
श्री. गहिनीनाथ गडावर पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
प्रस्थान प्रसंगी दीड लाख वारकरी गहिनीनाथ गडावर होणार दाखल
टाळ मृदंग गजरात संत वामनभाऊ महाराज यांचा जयघोष
महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा होणार संपन्न
पालखी सोहळ्यात माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिले २१ लक्ष रुपयांचे दोन घोडे
आश्रूबा त्रिंबक लाड यांनी कर्नाटक येथून ५ लाख रूपयांचे बैल जोडी केली खरेदी हे पालखीचे यावर्षीचे प्रमुख आकर्षण
संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी सोहळ्याला १२५ वर्षाची परंपरा
आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांचा आज भाजपच्या वतीने अलिबाग येथे सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ उपस्थित होत्या. या वेळी आणीबाणीवर बोलताना त्यांनी थेट राहूल गांधी यांच्यावर टिका केली. इंदिरा गांधींचे वंशज आणीबाणी सारखीच अराजकता या देशात आज पसरवू पाहताहेत हे सांगताना त्यांनी राहुल गांधी देशाच्या विरोधात, सैनिकांच्या विरोधात बोलत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. देशात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी राहुल गांधी आज कार्यरत आहेत अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
- भाजपच्या नेत्या आणि माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा पक्षप्रवेश संपन्न
- शोभा बनशेट्टी या सोलापूर महापालिकेच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत
- त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत पक्षाने डावलल्यानंतर सोलापूर शहर उत्तरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती
- सोलापूर शहरात मागील अनेक वर्षांपासून बनशेट्टी कुटुंबाचे राजकीय वर्चस्व राहिले आहे
- शोभा बनशेट्टी या अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांची ती कन्या आहेत
- माझी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापूर शहरात शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढली
- काही दिवसांपूर्वी अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.
धाराशिव येथे लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई
दोन लाखाची लाच मागणी करत 95 हजार रुपये स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला अंमलदार यांना घेतले ताब्यात
306 गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती
चंद्रराव तावरे (सहकार बचाव पॅनल) 8163
गणपत खलाटे (श्री निळकंठेश्वर पॅनल)8543
विजय तावरे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7882
( सांगवी गटातून सहकार बचाव पॅनलचे चंद्राराव तावरे विजयी.... तर अजित पवार गटाचे गणपत खलाटे आणि विजय तावरे विजयी झाले आहेत.)
रणजित खलाटे (सहकार बचाव पॅनल)7224
विरेंद्र तावरे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7289
संजय खलाटे (सहकार बचाव शेतकरी पॅनल)
सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित आरोपी मनीषा मुसळे हिला अखेर जामीन मंजूर
मनीषा मुसळे हिला तब्बल 66 दिवसानंतर जामीन मंजूर करण्यात आलाय
हिंदी सक्ती विरोधात मनसेचे वाकोल्यातील शाळांना पत्र दिलं. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिलीपासूनच हिंदी विषय सक्तीचा करण्यात आला आहे मात्र याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या मंजूरीबद्दल अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आभार मानले. वाहतूककोंडी सुटण्यास, वाहतूकव्यवस्था सुधारण्यास पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या मंजूरीमुळे मदत होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले .
यवतमाळच्या दहेगाव शेत शिवारात शेतकऱ्यांसह एका बैलाचा नाल्यात बुडून मृत्यू
नाल्यात शेतकरी आणि बैल बुडाले,यवतमाळच्या राळेगांव तालुक्यातील दहेगाव शेत शिवारातील घटना
बदलापुरातील भाजप पदाधिकाऱ्यांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी
वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबद्दल विचारला जाब
लोकांना टीओडी मीटरची सक्ती केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
आदिवासी समाजास वाढीव आरक्षण देण्याबाबत बैठक
लवकरच मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविणार
राज्यातील आठ जिल्ह्यात आदिवासी समाजाची संख्या अधिक
आदिवासींना नोकरीमध्ये वाढीव आरक्षण देण्याबाबत बैठक
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार
पुण्यातील भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांनी महिला पोलीस अधिकारी याच्याशी केलेल्या गैरवर्तनाची महिला आयोगाने घेतली दखल
पुणे पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल महिला आयोगाला सादर करावा
केलेल्या गैरवर्तनाचा जाहीर निषेध
अतिशय संताप जनक घटना आहे अशा घटना परत घडू नये म्हणून पोलिसांनी अशा विकृत व्यक्तींवरती कडक कारवाई करावी
जालन्यात 70 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली
21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई,
उर्वरित आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू
खंडणीच्या रकमेतून खरेदी केलेले दागिने, कार आणि कॅमेरा यासह इतर साहित्य जप्त
48 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वाण्याविहीर गाव झालं जलमय.....
