Maharashtra News Live Update: आंबोली महादेवगड येथील खोल दरीत पर्यटक कोसळला

Marathi Breaking Live Headlines Updates : मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv
Published On

आंबोली महादेवगड येथील खोल दरीत पर्यटक कोसळला

सावंतवाडी तालुक्यातील आंबोली महादेवगड पॉईंट येथील दरीत निपाणी येथील पर्यटन कोसळला आहे. ही घटना आज सायंकाळी घडली. आयुब सय्यद (निपाणी) असे त्याचे नाव आहे. कर्नाटक निपाणी येथून युवकांचा एक ग्रृप पर्यटनासाठी आंबोली महादेवगड येथे आला होता. यावेळी मौजमजा करण्याच्या नादात त्यातील एका तरुणाचा तोल जाऊन तो खोल दरीत कोसळला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र दाट धुके व काळोख झाल्यामुळे उद्या शोध मोहीम राबवली जाणार आहे. याबाबतची माहिती आंबोली पोलिसांकडून देण्यात आली.

घरगुती गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक उलटला

कळंब तालुक्यातील कळंब- लातूर रोडवर खडकी शिवारातील मैत्री हॉटेल समोर गॅस सिलेंडरचा ट्रक पलटी झाल्याने एकच खळबळ

पुण्यावरून लातूरकडे 360 भरलेले सिलेंडर घेऊन जात होता ट्रक

पुढे चालणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक उलटला

डी वाय पाटील यांच्या निधनानंतर मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून श्रद्धांजली 

डी वाय पाटील यांच्या निधनानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी डीवाय पाटील आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याही आठवणींना पंकजा मुंडे यांनी उजाळा दिला. डीवाय पाटील यांनी त्यांच्या जीवनामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत अमुलाग्र बदल आणले. त्यांनी खूप मोठे कार्य केले आहे, असे त्या म्हणाल्या.

भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड; समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला ४ दिवसांची पोलिस कोठडी

भोंदू अशोक खरात याच्या बनावट बँक खाती आणि आर्थिक व्यवहार प्रकरणात समता पतसंस्थेचे व्यवस्थापक मिलिंद बनकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अशोक खरात यापूर्वीच शिर्डी पोलिसांच्या ताब्यात असून, आता दोघांची समोरासमोर चौकशी होणार आहे. खरात नॉमिनी असलेल्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने समता पतसंस्थेत बनावट खाती उघडून ६० कोटींहून अधिक व्यवहार झाल्याचा संशय असून, या चौकशीतून नेमके काय उघड होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

वाघाचे ठसे आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या आसेगाव देवी शिवारात वाघाचे ठसे शेतकऱ्यांना आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान ग्रामपंचायतचे सरपंच सचिन चव्हाण यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

धुळ्यात भरधाव ट्रॉलाची तीन वाहनांना धडक; अपघातात एकाचा मृत्यू

धुळ्यात भरधाव ट्रॉलाची तीन वाहनांना धडक; अपघातात एकाचा मृत्यू तर एकाचा मृत्यू तर बोलेरो वाहनातील दाम्पत्य जखमी

तिलारी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे घोटगे-परमे पूल पाण्याखाली

दोडामार्गातील तिलारी धोरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने घोटगे-परमे पूल पाण्याखाली गेला आहे. तिलारी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग तिलारी नदीत सुरू झाला आहे. याचा फटका अनेक गावांना बसला आहे. घोटगे-परमे पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

कंधार तालुक्यातील मसलगा शाळेची इमारतीच्या छताला गळती, स्लॅबला भेगा, 37 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

नांदेडच्या कंधार तालुक्यातील मसलगा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत अतिशय धोकादायक बनली आहे.शाळेच्या या इमारतीचे छत पूर्णपणे गळत असून स्लॅबला मोठ्या भेगा पडल्या आहेत. पावसाळा सुरू होताच पावसाचे पाणी थेट वर्गखोल्यांमध्ये साचत आहे. त्यामुळे पहिली ते पाचवीतील 37 विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे.

