Maharashtra Live News Update: नाशिकच्या मुंबई नाका परिसरात बर्निंग कारचा थरार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२५, गणेशोत्सवाचे अपडेट, ओबीसी आरक्षण वाद, मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण जीआर, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Solapur: माळशिरसच्या धर्मपुरीत पाण्यासाठी महिलांचे आंदोलन

माळशिरसच्या धर्मपुरीत पाण्यासाठी महिलांचे आंदोलन

माळशिरस तालुक्यातील धर्मपुरीत पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

मागील आठ दिवसांपासून भीम नगर परिसरात पाणी पुरवठा बंद आहे.

पाणी पुरवठा सुरू करावा‌ या मागणीसाठी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.

Nashik: नाशिकच्या मुंबई नाका परिसरात बर्निंग कारचा थरार

नाशिक -

- नाशिकच्या मुंबई नाका परिसरात बर्निंग कारचा थरार

- एका चालत्या कारला अचानक लागली आग

- कारमध्ये असलेल्या दोन व्यक्ती वेळीच कारमधून उतरल्याने मोठी दुर्घटना टळली

- कारमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच कारमध्ये असलेले दोन जण लगेच कारमधून पडले बाहेर

- स्थानिक लोकांनी आग विझवण्यासाठी केली मदत

Bhandara: 7 दिवसांचा शिधा जमा करून मुंबईत आंदोलन करू, बच्चू कडू आक्रमक

सरकारला खाली खेचण्याच्या आंदोलनासाठी वर्गणी जमा करा

सात दिवसाचा शिधा जमा करून मुंबईत आंदोलन करू

बच्चू कडू यांनी ओढले राज्य सरकारवर ताशेरे

Sindhudurg: तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर महामार्ग १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद

सिंधुदुर्ग -

तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर महामार्ग १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीस बंद

भुईबावडा, फोंडाघाट मार्गे वाहतूक वळविली

गगनबावडा घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक बंद

Nandurbar: नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट

नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस

हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट

रस्ते झाले जलमय,अनेक दुकानात पाणी गेल्याने नुकसान

पुढील २४ तासांत अति मुसळधार पावसाची शक्यता

Nandurbar: मंत्री माणिकराव कोकाटेंचा पालकत्व असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींचे हाल

नंदुरबार -

मंत्री माणिकराव कोकाटेंचा पालकत्व असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींचे हाल

सर्पदंश झालेल्या महिलेला भर पावसात बांबूच्या झोळीतून जीवघेणा प्रवास करत वाट काढण्याची वेळ

रस्ता नसल्याने कंबर इतक्या पुरात पाण्यातून वाट काढताना नातेवाईकांचे हाल

दवाखान्यात नेण्यासाठी भर पावसात बांबू झोडीच्या आधार घेत अक्कलकुवा तालुक्यातील बारीपाडा ते वेहगी गोंडामाल असा सात किलोमीटरचा प्रवास

Pune: पुणे महापालिकेच्या 75 शाळा होणार मॉडेल स्कूल

पुणे -

पुणे महापालिकेच्या 75 शाळा होणार मॉडेल स्कूल

शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा निर्णय

75 शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यात येणार

शाळांमध्ये आवश्यक सुविधा पुरवताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार

आराखडा तयार करून शिक्षण मंडळामार्फत अंमलबजावणी करण्यात येणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com