पाण्याविहीर गावात जनजीवन विस्कळीत
अनेक आदिवासी कुटुंबियांचा घरात शिरलं पुराचं पाणी.
चार चाकी वाहनासह दुचाकी वाहन गेली पाण्याखाली
सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल.
एस. के. बी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यामंदिर नागपूर या नामक तीन संस्था आहे. यामध्ये 30 शिक्षकाचा बोगस शालार्थ आयडी असल्याचा आरोप केला आहे. ओमकार अंजीकरचा अटकेनंतर त्याचा पीसीआर मिळवला आहे. 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत तपास केला जाणार आहे. या संबंधित आरोपीचा तपास सुरू आहे. त्यावेळी कोण शिक्षणाधिकारी होते, शिक्षण उपसंचालक आणि वेतन पथक अधीक्षक होते. या सगळ्याची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे निश्चितच पुढच्या काळामध्ये आरोपीची संख्या वाढणार आहे.
सोलापूरवरून गांजा तस्करी करण्यासाठी पुण्यात आलेल्या तिघांना पोलिसांनी स्वारगेट परिसरात पाठलाग करून पकडलं.पोलीस आणि तस्कराचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. नितीन नरसिंह पाल,अल्ताफ तांबोळी आणि विठ्ठल उर्फ दादा शिवपाल या तिघा आरोपींना पोलिसांनी स्विफ्ट कार सह सहा किलो गांजा आणि स्विफ्ट गाडी सह 16 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा एसआरए कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. "एस.आर.ए. मधील भ्रष्ट आणि मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात काँग्रेसचा मोर्चा.
- मागील वर्षाच्या तुलनेत धरणंही यंदा ४१ टक्के अधिक भरली
- १ जून ते २४ जून या २४ दिवसांत नाशिकमध्ये ३२६ मिलिमीटर पावसाची नोंद
- तर जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ४६.१२ टक्के पाणीसाठा
- तर नाशिकमधून यंदा दोन महिने आधीच जायकवाडीला पोहचले पाच टीएमसीपर्यंत पाणी
- जिल्ह्यातील गंगापूर, दारणा, नांदूरमध्यमेश्वर धरणातून अद्यापही पाण्याचा विसर्ग सुरूच
देशभरात हे मराठीची सक्ती करणार आहेत का असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला विचारलाय.. हिंदी भाषा ठिक आहे. मात्र हे मराठी राज्य आहे. याठिकाणी मराठीचीच सक्ती पाहिजे. यांनी हिंदीची सक्ती केली तर भारतभर त्यांनी मराठीची सक्ती केली पाहिजे असं जरांगे यांनी म्हंटलंय.शेतकर्याजवळ पैसेच नाहीत तर कर्ज भरणार कुठून, त्यामुळं कर्जमाफी करून शेतकरी कर्जमुक्त केला पाहिजे असं जरांगे यांनी म्हंटलंय.सरकार काय करतंय आम्हाला माहित नाही पण आरक्षणाची लढाई आम्ही जिंकणार. मराठ्यांची काय लाट असती ती 29 ऑगस्टला बघावं. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धारही जरांगे यांनी केला आहे.
जळगाव महापालिकेत 10 व्या मजल्यावरून 9 व्या मजल्यावर लिफ्ट कोसळल्याची घटना घडली असून महापालिकेच्या 17 मजली इमारतीतील ही घटना आहे. लिफ्ट कोसळल्याने महापालिकेची इमारतही हादरली असून दरम्यान या लिफ्टमध्ये अडकलेल्या दोन जणांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले असून सुदैवाने लिफ्टमध्ये अडकलेले दोनही जण थोडक्यात बचावले आहे.