राष्ट्रवादीचे आमदार केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भेटीला

विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार विक्रम काकडे यांनी घेतली अमित शहा यांची भेट

राष्ट्रवादी चे खासदार पाठोपाठ आमदार सुद्धा अमित शहा यांच्या भेटीला

विक्रम काकडे आणि अमित शहा यांच्या भेटीमागे राजकीय गणितं असल्याची जोरदार चर्चा

मद्रास उच्च न्यायालयाकडून माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना जामीन मंजूर

अभिनेत्री त्रिशा यांच्या संदर्भात कथितरीत्या अपमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर काही तासांतच, मंगळवारी दुपारी मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांना जामीन मंजूर केला.

मिरज पंचायत समितीत सत्तांतर, भाजपाची बाजी,महाविकास आघाडीला धक्का

सांगलीच्या मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. यावेळी सभापती आणि उपसभापती दोन्ही पदांवर महायुतीने बाजी मारत सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे.विशेष म्हणजे ही निवडणूक बिनविरोध झाली. मागील निवडणुकीत बहुमत असूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपाने यावेळी राजकीय डावपेच यशस्वी करत सत्ता हस्तगत केली आहे.

Pune: राष्ट्रवादीचे आमदार केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भेटीला

पुणे -

राष्ट्रवादीचे आमदार केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भेटीला

विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार विक्रम काकडे यांनी घेतली अमित शहा यांची भेट

राष्ट्रवादी चे खासदार पाठोपाठ आमदार सुद्धा अमित शहा यांच्या भेटीला

विक्रम काकडे आणि अमित शहा यांच्या भेटीमागे राजकीय गणितं असल्याची जोरदार चर्चा

पुण्यातील विविध विकास कामं आणि इतर प्रलंबित प्रकल्पांबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती

या भेटीमुळे राज्याच्या राजकारणाची समीकरणे बदलण्याची चाहूल? राजकीय पटलावर चर्चा

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान

नंदुरबार -

नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान

डामरखेडा शिवारातील शामराव भोई या शेतकऱ्याचा शेतात साचलं गुडघ्यावभर पाणी

मुसळधार पावसामुळे शेतशिवाराला तळ्यांचा स्वरूप

कर्ज काढून गेलेली 15 एकर शेती गेली पाण्यात

कापूस शेतीला लावलेला साडेतीन लाख रुपयांचा खर्च गेला वाया

कापसाचा शेतात पाणी शिरल्याने संपूर्ण कापूस पीक खराब

कर्ज काढून केलेल्या शेतीत एक रुपये हाती येणार नसल्याने शेतकरी हातबल

Delhi : शिवसेना कुणाची? यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू

दिल्ली -

शिवसेना कुणाची? यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू

सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष

Mumbai: राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात घुसले

मुंबई -

काँग्रेसने सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख केला

काँग्रेसच्या या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात घुसले

Maharashtra News Live Update: प्रलंबित मागण्यांसाठी बांधकाम कामगारांनी सिंधुदुर्गात काढला धडक मोर्चा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज ओरोस येथील कामगार अधिकारी कार्यालयावर धडक दिली. मागील दीड वर्षातील प्रलंबित प्रस्ताव, कामगारांचे क्लेम (दावे) याबाबत कामगार अधिकाऱ्यांना विचारणा करीत कामगार आक्रमक झाले होते. यावेळी अधीका-यांनी कामगारांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांच्या मागण्या संबंधात वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र मागण्यांसंदर्भात लवकरात लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

हवेतच विमानाला जोरदार धक्का! फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा थरार; प्रवासी सुखरूप

४ ऑगस्ट रोजी फुकेत (थायलंड) हून दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या एअर इंडियाच्या 'AI2379' या विमानाला हवेत असताना तीव्र झोताचा (Turbulence) मोठा फटका बसला. हवेच्या या दाबाऊमुळे काही क्षणांसाठी विमानाची उंची अचानक कमी झाली. मात्र, वैमानिकाच्या प्रसंगावधानाने विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले असून, सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप आहेत.

उल्हासनगरमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य!

उल्हासनगर हून पवई कडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत असून, खड्डे चुकवताना दुचाकीस्वारांचा अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढला आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्याच्या या गंभीर समस्येकडे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन

आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले.

