Maharashtra Live News Update: आदिवासी समाज संघटना, आमदार आणि मंत्र्यांची आदिवासी समाजाच्या आरक्षणाबाबत बैठक संपन्न

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२५, महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, सोलापूर-बीड-धाराशिवमध्ये पूरस्थिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा पूरग्रस्त भागात दौरा, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वांद्चेर फडणवीस उद्या पुरस अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

Pune : पुण्यातील सारसबाग महालक्ष्मी मंदिरात आरती पार पडली, दिग्गजांची लाभली हजेरी 

पुण्यातील सारसबाग महालक्ष्मी मंदिरात आज तिसऱ्या दिवशी आरती पार पडली.आज दुसऱ्या दिवसाची आरती विद्या नरसिंह भारती शंकराचार्य स्वामी करवीर पीठ ,कोल्हापूर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू यांचा हस्ते महालक्ष्मी देवीची आरती करण्यात आली.यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

आदिवासी समाज संघटना, आमदार आणि मंत्र्यांची आदिवासी समाजाच्या आरक्षणाबाबत बैठक संपन्न

आदिवासी समाजाच्या प्रश्ना आरक्षणासंदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी मोर्चे सुरू आहेत अनेक ठिकाणी मोर्चे काढले जाणार आहेत. आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी हे मोर्चे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काढले जाणार आहेत. तसेच आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये बंजारा समाज धनगर समाज आरक्षणामध्ये येऊ नये या दृष्टीने कायदेशीर लढाई लढली जाणार आहे. हैदराबादच्या गॅजेटमध्ये संदर्भ देऊन आरक्षणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न बंजारा समाजाकडून केला जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली पूरग्रस्त गावांची पाहणी

ज्या ठिकाणी चार चाकी वाहन पोहोचत नव्हती त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुचाकी वर जाऊन केली शेतीची पाहणी. ..

कोणत्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवणार नाही कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही.

रस्त्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याचं टॉवरवर चढून शोले आंदोलन

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ शेत शिवारात पांदण रस्त्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याचं टॉवरवर चढून शोले आंदोलन केले.2019 पासून शेतकऱ्याला पांदण रस्ता मिळत नसल्याने त्याचा येण्या-जाण्याचा मार्ग झाला बंद.

तीन वेळा प्रशासनाने रस्ता देण्याच्या नोटीस दिल्या असताना रस्ता मिळत नसल्याने शेतकऱ्याचं शोले आंदोलन

जोपर्यंत रस्ता मिळत नाही तोपर्यंत टावर वरून खाली उतरणार नसल्याचा इशारा

गोपाल निचत असे या शेतकऱ्याचे नाव आहे.. हा शेतकरी टावर वर चढल्याने परिसरातील नागरिक आणि पोलिसांची टावर खाली गर्दी.

Buldhana : बुलढाणा जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची पोलिसात तक्रार

महाराष्ट्र सह बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली शेतकरी पूर्णतः खचून गेला शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने तात्काळ मदतीची गरज असतांना बुलडाणा जिल्ह्याला 2 पालकमंत्री आहेत मात्र त्यातील एकही पालकमंत्री अजूनही जिल्ह्यात दाखल झाला नाही त्यामुळे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली असून चक्क शोधून देणार्याला 11 रुपये बक्षिस ही ठेवण्यात आले आहे.

Pune : पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

शरद पवार यांच्या हस्ते पार पडणार सोशल रिसर्च सेंटरच उद्घाटन

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे देखील कार्यक्रमाला उपस्थित

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर या उद्घाटनासह भारतीय संविधान संसदीय लोकशाही पुढील आव्हाने या विषयावर शरद पवार उपस्थितांना करणार मार्गदर्शन

Kolhapur : करवीर निवासीनी श्री अंबाबाई देवीची श्री तारा माता रूपात पूजा

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात अंबाबाई ची वेगवेगळ्या रूपांमध्ये आकर्षक पूजा बांधण्यात येते. आज तिसऱ्या माळेला अंबाबाईची श्री तारा माता रूपात पूजा बांधण्यात आली आहे.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची आज श्री तारा मातेच्या रूपामध्ये आकर्षक पूजा बांधण्यात आली आहे. श्रीतारा मातेचा डावा पाय शवावर असून, ही भयानक हास्य करीत आहे. हिच्या चार हातात खड्ग, नीलकमळ, कात्री आणि खप्पर असून, हिचा जटालाप पिंगट छटेचा असून तो नागयुगुलांनी युक्त आहे.