जालना शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील पिवळा बंगला भागामध्ये अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई दरम्यान पोलिसांचा स्थानिक महिलांवर सौम्य लाठीचार्ज केला आहे.न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिका आणि सदर बाजार पोलीस स्टेशनचे अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौका जवळील परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी गेले होते. मात्र कारवाईच्या विरोधात स्थानिक महिलांनी प्रतिकार करत जमाव जमवला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत पाच ते सहा महिलांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईदरम्यान काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी घेतली आहे.
जळगाव-भुसावळ महामार्गावरील हॉटेल वरुण येथे रात्री अज्ञात व्यक्तींनी बिलाच्या वादावरून हॉटेलची तोडफोड करत कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या घटनेने जिल्ह्यातील मद्यविक्री व्यवसायातील असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. .सोमवारी रात्री साकेगाव पुढील हॉटेल वरुण येथे बिलाच्या वादातून अज्ञात ग्राहकांनी हॉटेलमध्ये तोडफोड केली. असल्याचा आरोप करत हॉटेल मालकाने सीसीटीव्ही फुटेज वायरल केली आहे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे
छत्रपती संभाजीनगर मधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणात एन्काऊंटरमध्ये मारला गेलेल्या अमोल खोतकरची बहीण रोहिणी बाबूराव खोतकर हिला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री अटक केली. तिच्याकडून घरातील तुळशी वृंदाव वृंदावनाखाली जमिनीत हातमोजामध्ये लपवलेले २२ तोळे सोन्याचे दागिने, ७ जिवंत काडतुसे जप्त केली.
कोल्हापूर शहराच्या दक्षिणेला असलेला कळंबा तलाव यावर्षी जून महिन्यामध्येच ओव्हर फ्लो झाला आहे... दरवर्षी हा कळंबा तलाव जुलै महिन्यामध्ये ओव्हर फ्लो होत असतो. मात्र यावेळी असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच छोटे तलाव शंभर टक्के भरले आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत. याच कळंबा तलावाच्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी नागरिक खूप मोठ्या संख्येने येत असतात. कळंबा तलावाची क्षमता 2.75 टीएमसी असून या तलावातून शहरातील मंगळवार पेठ तसेच इतर भागात पाणी पुरवठा ही केला जातो.
कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असतानाच, शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने 20 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काही शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे. तर काहींचं समर्थन देखील आहे. हा महामार्ग शक्तीपीठ नसून तो 'सक्ती' पीठ असल्याची टीका देखील होताना दिसत आहे.
समुद्रात उंचच्या उंच लाटा उसळत आहेत. जून महिन्यातली सर्वात मोठी भरती आज आलेली आहे. साडेतीन ते चार मीटर पेक्षा उंच लाटा उसळत आहेत. त्याशिवाय किनारपट्टी भागात वाहताहेत वेगवान वारे वाहतेय. मुसळधार पावसासोबतच वारा अन् लाटामुळे किनारपट्टी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून यासाठी 20 हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला आहे.परंतु या निर्णयाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. नांदेडच्या मालेगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाने काढलेल्या आदेशाची होळी केलीये. शासन आदेशाची होळी करत शासनाविरोधात शेतकऱ्यांनी बोंब मारो आंदोलन केले. वर्धा ते गोवा असा हा महामार्ग होणार असून या महामार्गात अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत. या महामार्गासाठी शेतकरी आपल्या जमिनी देण्यास तयार नाहीत. परंतु शासन शक्तीपीठ हा महामार्ग तयार करण्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे. तर शेतकरी मात्र आपल्या जमिनी या महामार्गास देण्यास तयार नाहीत. त्यामुळे या महामार्गावरून शेतकरी आणि शासन यांच्यात तीव्र संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झालीये.
जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यातील वरवंड करांचा पाहुणचार घेऊन आज बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडीकडे मुक्कामासाठी प्रस्थान केलेय . दिंडी सोहळ्याने पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास संपवून नागमोडी वळणावळणाचा रोटी घाट टाळ मृदुंगाच्या साथीने हरिनामाच्या जयघोषात सहज पार केला. हा घाट पार करण्यासाठी रोटी गावच्या पाच बैल जोड्यांनी परंपरेप्रमाणे पालखीरथाला साथ दिली. निसर्गानेही वारकऱ्यांच्या प्रोत्साहित करण्यासाठी उन-सावल्यांचा खेळ सुरु केला. या उत्साही वातावरणात संपूर्ण दिंडी सोहळ्याने ज्ञानोबा तुकारामच्या व पांडुरंगाच्या नामस्मरणात रोटी घाट पार केला. त्यानंतर माथ्यावर आरती करण्यात येऊन भोजन व विश्रांतीनंतर पालखी सोहळा पुढे रवाना झाला.