"दिपकेंच्या जीवाला धोका आहे!" कास्ट्राईब महासंघाचा दावा

CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. कास्ट्राईब कल्याण महासंघाने दिपकेंच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे.

कास्ट्राईब कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांनी अभिजीत दिपके यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. दिपकेंच्या सुरक्षेबाबत सरकारने तातडीने लक्ष घालावं, अशी मागणी महासंघाकडून करण्यात आली आहे.

Maharashtra News Live Update: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाल्यामुळे पालिकेचा निर्णय

पुण्याला पाणीपुरवठा करणारे सर्व धरणं सुमारे १०० टक्के भरले

खडकवासला, पानशेत आणि वरसगाव १०० टक्के भरले तर टेमघर ९८ टक्के भरले

पुणे महापालिकेने घेतली पाणीकपात मागे

धनंजय मुंडेंचा काँग्रेसला टोला

काँग्रेसच्या मनातील द्वेष समोर आला आहे. त्यांनी आपला इतिहास तपासायला हवा, अशी टीका धनंजय मुंडे यांनी काँग्रेसवर केली. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख केला होता. त्यावरून धनंजय मुंडेंनी टोला लगावला.

रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला इशारा

रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्याला मिळालेली तडीपारीची नोटीस भरपत्रकार परिषदेत टर्रकण फाडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला इशारा

गुंड मवाली अवैध व्यवसाय गुटखा माफिया रेती माफिया यांना सोडून शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याला नोटीस द्याल तर याद राखा म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला इशारा

Maharashtra News Live Update: मिरज पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीत भाजपाची बाजी

सभापती आणि उपसभापती निवड झाली बिनविरोध

भाजपाच्या राणी भोरे यांची सभापती शिवसेना शिंदे पक्षाच्या ललिता शेजुळ यांची उपसभापती पदी निवड

महाविकास आघाडी कडून सभापती उपसभापती निवडीत उमेदवारी अर्ज न दाखल झाल्याने,निवडणूक पार पडल्या बिनविरोध

पंचायत समिती निवडणुकीनंतर पार पडलेल्या सभापती-उपसभापती निवडीत महाविकास आघाडीने मारली होती बाजी

शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

शिक्षण, सहकार क्षेत्रातील कार्याने समाजकारण, राजकारणात भरीव योगदान देणारे आणि या क्षेत्रातील अनेक संस्थांचे आधारवड ठरलेले कार्यतपस्वी नेतृत्व पद्मश्री डॉ डी. वाय पाटील यांच्या निधनाने काळाने हिरावून नेले आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार, पश्चिम बंगाल, त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. पाटील यांच्या निधनामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले आहे.

होमिओपॅथी पदवीधरांच्या नोंदणी विरोधात डॉक्टर्स रस्त्यावर, 24 तास काम बंद आंदोलन

सीसीएमपी कोर्स केलेल्या होमिओपॅथी पदवीधरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्याच्या प्रस्तावाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेने कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र मार्ड, एएसएमआय आणि इतर वैद्यकीय संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.आज सकाळी 6 वाजल्यापासून बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तास वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत.

ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल, डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनाला दिशा देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

— उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

E20 पेट्रोलविरोधात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा मोर्चा

अरविंद केजरीवाल E20 विरोधातील मोर्चाला सुरुवात झालीये. दरम्यान, दिल्ली पोलीस फिरोज शाह रोडवर हा मोर्चा रोखण्याची तयारी करत आहेत. 

माळशेज घाटात पर्यटकांची तुफान गर्दी

पाऊस धुकं आणि थंडगार वातावरणात माळशेज घाट पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलून गेला आहे. हिरवाई, धबधबे, धुक्याची चादर आणि खमंग भाजलेल्या मक्याच्या कणसाचा आस्वाद घेत पर्यटक वर्षाविहाराचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा नदीला पूर,  नदीकाठची शेती पाण्याखाली

उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे धरणांमधून भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदीला मोठा पूर आला आहे. पाण्याचा प्रवाह सातत्याने वाढत असल्याने नदीकाठच्या गावांमधील शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने बागायत शेती पाण्याखाली गेली आहे.