मुंडमाला धारण करणारी, सर्व जडत्व, नैराश्य, दारिद्र्य खप्परात खेचणारी ही दिव्य देवता आहे. ही दशमहाविद्यालयातील द्वितीय देवता असून, कालीकुलातील पूर्वाम्नायपीठ देवता आहे. चैत्रशुद्ध नवमीला हिची उत्त्पती झाली. हिचा भैरव अक्षोभ्यरुद्र आहे. आजची करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

Dharashiv : भूम तालुक्यातील वालवड येथे फुटलेल्या तलावाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पहाणी

लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंताला लवकरात लवकर तलाव दुरुस्ती करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

भूम तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने वालवड परिसरातील अनेक तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान

Yavatmal : आदिवासींच्या जमिनी गैर-आदिवासींना भाडे तत्त्वावर देण्याचा डाव - माजी मंत्री वसंतराव पुरके

आदिवासींच्या जमिनी गैर-आदिवासींना भाडे तत्त्वावर देण्याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली. हा प्रकार आदिवासीसमाजाच्या जमिनी लाटण्याचा आहे, हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीं, असा इशारा माजी मंत्री तथा काँग्रेसचे नेते प्रा.वसंतराव पुरके यांनी यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

सरकारतर्फे प्रस्तावित केलेल्या अन्यायकारक कायद्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून असा घातक निर्णय घेऊ नये अशी मागणी केल्याचे माजी मंत्री पुरके यांनी सांगितले.

आदिवासींच्या जमिनी लाटण्यात येत असतील तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आदिवासी समाजाच्या जमिनी घेऊन कुंपण शेत खात असल्याचा आरोपही माजी मंत्री पुरके यांनी केला

Dharashiv Flood : पूर ओसरल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उन्हात वाळवली ओली झालेली कागदपत्रे

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील लाखी गाव पूर्ण पाण्यात होते. त्यामुळे घरातील सर्व साहित्य भिजून गेले आहे. काही घरातील साहित्य वाहून गेले आहे.

गावातील शाळेतील सर्वच खोल्यात चिखल झाला आहे. त्यात विद्यार्थ्यांचे जुने नवे सगळी कागदपत्रे भिजली आहेत.

पाणी ओसरल्यावर आता शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही वाचवण्याचा प्रयत्न करतायत तर गावकरी थोडे उन पडले असल्यानं भिजलेली ज्वारी वाळू घालत आहेत.

Latur : लातूरच्या औराद शहाजनी भागातील नुकसानीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

लातूरच्या निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी भागात मांजर आणि तेरणा नदीच्या संगमामुळे , प्रचंड मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो हेक्टर शेती पिक पाण्यात आहेत, या नुकसानग्रस्त शेती पिकांचे पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. संभाजी पाटील निलंगेकर, यांनी केली आहे.

Akola : अकोला जिल्ह्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

अकोला जिल्ह्यात पुढील 5 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. अकोला शहरासह ग्रामीण भागात अर्थातचं जिल्ह्याभरात आजपासून पुढील 28 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रा हा अंदाज वर्तविलाय. पावसामुळे नदी, नाले व तलाव यामध्ये जलसाठा जमा झाला आहे. अनावश्यकपणे पाण्यात जाण्याचे धाडस करू नये. नदी, अज्ञात किंवा खोल पाण्यात जाऊ नका. विजेच्या तारा आणि गटारींपासून दूर राहा. नदी, तलाव, धरण याठिकाणी अनावश्यकपणे जाऊ नये.

पुरग्रस्त भागातून वाहने नेऊ नका. कारण पुराच्या पाण्यामुळे रस्त्यांचा अंदाज येत नाही. अवघ्या अर्धा मीटर पाण्यामध्ये वाहून जाण्याची शक्यता आहे. पुरस्थितीच्या अनुषंगाने पाणीसाठ्याजवळ सेल्फी काढण्याचा मोह करू नये. विज, वारा व पाण्यापासून बचावाकरिता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. अशास्‍थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. नदीकाठाजवळील गावातील ग्रामस्थांना सतर्कतेची सुचना देण्यात आले आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलंय

अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा- जरांगेंची मागणी

अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा तात्काळ मदत न करता मदत देण्यास दिरंगाई करु नका अस जरांगे पाटील म्हणाले.भूम परंडा तालुक्यात चिंचपुर ढगे व बेलगाव परिसरातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या भागांना भेट देऊन शेतकऱ्यांची व्यथा प्रत्यक्ष ऐकून घेतली.या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

नांदेड ते भोकर महामार्गावर प्रवासी चारचाकी गाडीने मेंढ्यांना चिरडले

नांदेड ते भोकर या महामार्गावर मेंढ्यांच्या कळपात एक प्रवासी टाटा मॅजिक शिरल्याने मोठा अपघात घडला. या प्रवासी टाटा मॅजिक ने मेंढ्यांना चिरडले.या अपघातात 16 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला तर पंधरा मेंढ्या जखमी झाल्या आहेत. यात मेंढपाळाचे सात ते आठ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.माधव गुंटे हे नांदेडच्या मुदखेड येथील मेंढपाळ असून रस्त्याच्या कडेने मेंढ्या घेऊन जात होते. टाटा मॅजिक चालकाचे नियंत्रण सुटले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवासी टाटा मॅजिक चक्क मेंढ्यांच्या कळपात शिरली. मेंढपाळाच्या डोळ्यासमोरच मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने मेंढपाळाला अश्रू अनावर झाले.

पुण्यात डबलडेकर बसची चार मार्गावर यशस्वी चाचणी

पीएमपीएलने पुण्यातील चार मार्गावर इलेक्ट्रिक डबल डेकर बस चाचणी सुरू होऊन आठ दिवस झाले.चार मार्गावर काही ठिकाणी झाडांच्या फांद्याचा अडथळा सोडल्यास चाचणी यशस्वी झाले आहे.त्यामुळे पीएमपीकडून महापालिकेत या मार्गावरील फांद्या काढण्याची याची मागणी केली जाणार आहे.

शहरातील हिंजवडी फेज थ्री वर्तुळ, रामवाडी मेट्रो स्टेशन ते खराडी,मगरपट्टा सिटी ते कल्याण नगर मेट्रो स्टेशन,पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ मार्गे विमान नगर अशा मार्गावर चाचणी सुरू आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावात अडकलेल्या दोघांना सुखरूप वाचवलं

सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीत जाऊन या लोकांची सुटका केली

मागील काही तासापासून हे दोघे एका पेट्रोलपम्पवर अडकून होते

मात्र बचाव पथकाने त्यांची सुखरूप सुटका केलीय

सोलापूर जिल्हा मध्ये आलेल्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सांगली जिल्ह्यातून बचाव पथक आलं आहे.

Solapur: सीना नदीने रौद्ररुप केलं धारण, नांदगाव गावाला बसला पाण्याचा वेढा

सोलापूर -

सीना नदीने रौद्ररुप धारण केल्याने मोहोळ तालुक्यातील नांदगाव गावाला बसला पाण्याचा वेढा

नांदगाव मधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु

नांदगाव मधील ग्रामस्थ्यांना रेस्क्यू करण्यासाठी आपदा मित्रांच्या दोन टीम झाल्या दाखल

वृद्ध,लहान मुलं आणि ग्रामस्थांना आपदा मित्र स्वतः चा जीव धोक्यात घालून बोटीच्या साहाय्याने हलवत आहेत सुरक्षितस्थळी

Nanded: गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, शहरातील खडकपुरा भागात शिरले पाणी

नांदेड -

गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

गोदावरी नदीच्या पुराचे पाणी नांदेड शहरातील खडकपुरा भागात शिरले.

या भागात आलेल्या पुराच्या पाण्यात एक तरुण बुडाल.

स्थानिक नागरिकांनी या तरुणाला वाचवण्याचा केला प्रयत्न.

परंतु स्थानिक नागरिकांना या तरुणाला वाचवण्यात आले अपयश.

मिनाज खान असं या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव.

Yavatmal: यवतमाळमध्ये बंजारा बांधवांचे तहसीलदाराविरोधात रास्तारोको आंदोलन

यवतमाळ -

यवतमाळच्या आर्णी तहसीलसमोर बंजारा बांधवांचा तहसीलदाराविरोधात रास्तारोको आंदोलन

आज यवतमाळच्या आर्णी येथे एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने आर्णी शहरात बंजारासमाजातील पुरूष आणि महिलांनी सहभाग घेतला होता.