भाषा ही विषय म्हणून नव्हे, तर भाषा म्हणुन शिकवली जावी त्यातुन विद्यार्थींच्या जीवनातलं कौशल्य घडवते असा ठाम संदेश दिलाय दत्तात्रय वारे गुरुजींनी.वाबळेवाडीनंतर आता जालिंदरनगर शाळेत मराठीसह हिंदी, इंग्रजीसह विविध देशी-परदेशी भाषा शिकवण्यावर भर दिला जातोय, आणि लहान वयातच विद्यार्थी भाषांमध्ये प्रावीण्य मिळवतायत.गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अनेक भाषा आत्मसात करत ‘बहुभाषिकतेचा’ प्रभावी प्रयोग केला आहे.भाषा शिक्षण हे केवळ शैक्षणिक यशासाठी नाही, तर व्यक्तिमत्त्व विकासासाठीही अत्यंत महत्त्वाचं असल्याचं उदाहरण या शाळेने उभं केलंय.
पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलिस अधिकाऱ्याच्या विनयभंगाच्या बाबत तक्रार दाखल होऊ नये म्हणून भाजप नेत्यांनी पुणे पोलिसांवर दबाव आणला, जेव्हा संबंधित तक्रार मुख्यमंत्री कार्यालयात पोहचली तेव्हा खुद्द मुख्यमंत्री यांनी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या अशी माहिती आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आली आहे. राज्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवार घालावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात शिवाजी कोकरे उमेदवार म्हणून उभा आहेत. शिवाजी कोकरे यांचा उद्देश आहे की लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. आतापर्यंत 1992 पासून जेवढ्या निवडणुका झाल्या त्या बिनविरोध नाही झाली पाहिजे हीच शिवाजी कोकरे यांची भूमिका आहे. सत्तेपुढे पुढे माझा टिकाव लागणार नाही मला माहिती आहे. मात्र तरी देखील शिवाजी कोकरे निवडणूक लढवत आहेत. शिवाजी कोकरे यांनी आतापर्यंत 35 निवडणुका लढला असल्याचं कोकरे सांगतात. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि कारखाना अशा निवडणुका आतापर्यंत कोकरे लढले आहेत.
नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगलीच्या आटपाडीतील शेटफळे येथे शेतकऱ्यांनी रोखून धरले आहे. संतप्त शेतकऱ्यांकडून भूसंपादनाच्या मोजणी प्रक्रियेला जोरदार विरोध करण्यात आला असून कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही,अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे,त्यामुळे या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सकाळ पासून थांबून राहावे लागले आहे.राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रस्तावाला मंजुरी देत निधीची तरतूद करण्यात आलेली आहे,यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनासाठी सांगलीमध्ये प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे.मात्र आटपाडीतल्या शेटफळे या ठिकाणी पोलीस फौजफाटा घेऊन पोहोचलेल्या भूसंपादन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे.
णे रेल्वे स्टेशनला थोरले पेशवे यांचे नाव देऊ देणार नाही, या रेल्वे स्टेशनला महात्मा ज्योतिराव फुले नाव दिलं पाहिजे या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मेधा कुलकर्णी यांची मागणी अत्यंत चुकीची आहे असं यावेळी कार्यकर्ते म्हणाले. पुण्यातील डी आर एम कार्यालयात आज वंचित आघाडी ने येत घोषणाबाजी करून अधिकाऱ्यांना निवेदन दिलं.
नालासोपाराच्या श्रीपस्था येथील दोन शाळांना उडवून देण्याची धमकी
आज सकाळी ४ वाजून २६ मिनिटाने हा मेल शाळेला आला आहे.
राहुल इंटरनॅशनल स्कूल, आणि मदर मेरी जूनियर्स कॉलेजला धमकीचा मेल आला आहे.
