Maharashtra Live Update : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढच्या वर्षी होणार

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 9th December 2024 : आज सोमवार, दिनांक ०८ डिसेंबर २०२४. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, मंत्रिमंडळ विस्तार, बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 9 December 2024
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

MLA Disqualification Case  : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढच्या वर्षी होणार

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्रता प्रकरणी पुढच्या वर्षी सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सुनावणी होणार आहे. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नव्हतं, म्हणून दाखल याचिका केली होती

Nagpur News :  बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचार विरोधात आंदोलन

नागपुरात बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचार विरोधात आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काॕंग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून व्हेरायटी चौकत आंदोलन करण्यात आलं. नागपूरचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलनं केलं.

Ajit Pawar : आम्ही १४ तारखेला खातेवाटपासंदर्भात निर्णय घेणार, अजित पवारांची माहिती

आम्ही 14 तारखेला खाते वाटपासंदर्भात चर्चा करून निर्णय घेणार आहोत. अजित पवारांची साम टीव्हीला माहिती 'सोळा तारखेपासून अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या अगोदर आम्हाला खातेवाटप करावे लागेल. आज आम्ही तीन नेते चर्चा करू, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Maharashtra Politics : विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक संपली

विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक संपली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विरोधी पक्षातील जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड ही उपस्थित होते. १६ ते २१ डिसेंबर दरम्यान नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे.

jagdeep dhankhar : जगदीप धनखड यांच्या विरोधात इंडिया आघाडी अविश्वास प्रस्ताव आणणार

राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात इंडिया आघाडी अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. सभापती विरोधी पक्षांना बोलू देत नसून पक्षपातीपणा करत असल्याचा विरोधी खासदारांचा आरोप आहे.

Maharashtra Politics : संविधानावरील चर्चेला पंतप्रधान मोदी लोकसभेत उत्तर देणार

संविधानावरील चर्चेला पंतप्रधान मोदी लोकसभेत उत्तर देणार आहेत. पंतप्रधान मोदी १४ डिसेंबर रोजी लोकसभेत उत्तर देणार आहेत. गृहमंत्री अमित शहा राज्यसभेत संविधानावरील चर्चेला सुरुवात करणार आहेत. 13 आणि 14 डिसेंबर रोजी संविधानाच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त लोकसभेत चर्चा होणार आहे.

virar News : वसई विरार महानगरपालिका आयुक्तांना धमकीचा मेसेज

वसई विरार महानगरपालिकेत एकच खळबळ

वसई विरार महानगरपालिका आयुक्तांना धमकीचा मेसेज

पालिका प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांना व्हॉट्सपवर अश्लील मेसेज,बदनामी करण्याची धमकी

पालिका आयुक्तांचे फोटो मॉर्फ करून समाज माध्यमांवर केले प्रसिद्ध

Truck Accident : अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर ट्रकचा अपघात

अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील अक्कलकुवा गावाजवळ ट्रकचा अपघात झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कन्नड संभाजीनगर येथून गुजरातकडे जात असताना हा अपघात घडला आहे. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर ट्रक अनेक तासांपासून रस्त्यावर आहे.यामुळे अपघातग्रस्त ट्रक महामार्गावर आल्यानंतर वाहतूक अडथळा निर्माण झाला आहे.

Pune News : पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद

पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद असणार आहे. नवीन आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र,भामा आसखेड, वारजे, एसएनडीटी यासह अन्य ठिकाणी स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याने पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद असणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु होईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली.

Belagavi news : बेळगाव प्रकरणी शिवसेनेचे नेते गनिमीकावा करणार?

बेळगाव प्रकरणी शिवसेनेचे नेते गनिमीकावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेचे वरिष्ठ नेते उदय सामंत आणि शंभुराजे देसाई लवकरच बेळगावात जाणार आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसोबत झाली चर्चा

कर्नाटक सरकार ला अधिकृत पत्र देऊन परवानगी मागणा अन्यथा गनिमीकावा करणार...

हिवाळी अधिवेशनाच्या आधी शिवसेनेची बेळगाव प्रशी आक्रमक भूमिका दिसण्याची शक्यता..