Solapur: सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतूकसाठी बंद, हत्तूर पूल पूर्णतः पाण्याखाली गेला

सोलापूर -

सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतूकसाठी बंद

सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तूर पूल पूर्णतः पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद

सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने रस्त्यावर लागल्या लांबच लांब रांगा

सीना नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने वाहतूक खोळंबली

Devendra Fadnavis: माढामध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला

माढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा अडवण्यात आला आहे. माढ्यात शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घेराव घातला आहे.

पुरंदर विमानतळाच्या जागा हस्तांतरण मार्ग मोकळा

पुरंदर विमानतळासाठी सुमारे 3000 एकर जमीन घेण्याचे नियोजन आहे.त्यापैकी 2 हजार 700 पेक्षा अधिक जमीन देण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे.त्यामुळे विमानतळ प्रकल्पात 100% शेतकरी संमती देत आहेत.94% शेतकऱ्यांनी दिली संमती..

पुरंदर विमानतळासाठी आता सातही गावांमधून संमती देणाऱ्यांची संख्या वाढली आहे.संमतीस मुदत वाढ दिल्यानंतर कालपर्यंत 94 टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. त्यामुळे शुक्रवारपासून मोजणी होणार आहे 20 ऑक्टोबर पर्यंत मोजणी पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.

Pankaja Munde: पंकजा मुंडे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाला असून याचा फटका बीडच्या गेवराई तालुक्यातील धोंडराई गावाला ही बसला आहे. याचीच पाणी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले असून त्यांच्यासोबत आमदार विजयसिंह पंडित शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले असून पाहणी करत आहेत.

Dattatray Bharne: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी...

गेल्या आठ दिवसात दोनदा अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात..

अहिल्यानगर जिल्ह्यातील 2 लाख 30 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती...

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले कृषीमंत्री..

भाजप आमदार मोनिका राजळे देखील दौऱ्यात सहभागी...

Dharashiv: पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो

पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीला देण्यात आलेल्या किटवर

एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो

धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा तालुक्यात मोठ्या नुकसान

नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीसाठी देण्यात आलेली आहेत किट

पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो

Parbhani: परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हाहाकार

परभणी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे होत्याचं नव्हतं झाले आहे त्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे ज्या पिकावर शेतकऱ्यांचे पुढचे नियोजन असते तेच पीक हातातून गेले आहे ज्या पिकामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळी दसरा लेकरा बाळांचे शिक्षण होते तेच पीक हातातून गेलं व ज्या पिकाला घेण्यासाठी व्याजाने पैसे घेतले होते ते पैसे कसे द्यायचे असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांचे डोळे आता फक्त शासनाच्या मदतीकडे लागले आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे

Maharashtra Weather: २६ सप्टेंबरपासून मुसळधार पाऊस

महाराष्ट्रासाठी जोरदार पावसाचा इशारा

मराठवाडा, विदर्भ, कोकण

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन पश्चिमेकडे सरकणार आहे. यामुळे पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस होणार असून २७ – २९ सप्टेंबर हा काळ सर्वाधिक तीव्रतेचा राहणार आहे.

मराठवाडा, मध्यम महाराष्ट्र

या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पाण्याचा साठा व स्थानिक पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

पुणे

२८ – २९ सप्टेंबर दरम्यान पुण्यातही जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे, कारण या काळात पुण्याजवळ वातचक्र (vortex) सक्रिय राहील.

Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

वांगणी बदलापूर दरम्यान लोकल खाली दोन म्हशी अडकल्यामुळे बदलापूर ते कर्जत दरम्यानची अप दिशेवरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Kandivali: कांदिवलीत भीषण आग, सात जण गंभीर जखमी

कांदिवली (पूर्व) येथे मिलिटरी रोडवरील राम किसन मेस्त्री चाळीत आज सकाळी लागलेल्या आगीत सात जण गंभीर जखमी झाले. ही आग सकाळी ९.०५ वाजता लागली होती. मुम्बई अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.आग ग्राउंड +१ मजल्याच्या दुकानात लागली होती. घरातील वीजजोडणी, एलपीजी गॅस सिलिंडर लिकेज् झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.आगीत सात जण भाजले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि समता नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Beed: ओबीसी नेते लक्ष्मण हाके पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन देणार

बीडच्या माजलगाव मध्ये हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या लक्ष्मण हाके समर्थक पवन करवर याला काही तरुणांकडून अमानुष मारहाण झाली आहे या घटनेच्या निषेधार्थ आणि तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यासाठी स्वतः ओबीसी नेते लक्ष्मण हाके पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले असून त्यांच्यासोबत समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे तात्काळ कार्यवाही करून आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुल येथे "आत्मनिर्भर भारत" या संकल्पनेचे उद्घाटन

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुल येथे "आत्मनिर्भर भारत" या संकल्पनेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी बलून हवेत सोडण्यात आला.

विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवून आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केले.

डोंबिवलीत भाजप–काँग्रेस संघर्ष पेटला!

डोंबिवलीत काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्षाने चांगलाच उग्र वळण घेतलं आहे. ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते प्रकाश उर्फ मामा पगारे यांना भाजप कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने साडी नेसवली, या प्रकरणावरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप उसळलाय.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेतली. भाजप पदाधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी काँग्रेसकडून करण्यात आली.याचबरोबर, भाजपवर कारवाई लांबली तर काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशाराही सचिन पोटे यांनी दिला.या संपूर्ण प्रकरणामुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापलं असून पुढील काही दिवसांत काँग्रेस-भाजप संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

Dharashiv: ओला दुष्काळ जाहीर करा,वालवड येथील शेतकऱ्यांची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार आज वालवड गावाला देणार भेट, नुकसानीची करणार पाहणी

गावातील दुधना नदीला आलेल्या पुरामुळे सोयाबीन,व शेत जमीध खरवडुन गेल्याने मोठ नुकसान

अनेकांची जनावरे,मोटारसायकल ही गेली वाहुन

सरकारने कर्जमाफी करुन झालेल्या नुकसानीचे तातडीने भरपाई देण्याची गावकऱ्यांची मागणी

Metro 7: मेट्रो दोन तासांपासून खोळंबली, मुंबईकरांची कोंडी

मेट्रो-७ च्या रेड लाईन मार्गावर गोंधळ निर्माण झाला आहे. गुंदवलीकडे जाणाऱ्या मेट्रोला ओवरीपाडा स्थानकापूर्वी तांत्रिक अडचण निर्माण झाली. सकाळी ८ वाजल्यापासून प्रवाशांना मेट्रो वेळेत येत नसल्यामुळे अडचणींचा सामना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील दोन तासांपासून मेट्रो खोळबंली आहे. मेट्रो बंद असल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता आहे.

Dharashiv: धाराशिव जिल्ह्यातील वालवड येथील शेतामध्ये सहा फुटांचे खड्डे

दुधनी नदीला आलेल्या पुरात शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकासह जमिनी गेल्या वाहून

शेतकरी अमोल शिंदे यांच्या शेतामध्ये सहाफुटाचे खड्डे तर सहा एकरातील सोयाबीन मातीमोल

शेतकऱ्यांचे २५ लाखांचे नुकसान

उपमुख्यमंत्री अजित पवार याच वालवड येथील नुकसानी ची करणार पाहणी

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस! रस्ते पूल वाहून गेल्याने ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास

अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागाला पावसाने चांगलेच झोपले असून अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत त्यामुळे गावांचा संपर्क तुटला असून गावातील नागरिकांना गावाबाहेर जाण्यासाठी धोकादायक प्रवास करून गावाबाहेर पडावे लागत आहेत शेवगाव तालुक्यातील प्रभू वाडगाव या गावाला मुख्य मार्गावरून जोडणारा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्यामुळे गावातील वयोवृध्द ग्रामस्थांना पाण्यातूनच मार्ग काढून जीवावर उदार होऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्याचे काम व पुलाचे काम करून तात्पुरता वाहतुकीसाठी रस्ता करून द्यावा अशी मागणी प्रभू वाडगाव ग्रामस्थानी केली आहे

Pune: पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात छताचा भाग कोसळला

सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचा सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराची दिवसागणिक दुरवस्था होत चाललेली आहे. लाखो रुपये देखभाल दुरुस्तीवर खर्च करून देखील ही दुरवस्था कायम आहे. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनाच्या छताचा भाग कोसळला असल्याचा आरोप आता करण्यात येतोय. बालगंधर्व मधील कला दालनातील पीओपीचे फॉल सिलिंग खाली कोसळले. सुदैवाने यावेळी दालनात कोणी नसल्याने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

पतित पावन संघटनेने या घटनेला कारणीभूत असलेल्या ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. दुसऱ्या बाजूला, पुणे महापालिकेने या घटनेची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी कला दालनाची पाहणी केली आहे...