शाळेच्या ठिकाणी पालिकेचे अग्निशमन पथक, तसेच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल
शाळेने सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून सर्व शाळकरी मुलांना घरी पाठवून इमारती खाली केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलचा तिसरा विजय..
इतर मागासवर्गीय प्रवर्गातून नितीन शेंडे 8494 मते.. 1153 मतानी नितीन शेंडे विजयी...
सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे पराभूतत्यांना 7341 एवढी मते..
ठाणे जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनावर जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशाविरोधात बदलापुरातल्या कोंडेश्वरच्या आदिवासी बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. हवं तर पोलीस बंदोबस्त लावा पण आमचा रोजगार हिरावू नका अशी विनवणीही त्यांनी प्रशासनाकडे केलीय.
22 देशातून 70 दिवसांचा प्रवास करत पंढरपुरातून निघालेली वारी आज लंडनमध्ये जाऊन पोहोचली. लंडनच्या मराठी मंडळाने 14 एप्रिल रोजी पंढरपुरातून पांडुरंगाच्या पादुका घेऊन लंडनवारी सुरू केली. आणि हीच वारी आता लंडनच्या ब्रिजवर जाऊन पोहोचली. लंडनमध्ये मराठी परंपरेप्रमाणे पांडुरंगाच्या पादुकांचे भव्य दिव्य स्वागत झाले. हरिनामाचा जयघोष झाला. आणि 70 दिवसानंतर तीन खंड आणि 22 देशातून फिरणारी पंढरीची वारी आज लंडनच्या द्वारी खऱ्या अर्थाने जाऊन पोहोचली. अनिल खेडकर यांच्या संकल्पनेतून पंढरपूर ते लंडन वारी सुरू झाली होती. आणि आज महाराष्ट्रात वारीचा जयघोष सुरू असताना लंडनमध्ये देखील विठू नामाच्या गजरात पंढरीच्या वारीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोकुळनगर परिसरात एका इमारतीचे काम सुरु आहे काम सुरु असताना एका पोकलँडचा धक्का भिंतीला बसला आणि भिंत ३ वाहनावर कोसळली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
निसर्गाच्या लहरीपणाला आणि अनियमित वीज पुरवठा असताना देखील मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने कांदा पिकविला. पण बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांना कांदा विक्री न करता चांगला बाजारभाव मिळण्याच्या प्रतिक्षेत आकारा ट्रॉली कांदा चाळीत साठवण करुन ठेवला. मात्र कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजर पडली अन् त्याने थेट कांदा चाळीतच युरिया टाकला त्यामुळे संपूर्ण कांदा नासला आहे. झालेल्या प्रकारामुळे शेतकऱ्याचे सहा लाखांचे नुकसान झाल्याची घटना नाशिकच्या सटाणा तालुक्यातील तरसाळी गावातील उध्दव भिका रौंदळ याच्यां शेतात घडली आहे. या प्रकरणी या शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात इसमाचा पोलिस शोध घेत आहेत.
पालघर - वाढवण बंदराचा जेएनपीए कडून सुरू असलेला ड्रोन सर्व्हे स्थानिकांनी रोखला . वाढवणच्या समुद्रकिनाऱ्यावर स्थानिकांनी सर्व्हे रोखला . वाढवण बंदर उभारणीसाठी समुद्राच्या हायटाईड लाटांचा जेएनपीए कडून सुरू होता ड्रोन सर्व्हे . जेएनपीए कडून ड्रोन सर्व्हेच काम एका खाजगी कंपनीला देण्यात आल्याची माहिती . सर्व्हे सुरू असल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी एकत्र येत सर्व्हे रोखला .
संभाजीनगर शहरात अतिक्रमण हटवा मोहिमेसोबतच अनाधिकृत नळ कलेक्शन घेणाऱ्यांवर सुद्धा कारवाई सुरू करण्यात आली आहे. अनाधिकृत नळ शोधून ते कट केले जात आहेत. शिवाय ज्यांनी अनधिकृत घेतलं त्यांच्यावर थेट कारवाई केली जात आहे. किराडपुरा येथे 200 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर अनेक नागरिकांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेतले होते. मंगळवारी महापालिकेच्या विशेष पथकाने या भागात मोठी कारवाई करत तब्बल 105 अनधिकृत नळ कनेक्शन तोडले. विशेष बाब म्हणजे पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. पुन्हा अनधिकृत नळ कनेक्शन घेतले तर फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला. किराडपुरा भागातील काही गल्ल्यांमध्ये पाणी येत नसल्याची ओरड नागरिकांकडून करण्यात येत होती त्यामुळे महानगरपालिका अनधिकृत नळ कनेक्शन तोडल्यावर आक्रमक असल्याचे दिसून येत आहे.