Maharashtra Politics : राज्यपालांच्या अभिभाषणावर ठाकरे गटाचा बहिष्कार

राज्यपालांच्या अभिभाषणावर ठाकरे गटाने बहिष्कार टाकला आहे. बेळगाव प्रश्नावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Mahayuti Govenment News : नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी १३ डिसेंबरला होण्याची शक्यता

नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी १३ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. राजभवनात राज्यपाल नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहे. कालच्या बैठकीत १३ तारखेला शपथविधी घेण्यावर चर्चा आणि एकमत झाल्याची माहिती आहे. तसेच मंत्रिमंडळात किती व कोण कोण असणार यावर देखील चर्चा आणि निर्णय झाल्याचं बोललं जात आहे.

Maharashtra Live Update: विरोधीपक्षनेते पदावरून महाविकास आघाडी मध्ये मतभेद?

विधानसभा विरोधीपक्षनेते पदावरून महाविकास आघाडी मध्ये एकमत नाही?

विधानपरिषदेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोधी नेता असल्याने विधानसभेवर काँग्रेसचा विरोधी पक्षानेता असावा असा काँग्रेस नेत्यांचा सुर

जरी आमदारांची संख्या कमी असली तरीही काँग्रेस चेहरा देण्यासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती

Maharashtra Live Update: मुख्यमंत्री विश्वास व्यक्त प्रस्ताव एकमताने मांडण्यात आला, विश्वास प्रस्ताव बहुमताने मंजूर

देशातला पहिला ईव्हीएम विरोधातला ठराव साताऱ्यातील कोळेवाडीत

राज्यात ईव्हीएम हटाव देश बचावचा हल्लाबोल विरोधकाकडून केला जात असून मारकरवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर साताऱ्यातील कराड तालुक्यात देशातला पहिला ईव्हीएम विरोधतला ठरला कोळेवाडी येथे करण्यात आला आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात हा ठराव करण्यात आला असून येथून भाजपाचे डाँ. अतुल भोसले काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात निवडून आमदार झाले आहेत.

Thane Live News : मुरबाड शहरावर अज्ञात ड्रोनच्या घिरट्या

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहरावर मागील काही दिवसांपासून अज्ञात ड्रोन फिरत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करतायत.

Maharshtra: आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण

पुणे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण..

आमदार टिळेकर यांचे मामा सतिष वाघ यांचे शेवाळ वाडीतून अपहरण..

आज सकाळच्या सुमारास वाघ यांच्या सोलापूर रस्त्यावरील हॉटेल समोर थांबले असता.. चारचाकी शेवरलेट एन्जॉय या गाडीतून केलं अपहरण..

चार चाकी वाहनातून आलेल्या चौघा जणांनी वाघ यांचे केले अपहरण..

जालन्यात दिव्यांगांचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलक..

जालन्यात दिव्यांगांचे जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन

विविध मागण्यासाठी जालना जिल्ह्यातील दिव्यांग बांधव आक्रमक....

आक्रमक झालेले दिव्यांग बांधव थेट जिल्हाधिकारी कार्यालयात बसलेत..

दिव्यांग बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी.

आलिमको कंपनीकडून दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध करून द्यावी यासह दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये मानधन सुरू करावं यासह विविध मागण्यांसाठी दिव्यांगाचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू आहे..

मारकडवाडीला सगळे गेले, ते ग्रामस्थ म्हणाले की आम्ही आमचं बघतो, तुम्ही येऊ नका. उगाच मारकडवाडीला जाऊ नका, कार्यक्रम होईल - ईव्हीएम आरोपांवरून शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

मारकडवाडीत उद्या महायुती काँग्रेस आमने सामने येणार?