Metro 7: मेट्रो-७ च्या रेडलाईन मार्गावर गोंधळ

मेट्रो-७ च्या रेडलाईन मार्गावर गोंधळ निर्माण झाला आहे. गुंडवलीकडे जाणाऱ्या मेट्रोला ओव्हरीपाडा स्थानकापूर्वी तांत्रिक अडचण निर्माण झाली. सकाळी ८ वाजल्यापासून प्रवाशांना मेट्रो वेळेत येत नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मेट्रो बंद असल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता आहे.

Beed: धक्कादायक !10 वर्षाचा चिमुकला गेला पुराच्या पाण्यात गेला वाहून

बीडमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि धुवाधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे पुराच्या पाण्यात पिंपळवाडी येथील दहा वर्षाचा आदित्य कळसाने हा वाहून गेला आणि त्याच्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने पिंपळवाडी गावावर आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबीय आज रोजी ढसाढसा रडत आहे आमच्या सर्वस्व गेलं आहे आता मदत मागून तरी काय उपयोग मात्र काहीतरी दिलं पाहिजे

Nashik: नाशिकच्या पाईपलाईन रोडवर रेशन कार्ड आढळल्याने खळबळ

- रेशन कार्ड नेमके कुणी फेकले, याबाबत शोध सुरू

- रस्त्यावर अचानक फेकलेले रेशनकार्ड आढळल्याने चर्चना उधाण

- रात्रीच्या सुमारास रेशन कार्ड फेकून आज्ञातांनी पळ काढल्याची स्थानिकांची माहिती

Beed: संतोष देशमुख खून प्रकरणाची १५वी सुनावणी आज होणार

संतोष देशमुख खून प्रकरणाची 15 वी सुनावणी आज जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडणार...!

संतोष देशमुख खून प्रकरणातील 15 व्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आजही सुनावणी सकाळी 11 वाजता जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडणार आहे.

Shirur: पुण्याच्या शिरूर शहरात पहाटेच्या सुमारास चोरट्यांचा सराफ दुकानावर दरोडा

शिरुर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सरदार पेठेतील अमोल ज्वेलर्स हे सोन्याचे दुकानात कार मधून आलेल्या चार चोरट्यांनी दरोडा टाकत लाखो रुपयांचा ऐवज सोने चांदीचे दागिण्यांवर हात मारलाय नेलंय,यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास केलाय यावेळी शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर पोलीस दाखल होऊन दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलीसांच्या दोन टिम तैनात केल्यात

Jalgaon: सुवर्णभरारी १,१५,००० च्या दिशेने दोनच दिवसांत तीन हजारांनी वाढले भाव

जळगाव नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दोनच दिवसांत सोने-चांदीची मोठी भाववाढ झाली आहे. मंगळवारी सोन्याच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ते एक लाख १४ हजार ४०० रुपयांवर पोहोचले आहे. चांदीच्याही भावात एक हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ३६ हजार रुपयांवर पोहोचली. दोन दिवसांत सोने दोन हजार ९५० रुपयांनी, तर चांदी चार हजार ५०० रुपयांनी वधारली.

nashik-malegaon-सततच्या पावसाने मातीचा पाझर तलाव फुटला

नाशिकच्या माळमाथा गावात गेल्या तीन-चार दिवसां पासून सतत पाऊस पडल्याने शेती पिकांचे नुकसान झाले असून भिलकोट येथे काल संध्याकाळच्या सुमारास जोरदार पावसामुळे मातीचा पाझर तलाव अचानक फुटल्याने तलावा लगत असलेल्या फकिरा सोनवणे यांच्या शेतात पाणी घुसल्याने त्यांच्या शेत पिकांसह संपुर्ण माती वाहून गेली तर पाण्याच्या प्रवाहात माती वाहून आल्याने विहिर मातीने पुर्णत भरुन गेली असून शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

Maharashtra Live News Update: सोलापूर-कोल्हापूर महामार्ग बंद, तिऱ्हे पूल पाण्याखाली

सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सोलापूर - कोल्हापूर महामार्गवरील तिऱ्हे पूल गेला पाण्याखाली

तिऱ्हे पूल पाण्याखाली गेल्याने सोलापूर - कोल्हापूर वाहतूक झाली ठप्प

तिऱ्हे परिसरातील दुकाने,बँका, गेल्या पाण्याखाली

तिऱ्हे गाव परिसरातील नागरिकांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

JALNA : पालकमंत्री पंकजा मुंडे आज जालना दौऱ्यावर; परतूर तालुक्यातल्या गोळेगाव येथे पाहणी करणार..