धाराशिव च्या कळंब तालुक्यातील गोविंदपुर येथील ग्रामस्थांनी तब्बल 56 वर्षांपासून वारकरी अन्नदानाची परंपरा जपली आहे.संत गजानन महाराजांची पालखी दिंडीचे गावात जल्लोष स्वागत करण्यात आले तर वारकऱ्यांना जेवनासाठी खास पिटलं भाकरी केली जाते यासाठी तब्बल 8 दिवस अगोदर नियोजन करण्यात आले होते तब्बल 15 हजार भाविक व वारकऱ्यांना हे अन्नदान करण्यात आले साधारण 50 क्विंटल ज्वारीच्या भाकरी व 60 क्विंटल बेसनाचे पिठलं करण्यात आले होते तर संत गजाजन महाराज पालखीच्या दर्शनासाठी परीसरातुन मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाले होते.
वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूर येथून सव्वा कोटीपेक्षा जास्त किमतीचे एमडी ड्रग्स सापडल्यानं खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी दोन वाहने जप्त करून दोन गोदामे सील केली असून तब्बल कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी बबनभाईला पोलिसांकडून मिळालेली व्हीआयपी वागणूक सध्या चर्चेत आलीय. पोलिसांकडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून बडदास्त ठेवली जात आहे. वाटेल ते त्याला दिले जात असल्याचा फोटो व्हायरल झालाय. २४ जूनच्या रात्री बबनभाईला वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यातील एका हॉलमध्ये टेबलावर बसवून, फॅनच्या थंड हवेत, कुटुंबासोबत जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्याचा फोटो काढून कोणीतरी व्हायरल केला. त्यानंतर हे समोर आले. गुन्हा गंभीर असतानाही आरोपीवर कोणताही मानसिक दबाव न आणता दिलासा देणारी वागणूक मिळत असल्याने पोलिसांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
लातूरच्या अहमदपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली. सहायक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी वाळू तस्करांवर कारवाईचा बडगा उगारला आहे... लातूर नांदेड रोडवरच्या राळगा शिवारात अवैध्य पद्धतीने वाळू साठा केल्याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती.तर, पोलिसांनी एक पथक तयार करत अचानक धाड टाकत कारवाई केली आहे. दरम्यान या कारवाईत एकूण 12 वाळू तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोन जेसीबी चार हायवा असा एकूण 1 कोटी 47 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.. तर या कारवाईमुळे अवैद्य वाळू उपसा करणाऱ्यांचे धागे दणाणले आहेत..
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी अधिकारी शेताच्या बांधावरी हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीच्या समस्या जाणून घेण्यासाठीचा हा राज्यातला हा पहिलाच उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी दिलिप स्वामी गावात जाऊन आणि शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यासोबतच सगळ्याच तालुक्यातील गावांमध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार येथेच बांधावर पोचून शेतकऱ्यांच्या नेमका अडचणी काय आहेत, त्या समजून घेतल्या जात आहेत.
- नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हिंगणा तालुक्यातील 1,780 एकरवर मध्यवर्ती व्यावसायिक जिल्हा प्रकल्पाची घोषणा केली आहे.
- मौजा गोंठगाव आणि लाडगाव दरम्यान विकसित होणारा हा प्रकल्प पूर्णपणे मिश्र वापराचा असेल.
- त्यामध्ये मॉल, आयटी पार्क, ऑफिस टॉवर, उद्योग आणि निवासी मालमत्तांचा समावेश राहील.
- रस्ते, भूमिगत सेवा, वीज, पाणी आणि अत्याधुनिक स्वयंपूर्ण टाऊनशीप विकसित करण्यात येणार आहे.
- 13 हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प केंद्र सरकारच्या मदतीने पूर्ण केला जाणार...
- एनएमआरडीएने मंजुरी दिली असून मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होईल..