काँग्रेस चे प्रदेशअध्यक्ष नाना पटोले उद्या मारकडवाडीत

दुसऱ्या बाजूला, महायुती चे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत सुद्धा उद्या मारकडवाडीत जाणार

सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी EVM मशीनच्या मतदानावर घेतला आहे आक्षेप

नाना पटोले यांचे आभार, त्यांनी अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केले, तेव्हा गाडी सुटली. नाना आमचे मित्र आहेत, नाही म्हणाले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे. ना ना करते प्यार तुम्हीं से कर बैठे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत उद्या मारकडवाडील जाणार आहेत.   Evm बाबत आंदोलन सुरू असताना पडळकर व खोत उद्या जाऊन भेट घेणार

शेतशिवारात मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप हरभरा पिकांच मोठ्याप्रमाणात नुकसान 

शेगाव तालुक्यातील कालखेड, मनसगाव शेतशिवारात मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप हरभरा पिकांच मोठ्याप्रमाणात नुकसान करत आहेत वेळोवेळी परिसरातील शेतकऱ्यांनी वन्यजीव विभागाकडे तक्रार करूनही हरणांचा बंदोबस्त केला जात नसल्याने आता शेगाव तालुक्यातील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. शेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरण , नील गाय , रानटी डुक्कर यांचे मोठे कळप वावरत असून शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

अध्यक्ष महोदय, "मी पुन्हा येईल" असं तुम्ही म्हणाला नव्हता तरी तुम्ही परत आलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Live Update: राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला होता प्रस्ताव

Maharashtra Live Update: कर्नाटक पोलिसांची पुन्हा एकदा मराठी भाषिकांवर दडपशाही

कर्नाटक पोलिसांची पुन्हा एकदा मराठी भाषिकांवर दडपशाही

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व नेत्यांना बेळगाव पोलिसांनी केली अटक

बेळगाव इथं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याला बेळगाव जिल्हा प्रशासनाचा

सीमा भागामध्ये तणावाचं वातावरण

Maharashtra Live Update: राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार १४ डिसेंबरला होण्याची शक्यता

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार १४ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी बैठक करून मंत्रिपदाबाबत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेच्या जागांबाबत चर्चा केली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चांगली खाती मिळवण्यासाठी देखील प्रयत्न सुरु

टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत.. ढगाळ वातावरणाचा टोमॅटो पिकाला फटका

मागच्या आठ दिवसापासून लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.. वातावरणात झालेल्या बदलामुळे रब्बी पिकासह, टोमॅटो शेतीला मोठा फटका बसलाय.. टोमॅटो पिकाची फुल आणि पान करपण्याच प्रमाण अधिक वाढल्याने ,उत्पादनात मोठी घट झाली आहे.. तर तिकडे बाजारात टोमॅटोचे भाव पडल्याने देखिल शेतकरी आता दुहेरी अडचणीत सापडलाय. सध्या बाजारात टोमॅटोला 300 ते 400 रू प्रति कॅरेट भाव मिळतो आहे.. तर थेट शेतीच्या बांधावरून आढावा घेतलाय.

Maharashtra Live Update: शिवसेना आमदार यांची आज दुपारी महत्वाची बैठक

शिवसेना आमदार यांची आज दुपारी महत्वाची बैठक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आमदारांना मार्गदर्शन

शिवसेना विधीमंडळ कार्यालयात आमदारांची २ वा होणार बैठक

बैठकित हिवाळी अधिवेशनात कोण कोणत्या महत्वाच्या विषयावर चर्चा करायची

नवीन आमदारांना अधिवेशन कामकाज समजावून सांगण्याबाबत मार्गदर्शन केलं जाणार असल्याची माहिती

Maharashtra Live Update: पुण्यातील विधानसभेला पराभूत झालेले उमेदवार जाणार सुप्रीम कोर्टात

पुणे जिल्ह्यातील महा विकास आघाडी चे पराभूत उमेदवारांचा निर्णय

उद्या दिल्लीत आघाडीच्या उमेदवारांसह शरद पवार सुद्धा घेणार वकिलांची भेट

EVM विरोधात पराभूत उमेदवार करणार सुप्रीम कोर्टात याचिका

संजय जगताप, प्रशांत जगताप, रमेश बागवे यासह अनेक नेते उद्या दिल्लीत घेणार वकिलांची भेट

Maharashtra Live Update: नागपूरातील गनेशपेठ परिसरातील द्वारका हॅाटेलमध्ये बॅाम्ब असल्याचा मेल