पालकमंत्री पंकजा मुंडे आज जालना दौऱ्यावर; परतूर तालुक्यातल्या गोळेगाव येथे पाहणी करणार..

नुकसानीची पाहणी करून गावकऱ्यांसोबत साधनार संवाद आणि घेणार सविस्तर माहिती

गोदावरी नदीच्या पुराचे पाणी गोळेगावच्या चारही बाजूने गावात घुसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं होतं

 मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आणि या नदीच्या पाण्यामुळे नदीकाठी असलेल्या गोळेगावला पुराच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वेढा बसला होता

पुराच्या पाण्याचा वेढा बसल्यानंतर गावकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाल्यामुळे मध्यरात्रीच जवळपास अडीच ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या गोळेगाव मधील नागरिक शेजारच्या लोणी गाव मध्ये स्थलांतरित झाले होते

JALGOAN ; हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान पंचनामे सुरू; पाचोऱ्यात ४३१, भडगावात ३४१ घरे बाधित

पाचोरा भडगाव, दोन्ही तालुक्यांत दोन दिवस सलग झालेल्या मुसळधार पावसाने हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असून, आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार पाचोरा तालुक्यात ४३१, तर भडगाव तालुक्यात ३४१ घरांचे नुकसान झाल्याची नोंद झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू आजही थांबू शकले नाहीत, इतकी विदारक परिस्थिती शेतीबाबत झाल्याचे नुकसानीवरून दिसून येत आहे.

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत भडगाव तालुक्यातील २२ हजार ४९३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो. पिंपळगाव बुद्रुक (ता. भडगाव) येथील शेतकरी अमोल ईश्वर पाटील यांच्या पाच शेळ्या नाल्याच्या पाण्यात पाहून गेल्याने दगावल्या.

SOLAPUR | सोलापुरातील सीना नदीच्या महापुराचा एसटी वाहतुकीला फटका, सोलापुरातील एसटी वाहतूक ठप्प.

Summary

सोलापुरातील सीना नदीच्या महापुराचा एसटी वाहतुकीला फटका, सोलापुरातील एसटी वाहतूक ठप्प.

- सोलापुरातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक महामार्ग बंद झाल्यामुळे इतर भागाशी संपर्क तुटल्यामुळे एसटीची चाकं थांबली.

- पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई आणि विदर्भात जाणाऱ्या एसटी बसेस सोलापुरात अडकून.. 

- सोलापुरातून इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

- मराठवाड्यातून आलेल्या प्रवाशांना पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, मुंबई जाणारी वाहतूक रद्द झाल्यामुळे सोलापूर एसटी स्थानकावर बसण्याचे अली वेळ.

LATUR : उजनी गावाला आजही पुराच्या पाण्याचा फटका, पाण्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा बंद. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी.

 लातूरच्या औसा तालुक्यातील उजनी गावात तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे जवळपास 60 घर पाण्यात गेली आहेत. तर उजनी परिसरातील 600 एकर क्षेत्रावरील पिकांना देखील फटका बसलाय, गावात पाणी आल्याने, विद्यार्थ्यांची शाळा देखील बंद आहे. दरम्यान याचा आढावा घेतला आहे

नागपूरसहित विदर्भावर पुन्हा अतिवृष्टीचे संकट

- 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान कमी दाब प्रभावामुळे संपूर्ण विदर्भात अतिजोरदार मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पावसाळी वातावरण तयार होत आहे...या काळात अतिवृष्टीसह गारपीट होण्याची ही शक्यता

- नागरिकांनी विशेष करून शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन.

- मान्सूनचा परतीचा प्रवास 10 आक्टोबर नंतर होण्याची शक्यता.

LATUR : ढोकी गावातल्या अनेक घरांमध्ये पाणी, जनजीवन विस्कळीत, सगळा संसार पाण्यात.