दुचाकी वाहन चोरणाऱ्या आरोपींना वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्ताल्यांतर्गत वाकड पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करत ४६ वर्षीय ज्ञानेश्वर शंकरराव जैसवाल आणि २८ वर्षीय वेदप्रकाश मदनसिंग रावत या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून वाहनचोरीचे तब्बल १७ गुन्हे उघडकीस आले आहेत.

रिक्षा प्रवास महागणार, पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रुपये, आरटीएची भाडेवाढ मंजूर

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात रिक्षाने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खिशाला आता अधिक कात्री लागणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) रिक्षा भाडेवाढीला मंजुरी दिल्याने १ सप्टेंबरपासून पहिल्या दीड किलोमीटरसाठी किमान ३० रुपये मोजावे लागणार आहेत.

भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण 100% भरले

- धरण 100% भरल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात सुरुवात

- सध्या या 45 स्वयंचलित दरवाजांमधून 3 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू

- पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी अधिक बदल करण्यात येणार..विसर्ग वाढवल्यानं नदीकाठच्या गावांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा..

- धरणावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटल्याने, नागरिकांच्यात समाधानाचं वातावरण..

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात ऑटो रिक्षा प्रवासी दरवाढ

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात ऑटो रिक्षा प्रवासी दरवाढ करण्यात आली आहे. पहिल्या दीड किलोमीटरसाठी आता पाच रुपये आणि त्या नंतर प्रत्येक किलोमीटर साठी तीन रुपयांनी वाढ करण्यात आली वाढ करण्यात आहे. त्यामुळे ऑटो रिक्षा चे दर आता पहिल्या दीड किलोमीटर साठी 30 रुपये आणि त्या नंतर प्रत्येक किलोमीटर साठी 20 रुपये इतके असणार आहेत.

कोकणात नदी क्षेत्रात समाधानकारक पाऊस

  • खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर

  • खेडमधील जगबुडी नदीची पातळी 5.40 मीटर

  • कोकणात पावसाचा जोर कमी, पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाचा येलो अलर्ट

  • दोन महिन्यात झालेल्या पावसानंतर कोकणातला डोंगर परिसर हिरवा गार

एसआयआर मोहिमेत अमरावती जिल्ह्यातील सुमारे 2लाख 94 हजार 591 मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मोहिमेत अमरावती जिल्ह्यातील तब्बल २ लाख ९४ हजार ५९१ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे मतदार असंग्रहित या आढळल्याने त्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील २५ लाख ४५हजार ६७७ मतदारांपैकी २४ लाख ३१ हजार ९६३ मतदारांची पडताळणी पूर्ण झाली असून, २१ लाख ३७ हजार १७२ गणनापत्रकांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे.

Sangmeshwar : बावनदीत बुडालेल्या तरुणाचा चार दिवसांनी आढळला मृतदेह

संगमेश्वर तालुक्यातील बावनदी पुलावरून नदीत पडलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर चार दिवसांनी नदीपात्रात सापडला आहे..

बावनदी रेवाळेवाडी येथील 42 वर्षीय महेश नारायण भरणकर हे बावनदीच्या जुन्या पुलावर बसले असताना त्यांचा तोल जाऊन ते नदीत पडले होते.

या घटनेनंतर सलग चार दिवस त्यांचा शोध सुरू होता. अखेर त्यांचा मृतदेह पुलापासून सुमारे तीनशे मीटर अंतरावर आढळून आला.

बुलढाणा–रायपूर रोडवर मोठा खड्डा; अपघाताचा धोका वाढला

बुलढाणा–रायपूर रोडवर मोठा खड्डा; अपघाताचा धोका वाढला

प्रशासनाचे दुर्लक्ष; प्रवाशांनीच फांद्या टाकून वाहनचालकांना दिला इशारा

Yavatmal : प्रशासकीय दुर्लक्षाचा शेतकऱ्यांना फटका

यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कोळी खुर्द, कोळी बुद्रुक व ताडसावळी या गावांना भाजपाचे देवानंद पवार यांनी भेट देऊन अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या व खरडून गेलेल्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.नदी व नाल्यांच्या काठावरील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी निदर्शनास आले.पालकमंत्री संजय राठोड तसेच जिल्हाधिकारी विकास मीना यांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कायमस्वरूपी कार्यपद्धती निश्चित करावी अशी मागणी भाजपचे देवानंद पवार यांनी केले.

