्याची बदनामी होती आहे अशी टीकाही केली होती
धस यांनी पुण्यातील जरांगे पाटील समर्थक मराठा सेवकान सोबत पुण्यात फेर फटका मारत पुणयातील मराठा सेवकान सोबत चर्चा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी ७ वाजता सकाळ वृत्तसमूह आणि पीपीपीएफच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्हिजन महाराष्ट्र कार्यक्रमास उपस्थितीत राहणार..
मुख्यमंत्री अजित पवार यांची सकाळी आठ वाजता साखर आयुक्त कार्यालय येथे बैठक बैठकीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार.. साखर आयुक्त कार्या लयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयाच्या कामकाजाचा घेणार आढावा.. नऊ वाजल्यानंतर सर्किट हाऊस येते पुण्यातील विविध बैठकांना लावणार हजेरी
भाजप प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज सायंकाळी ९ वाजता पुणे शहरभाजप आणि ग्रामीण भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक डीपी रस्त्यावर असणाऱ्या भाजप कार्यालयात होणार बैठक...
महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि पणन मंत्री जयकुमार रावळ दोघेही उद्या पुण्यात... सहकार आणि पणनच्या विविध बैठकांसह कार्यक्रमाला लावणारा हजेरी..
उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह तीव्र होताच महाराष्ट्रात थंडी परतली आहे. थंडीचा कडाका वाढल्याने धुळे येथील कृषी महाविद्यालयात पारा पुन्हा ४.४ अंशावर आला आहे.
राज्याच्या किमान तापमानातील घट कायम राहून थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
तर राज्यात थंडी वाढताच कमाल तापमान काहीसे कमी झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरल्याने गारठा वाढत आहे.
बुधवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ४.४ अंश तापमान नोंदले गेले.
जळगाव, निफाड, यवतमाळ, परभणी कृषी विद्यापीठ, गोंदिया, अमरावती, बुलडाणा येथे पारा १० अंशांच्या खाली आला आहे.
अखिल भारतीय सरपंच परिषदेचा मसाजोगचे सरपंच हप्त्याच्या निषेध म्हणून आज राज्यातील ग्रामपंचायत काम बंद आंदोलन
राज्यातील सरपंच,उपसरपंच यांनी बीडमधील घटनेने भयभीत झाले आहेत. त्यामुळे सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून तो उपाय योजना करावी या मागणीसाठी तसेच संतोष देशमुख यांच्या हस्तेच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायत मध्ये आज काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायत श्रद्धांजली वाहण्यात येणार असून एक दिवस काम बंद आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.