- सकाळी साडेसहाच्या सुमारास हॉटेल मॅनेजरला बॉम्ब ठेवला असून 9:30 ला बॉम्ब स्फोट असल्याचा आला होता मेल

- अग्निशामक दल, पोलीस आणि बॅाम्बमाशक पथक घटनास्थळी पोहोचले

- पोलीसांकडून बॉम्ब चा शोध सुरू, हॉटेल मधील स्टाफ, गेस्ट यांना सुरक्षिततेच्या साठी बाहेर काढलं

- वरिष्ठ पोलीस अधिकारी हॉटेल परिसरात दाखल

- अजून हॉटेलमध्ये काही मिळालं नसून अफवा आहे की काही सत्यता हे थोड्या वेळात स्पष्ट होईल

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये दीड तास चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल रात्री उशिरा बैठक.

बैठकीत मंत्रिपदाबाबत व इतर खातं बाबत चर्चा झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती.

या बैठकीत शिवसेनेला 10 कॅबिनेट मंत्रीपद तर 3 राज्यमंत्री पदाबाबत निर्णय झाल्याची माहिती

खात्रीलायक सुत्रांची माहिती

धाराशिव जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा कांद्याला जोरदार फटका

:धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलय.जिल्ह्यातील धाराशिव,तुळजापूर, लोहारा आणि उमरगा तालुक्यात कांदा उत्पादनाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.शेतकऱ्यांनी शेतात कापून टाकलेला कांदा भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.तर शेतात उभा असलेला कांदा पावसामुळे जाग्यावरतीच खराब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालंय.धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी 59.5 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून जीवापाड जपलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाल्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.

अमरावती जिल्ह्यात रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या आंतर मशागतीला वेग

सध्या रब्बी हंगाम सुरू आहे आणि या रब्बी हंगामात अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गहू आणि हरभरा पिकाची लागवड केली आहे. दरम्यान सध्या आता हरभरा शेतात असून हरभरा पिकात आंतर मशागतीचे काम सध्या शेतकऱ्यांच्या वतीने सुरू आहे. बैलजोडीच्या माध्यमातून डवरणी करून हरभरा पिकाची अंतर मशागत सुरू असल्याचे चित्र सध्या पहाटेच्या थंडीत शेतामध्ये पाहायला मिळत आहे.

Pune News : पुणे विमानतळाने रेकॉर्ड मोडला, एकाच दिवशी १०२ उड्डाणे

पुण्यातील लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रविवारी दिवसातील सर्वाधिक १०२ उड्डाणे झाली.

या आधी एका दिवसात सर्वाधिक १०० उड्डाणे झाली होती.

पुणे विमानतळावरून आतापर्यंत दिवसाला साधारण १९० ते १९६ विमानांची ये-जा सुरू होती. त्यामधून साधारण ३० ते ३२ हजार प्रवासी प्रवास करतात.

उन्हाळी हंगाम तसेच सप्टेंबर २०२४ मध्ये दोन वेळा एकाच दिवसामध्ये १०० उड्डाणे झाली होती. तर, १०० विमाने पुण्यात आली.

हिवाळी हंगामध्ये पुणे विमानतळाला रविवार ते सोमवार दरम्यान विमानासाठी २१७ स्लॉट दिलेले आहेत. पण, त्याचा वापर विमान कंपन्यांकडून केला जात नव्हता.

प्रवाशांच्या सोईसाठी विमान कंपन्यांनी जास्तीत जास्त स्लॉटचा वापर करावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच, नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या देखील वाढली.

त्यामुळे रविवारी पुणे विमानतळावरून सर्वाधिक उड्डाणे

पुणे विमानतळावरील सुरक्षा कवच वाढवण्यात आले आहे

पुणे विमानतळावरील सुरक्षा कवच वाढवण्यात आले आहे

विमानतळावर आता ७१५ केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान तैनात

सी आय एस एफ जवांनाची संख्या वाढवल्याने सुरक्षा भक्कम

आधी ४९३ जवान होते तैनात

माञ आता पुणे विमानतळावरून प्रवाशांची वाढती संख्या लक्षा घेता ही सुरक्षा वाढ करण्यात आलीय.