मावळात मुसळधार पाऊस सुरू आहे. भात पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळात भात लागवडीला शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या अवजारांना दुरुस्तीच्या कामालाही वेग आलेला आहे.. आपल्या घरातील शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची दुरुस्ती करून भात लागवडीला शेतकरी तयारी करू लागलेला आहे. त्यामुळे अवजारे दुरुस्ती करणाऱ्या दुकानात शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे..
या दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालयांची निवड यादी आणि पहिल्या फेरीचा कट-ऑफ जाहीर केला जाणार
इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे
या अंतर्गत राज्यातील नऊ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमधील २१ लाख २३ हजार ७२० जागांसाठी आतापर्यंत १२ लाख ७१ हजार २०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे
या प्रवेश प्रक्रियेत ‘कॅप’अंतर्गत १६ लाख ६० हजार ८४ जागा उपलब्ध आहेत
व्यवस्थापन कोट्याअंतर्गत चार लाख ६३ हजार ६३६ जागा उपलब्ध आहेत
विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे देखील संदेश पाठविले जातील आणि पहिल्या नियमित फेरीचा कट-ऑफ जाहीर होईल
- शालार्थ आयडी घोटाळ्यात अनेक शिक्षकांचा बनावट शालार्थ आयडी तयार करणारा संस्थाचालक अटकेत
- अंजीकर शांतीनिकेतन शैक्षणिक संस्थेचा संस्थाचालक ओंकार भाऊराव अंजीकर याला अटक करण्यात आली...
- अंजीकर यांने आपल्याच संस्थेचं बनावट लेटरहेड वापरुन अपात्र मुख्याध्यापक पराग पुडके याने पद मिळवल्याची तक्रार केली होती... त्यामुळे या प्रकरणाचा पहिला तक्रारदारचं आता आरोपी झाला...
- आता एसआयटीच्या चौकशीत स्वतः ओंकार अंजीकर अडकले असून पोलिसानी अटक केली...
- अंजीकर यांच्या संस्थेमार्फत तीन शाळा चालवल्या जातात
- २०१९ पासून अंजीकर यांने साधारण ३० शिक्षकांचे बनावट शालार्थ आयडी तयार केल्याचा आरोप आहेय
जालन्यातील अंबड आणि घनसांवगी तालुक्यात अतिवृष्टी अनुदान वाटपामध्ये 40 कोटींचा घोटाळा झाल्याच समोर आल आहे.याप्रकरणी जालना जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली आणि या समितीने क्षत्रिय अधिकारी कर्मचाऱ्यांसोबतच विभाग प्रमुख म्हणून तहसीलदारांवरही ठपका ठेवला आहे. त्यामुळे जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी अंबडचे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि घनसांवगीच्या तहसीलदार योगिता खटावकर यांच्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे.त्यामुळे शासनाकडून या प्रकरणात संबंधितांचे निलंबन होते की विभागीय चौकशी प्रस्तावित केली जाते हे पाहणं महत्त्वाच असणार आहे.अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यामध्ये आतापर्यंत 16 तलाठी,एक मंडळाधिकारी, तीन सहाय्यक महसूल अधिकारी आणि एक महसूल सहाय्यक अशा 21 अधिकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच 35 तलाठ्यांची विभागीय चौकशी देखील होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात शासन या दोन तहसीलदारांवर काय कारवाई करणार हे बघलं महत्त्वाचं असणार आहे...
वरिष्ठ पातळीवर जो निर्णय आम्हाला मान्य असेल मात्र नवी मुंबईत आमची ताकद आहे त्यामुळे नवी मुंबईत भाजपची सत्ता यावी यादृष्टीने आम्ही वरिष्ठ कळविले आहे
भाजप स्वबळावर लढवण्याची तयारी आमची आहे स्पष्ट संकेत माजी खासदार भाजपा नेते संजीव नाईक यांनी दिली आहे
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वनमंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा नवी मुंबई प्रश्नांवर बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात महत्वाचे निर्णय घेतलेआहे त्यांची सुद्धा अंमलबजावणी केली जाईल
विश्वशांतीसाठी पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात विषेश पुजा विधींचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये श्रींच्या स्वयंभू मुर्तीवर संततधार जलाभिषेक आणि अथर्वशिर्ष पठण केले जाणार आहे. दिनांक 26 ते 28 जुन असे तीन दिवस हे विषेश पुजाविधी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पार पडणार असून या दरम्यान मंदीराच्या गाभाऱ्यातील दर्शन आणि भाविकांच्या पुजा, अभिषेक होणार नाहीत तर बाहेरील सभा मंडपातुन दर्शन घेता येणार असल्याचे बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली मार्फत सांगण्यात आले आहे. गणेश भक्तांनी सहकार्य करावे असे अवाहन देवस्थान ट्रस्ट मार्फत करण्यात आले आहे.