Bhusawal : हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने गाळयुक्त पाण्याचा प्रवाह

हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने गाळयुक्त पाण्याचा प्रवाह

गाळामुळे फिल्टर मशीन जाम

तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा काही काळ बंद

शहराला दहा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा विस्कळीत

पालिकेकडून आलम खरेदीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू

Latur : औसा शहरात दोन गटात तुफान राडा; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

लातूरच्या औसा शहरात दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला आहे, या हाणामारीने परिसरात खळबळ उडाली.

दोन्ही गटांकडून लाठ्या-काठ्यांचा वापर करत एकमेकांना मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.,तर या हाणामारीत काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, हा राडा नेमका कोणत्या कारणातून झाला, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

विष्णुपुरी धरण तोडून भरल्याने उष्णपुरी धरणाचा एक दरवाजा उघडला

विष्णुपुरी धरण तोडून भरल्याने उष्णपुरी धरणाचा एक दरवाजा उघडला.

रात्री साडेअकरा वाजता धरणाच्या एका दरवाजातून 16 हजार 325 क्युसिक पाण्याचा करण्यात आला विसर्ग.

Amravati : अमरावती जिल्ह्यात 30 हजार शेतकाऱ्याची अजूनही इकेवायसी नाही

आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही

तातडीने इकेवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अमरावती जिल्ह्यात 30 हजार शेतकाऱ्याची अजूनही इकेवायसी नाही

Washim : वाशिमच्या कारंजा शहरात काही युवकांनी एका युवकाला भर रस्त्यात बेदम मारहाण केली

वाशिमच्या कारंजा शहरात काही युवकांनी एका युवकाला भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद....

कारंजा शहरातील समता नगर भागात जुन्या आपसी वादातून युवकाला बेदम मारहाण झाल्याची माहिती..

मारहाण दरम्यान दुकानाची तोडफोड झाली असून दुकानाच मोठं नुकसान झालं... मारहाणीत युवक गंभीर जखमी..

कारंजा शहरात घडलेल्या या गुंडागर्दीचा व्हिडिओ शहरात सोशल मीडियावर झाला व्हायरल..

या घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट.... पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील 83 प्रकल्पात केवळ आठ टक्केच पाणीसाठा शिल्लक

अर्धा पावसाळा सरला तरी नवीन पाण्याची आवक शून्य,जिल्ह्यातील 142 प्रकल्प तळालाच

धाराशिव जिल्ह्यातील 83 प्रकल्पात केवळ आठ टक्केच पाणीसाठा शिल्लक

Pune : पुण्यातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंदच

पुण्यातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंदच

खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने बाबा भिडे पुलावर अजूनही पाणी

Palghar : दाभोसा पर्यटनी रेलिंग तुटल्याने दोघे दरीत कोसळले; वनविभागाच्या तत्परतेने जीव बचावला

दाभोसा पर्यटनी रेलिंग तुटल्याने दोघे दरीत कोसळले

वनविभागाच्या तत्परतेने जीव बचावला

आज समजणार धनुष्यबाण कुणाचा! शिवसेना पक्ष, चिन्हावर 'सुप्रीम' सुनावणी

आताची सर्वात मोठी बातमी... शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे... केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी याचिका दाखल केलीय, याच याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.. निवडणूक आयोगानं पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय दिला होता...

नंदुरबार मध्ये सुरू होतील लक्झरी कारमधून गुटख्याची तस्करी

नंदुरबार मध्ये सुरू होतील लक्झरी कारमधून गुटख्याची तस्करी....

लक्झरी कार मधून गुटका तस्करी करणाऱ्याला उपनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.....

नंदुरबार उपनगर पोलिसांच्या कारवाईत 16 लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त

Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यात कर्जमाफीच्या पहिल्याच यादीत लाखो शेतकऱ्यांची नावे

यवतमाळ जिल्ह्यात 1 लाख एक हजार 470 शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या पहिल्याच यादीत आली आहे.

दरम्यान जिल्ह्यात 35 हजार शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे ते वेटींग वर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com