कर्नाटक हिवाळी अधिवेशन मोठा पोलीस बंदोबस्त

कर्नाटक राज्याचं हिवाळी अधिवेशन आजपासून बेळगाव इथं सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण बेळगाव शहरांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. बेळगाव इथे अधिवेशन होत असल्याने सीमा भागातील मराठी भाषिकांच्या वतीने महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव मध्ये महामेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या महामेळाव्याला बेळगाव जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली असून महाराष्ट्रातून बेळगाव मध्ये येणाऱ्या नेत्यांवर देखील बंदी घातलेली आहे. या संपूर्ण परिस्थितीमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण शहरात ठीक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

Maharashtra Live Update: बेळगाव शहराला पोलीस छावणीचे स्वरूप

आजपासून बेळगाव इथं कर्नाटक सरकारचा हिवाळी अधिवेशन सुरू

तर महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगावात होणार महामेळावा

या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी बेळगाव शहरासह जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

Nanded Live News : नांदेड लोकसभा,विधानसभेच्या 75 केंद्रावर व्हीव्हीपॅट पडताळणी

लोकसभा आणि विधानसभेच्या 75 केंद्रावर व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात आलीय.या 75 केंद्रांवर ईव्हीम आणि व्हीव्हीपॅट मध्ये एकाही मताचा फरक आढळून आला नाही अशी माहिती जिल्हाधिकऱ्यांनी दिलीय.मतमोजणी प्रक्रिये दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच केंद्राच्या ईव्हीम मशीन वरील उमेदवार निहाय प्राप्त मतांची आकडेवारी ही व्हीव्हीपॅटशी जुळते का याची तपासणी केली जाते.लॉटरी पध्दतीने मतदान केंद्राची निवड केली जाते. नांदेड जिल्ह्यातील लोकसभेच्या 30 आणि विधानसभेच्या 45 आशा एकूण 75 केंद्रांची मतमोजणी बिनचूक असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Maharashtra Live Update: ८ आमदारांचा शपथविधी झालाच नाही

उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनिल शेळके

आज उर्वरित काही आमदार घेणार शपथ

काही आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घेणार शपथ

Maharashtra Live Update: थंडी पुन्हा परतली, नाशिक आणि निफाडमध्ये तापमानात मोठी घट

- थंडी पुन्हा परतली, नाशिक आणि निफाडमध्ये तापमानात मोठी घट

- तापमानात घट झाल्यानं नाशिक आणि निफाडकरांना भरली हुडहुडी

- निफाडमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात नीच्चांकी तापमानाची नोंद

- निफाडमध्ये किमान ६.७ अंश सेल्सिअस इतक्या नीच्चांकी तापमानाची नोंद

- तर नाशिकचा पारा ९.४ अंशावर घसरला

- कडाक्याच्या थंडीने निफाड, नाशिककर गारठले

Maharashtra Live Update: विधानसभेत मांडला जाणार विश्वासदर्शक ठराव

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर विश्वास व्यक्त करणारा ठराव आज मांडला जाणार आहे.

शिवसेनेचे उदय सामंत, भाजपचे डॉ संजय कुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील आणि अपक्ष रवी राणा हे आज ठराव मांडणार आहेत.

Maharashtra Breaking Live : दिल्लीतील दोन शाळांना बॉम्ब असल्याच्या धमक्या

दिल्लीतील दोन शाळांना बॉम्ब असल्याच्या धमक्या

शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या

आरके पुरममधील एक शाळा आणि पश्चिम विहारमधील एका शाळेला बॉम्ब असल्याचा आला मेल

शाळा प्रशासनाने मुलांना त्यांच्या घरी परत पाठवल

शाळा प्रशासनाकडून अग्निशमन आणि पोलिसा दलाल देण्यात आली माहिती

पुढील तपास सुरू

आरके पुरमच्या दिल्ली पब्लिक स्कूलला मिळाली धमकी

तर, पश्चिम विहारच्या जीडी गोएंका शाळेला मिळाली धमकी

यापूर्वी देखील दिल्लीतील शाळांना बॉम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे मेल आणि कॉल आले होते मात्र तपासात अशी कुठलीच घटना नसल्याचं निष्पन्न झालं होत

Maharashtra Breaking Live : नागपूरातील हिवाळी अधिवेशनाचे कामकाज एकच आठवडा

Summary

- नागपूरातील हिवाळी अधिवेशनाचे कामकाज एकच आठवडा असणार असल्याची शक्यता....