लातूरच्या ढोकी परिसरात देखील मध्यरात्री तुफान पाऊस झाला आहे, पावसामुळे गावातल्या काही  घरांमध्ये पाण्याचे ढव साचले आहेत, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले, नागरिकांचा संसार पाण्यात तरंगतो आहे. नागरिकांना तात्पुरतं डोकी गावातील ग्रामपंचायत आणि मंदिरात करण्यात आली आहे ,तर आजही जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

JALNA : , प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जालन्यातील हजारो नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित,

जालन्यातील हजारो नुकसानग्रस्त शेतकरी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मदतीपासून वंचित राहिले आहेत.प्रशासनाने जुलै आणि ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा पंचनाम्यांचा अहवाल उशिरा पाठवल्याने दुसऱ्या टप्प्यातील अनुदानापासून जालन्यातील नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहिले आहेत.काल राज्य सरकारने मराठवाड्यातील इतर जिल्ह्याना मदत जाहीर, केली आहे.जालना जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे 12 हजार 215 हेक्टरवरील पिके बाधित झाली होती. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळ एकीकडे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असताना जालना जिल्हा दुसऱ्या टप्प्यातील अनुदानापासून वंचित राहिला आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा शासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत तर प्रशासनाने वेळेवर पंचनाम्याचा अहवाल शासनाला सादर न केल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहिलेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या अजब कारभारामुळ शेतकऱ्यांमध्ये संतप्त आहेत. काल राज्यसरकारने मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांना मदत जाहीर केल्यानंतर आता जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे जालना जिल्हा दौऱ्यावर , नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी*

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत.जालन्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा आणि अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरामध्ये ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीपातील पिकांचे अतोनात नुकसान झाला आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. यावर कृषिमंत्री काही बोलतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे..

Monsoon Rain Maharashtra: शुक्रवारपासून पुन्हा पाऊस वाढणार; पुढील ५ दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता

राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह पाऊस हजेरी लावत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पुढील ५ दिवस राज्यातील काही भागातही पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

आज राज्यभारात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

JALGAON | भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसराला पावसाने जोरदार झोडपले, वरणगावच्या भोगावती नदीला पूर, अनेक दुकानांमध्ये पाणीच पाणी

भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला त्यामुळे वरणगाव शहराच्या मध्यभागातून वाहणार्या भोगावती नदीला पूर आला आहे, नदी लगत असणाऱ्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदाराची तारांबळ उडाली. 

भुसावळ तालुक्यातील वरणगाव सुश्री पिंपळगाव आचेगाव तळवेल हातनुर पुलगाव या भागामध्ये आज रात्री अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यामध्ये आलेल्या पावसाने हातात तोंडाशी आलेली पिके हे पाण्यात वाहून गेली आहेत ,वरणगाव शहराच्या मध्यभागातून वाहणारी भोगावती नदीलाही पूर आला आहे, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे ,पुराचे पाणी नदीलगत असणाऱ्या दुकानांमध्ये घुसल्याने लाखो रुपयाचे दुकानदाराचे यामध्ये नुकसान झाले आहे.

हिंगोली मधील भांडेगाव गोळीबाराने हादरले, 20 वर्षाचा तरुण ठार दोघे गंभीर जखमी

हिंगोली जिल्हा गोळीबाराच्या घटनेने हादरला आहे , हिंगोली तालुक्यातील भांडेगाव मध्ये रात्रीच्या सुमारास जुन्या वादातून एका व्यक्तीने तिघांवर बेधुंद गोळीबार केला आहे, या घटनेत वीस वर्षाचा तरुण जागीच ठार झाला आहे तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान शिवराज कुंडलिक जगताप असे गोळीबाराच्या घटनेत ठार झालेल्या तरुणाचे नाव असून हिंगोली पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला तातडीने ताब्यात घेत त्याच्या जवळील पिस्तुल जप्त केल्याची माहिती दिली आहे ,  धक्कादायक बाब म्हणजे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सुभाष कुरवाडे नावाच्या व्यक्तीवर देखील दोन गोळ्या झाडण्यात आल्याने त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम

मुख्यमंत्री फडणवीस यांचे दुपारी १.३० वाजता हेलिकॉप्टरने औसा येथे आगमन होईल. दुपारी २ वाजता ते उजनी येथील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील व औसाकडे प्रयाण करतील. औसा येथून दुपारी ३.१० वाजता हेलिकॉप्टरने निलंगा तालुक्यातील नणंद येथे त्यांचे आगमन होईल. दुपारी ३.४५ वाजता औराद शहाजनी येथील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. त्यानंतर नणंद येथून हेलिकॉप्टरने लातूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी ५.१० वाजता लातूर येथून विमानाने प्रयाण करतील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com