डॉ.सस्ते यांच्या पार्वती हॉस्पिटलचे मोठे नुकसान
रात्री पावणे अकराच्या सुमारास झाली तोडफोडीची घटना
वैद्यकीय सेवा नाकारल्याच्या रागातून अज्ञात व्यक्तींनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याची डॉक्टरांची माहिती
तोडफोड करणाऱ्यांनी हॉस्पिटल मधील लॅबचे देखील केलं मोठं नुकसान
दहा ते बारा लोकांनी येऊन चार चाकी गाडीच्या काचा फोडून,एलईडी टीव्हीसह हॉस्पिटल मधील इतर सामानाची केली तोडफोड
हॉस्पिटल परिसरात दगड आणि काचांचा खच
अज्ञात व्यक्तीकडून डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाल्याचा डॉक्टरांचा दावा
हॉस्पिटलमध्ये दहा ते बारा रुग्णांवर उपचार सुरू असताना अचानक ह प्रकार घडल्याने रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण
अकोला महापालिकेच्या शिक्षकांच्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्या आता लवकरच निकाली लागणारेय.. कारण, आमदार साजिद खान आणि आमदार धीरज लिंगाडे यांनी अकोला मनपा आयुक्तांच्या दालनात बैठक घेतली. गेल्या 15-16 वर्षांपासून मनपा शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक यांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या. यावरून दोन्ही काँग्रेस आमदारांनी मनपा आयुक्तांच्या दालनात शिक्षक संघटनांसोबत घेत बैठक घेतलीय.. शिक्षकांच्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडविणार असल्याचे आश्वासन, मनपा आयुक्त सुनील लहाने यांनी दिले.
महापालिका शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी असलेली रक्कम देण्यात यावी, पदवीधर शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी लागू करणे, 40 शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीची थकबाकी मिळावी, तसेच मुख्याध्यापक पदी नियुक्ती जारीकेली असली तरी मात्र आर्थिक लाभ मिळाला नाही, तो देण्यात यावा, सोबतच सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकांची पदोन्नती द्यावी, अशा अनेक समस्या मागील काही वर्षापासून प्रलंबित होत्या.
विदर्भासह पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे..नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रातर्फे विदर्भातल्या अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती या पाचही जिल्ह्यामध्ये येत्या 29 जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज दिलाय.. या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी प्रतितास राहणारेय..
दरम्यान, नागरिकांनी वीज, वारा व पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली आसरा घेऊ नये. या काळात ड्रेनेज, सखल भाग, रस्त्याचे अंडरपास किंवा जिथे पाणी साचतं, अशा ठिकाणी जाणे टाळावे. पूर आलेल्या रस्त्यावरून अथवा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. तर शेताकऱ्यांनी आपले जनावरे झाडांना किंवा वीजेच्या ताराला अर्थातच खांबाला बांधू नये, अस आवाहन प्रशासनाने केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यामध्ये चुरशीची लढत
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या फेरीची मतदान मोजणी पूर्ण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलचे 17 उमेदवार आघाडीवर
चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे 4 उमेदवार आघाडीवर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकमेव विजयी उमेदवार म्हणून घोषणा
अजून देखील वीस उमेदवारांचा निकाल हाती येणे बाकी
सहकार बचाव सांगवी गटातून पॅनलचे चंद्रराव तावरे , रणजित खलाटे महिला गटातून राजश्री कोकरे तर बारामती गटातून नेताजी गवारे
मोजणीला विलंब झाल्याने दुसरी फेरीची मतमोजणी पहाटे साडेपाच वाजता सुर झाल्याने निकाल उशिरा येण्याची शक्यता
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.