- १६ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार असल्याची शक्यता.. मुंबई अधिवेशन संपताच तारीख आज होणार स्पष्ट

- विदर्भाचे प्रश्न सुटावे त्यावर विधिमंडळात चर्चा व्हावी म्हणून दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेतले जाते..

- १२ डिसेंबरपासून सचिवालय नागपूरमध्ये दाखल होणार

- १५ डिसेंबरला संपूर्ण नवीन महायुती सरकार नागपुरात दाखल होईल

- अधिवेशन कालावधी कमी असल्यानं तारांकित प्रश्न मांडता येणार नसल्याची माहिती....

Maharashtra Breaking Live : आज बेळगाव मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा

बेळगाव जिल्ह्यात कोल्हापुरातील चार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांना बंदी

शिवसेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, सुनील शिंत्रे, सुनील मोदी या नेत्यांना दोन दिवस बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी

या शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्था संदर्भात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने बेळगाव प्रशासनाचा निर्णय

Maharashtra Breaking Live : राज्यात वाघाची संख्या वाढली.

राज्यात वाघाची संख्या वाढली.. विदर्भात सर्वाधिक वाघ.. संसदेत आकडेवारी जाहीर

महाराष्ट्रात 444 वाघाची संख्या.. विदर्भात 395 वाघ..

अमरावतीच्या राखीव वनात वाघांचा मुक्त संचार..

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प, 47 अभयारण्य, 9 संवर्धन राखीव क्षेत्र घोषित..

व्याघ्र प्रकल्पांमध्ये सोयी सुविधांचा अभाव..

वाघ प्रकल्प बाहेर संचार वाढल्याने मानव वन्यजीव संघर्ष तीव्र होण्याची भीती..

Maharashtra Breaking Live : भंडाऱ्यात अवकाळी पाऊस बरसला

मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात वातावरणात बदल झाल्यानं ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली होती. अचानक अवकाळी पावसाने भंडाऱ्यात हजेरी लावली. यामुळे मळणी करून ठेवलेल्या भात पिकाचं काही प्रमाणात नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर, या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे.

Maharashtra Breaking Live : जागतिक वारसा स्थळात लोणार सरोवराच्या समावेशांच्या हालचालींना वेग

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये लोणार सरोवराचा समावेश व्हावा या दृष्टीने आता प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला असून कालच अमरावती विभागीय आयुक्त यांनी लोणार येथे भेट देऊन पुरातत्व विभाग , नगरपालिका , वन्यजीव विभाग , महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अधिकाऱ्यांची बैठक घेतली... 2020 मध्ये लोणार सरोवराला "रामसर दर्जा " मिळालेला आहे . आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये लोणार सरोवराचा समावेश व्हावा यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच दिल्ली येथे युनेस्को ची जागतिक वारसा समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीत राज्य शासनाकडून हा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी यावेळी दिली..

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates : जळगाव जिल्ह्यात थंडीचे कमबॅक ११ अंशावर

गेल्या आठवडाभरात बंगालच्या उपसागरावर आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील थंडी गायब झाली होती. मात्र, आता फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव पूर्णपणे कमी झाल्यामुळे जिल्ह्यासह राज्यात निर्माण झालेले ढगाळ वातावरण कमी होऊन, कोरडे हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ झाली असून, रविवारी जळगाव शहराचा पारा ११ अंशांवर आला होता. शुक्रवारी जळगाव शहराचा रात्रीचा पारा १८ अंशांपर्यंत गेला होता. मात्र, आता उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यात थंडीचे पुनरागमन झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com