

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी भूमिपुत्रांचा लढा आता दिल्लीच्या जंतर-मंतरपर्यंत पोहोचला आहे. ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी कल्याण-डोंबिवलीसह महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतून हजारो भूमिपुत्र दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. या आंदोलनात आगरी समाज, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तसेच भाजपच्या काही नगरसेवकांचाही सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेला भाजप आमदार धैर्यशील कदम यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. राऊत यांनी वापरलेली भाषा अत्यंत अश्लील आणि अशोभनीय असून, भाजप व सातारा जिल्ह्याच्या वतीने त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. "राऊतांचे वय ६५ झाले असून 'साठी बुद्धी नाठी' याप्रमाणे त्यांना काय बोलावे हे समजेनासे झाले आहे," असा घणाघाती टोला कदम यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरेंनी दिलेली शिवसेना संपवण्याची जबाबदारी राऊतांनी तंतोतंत पार पाडली, अशी टीका करत त्यांनी यापुढे राऊतांनी अशी बालिश वक्तव्ये करणे थांबवावे असा सल्लाही दिला.
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची भररस्त्यात धिंड काढणे, त्याला उठाबशा काढायला लावणे आणि नागरिकांसमोर माफी मागण्यास भाग पाडल्याच्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. पुणे पोलीस आयुक्तांसह १२ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानवाधिकार संरक्षण कायद्यातील कलम १६ अंतर्गत नोटीस बजावण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. याप्रकरणी मुख्य सचिव, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र कदम,शिवाजी विभुते, रविकांत नंदनवार, महेश नलावडे या अधिकाऱ्यांसह अमोल गायकवाड अमोल वायाळ, भीमराव कांबळे, दत्तात्रय शिंदे कादिर शेख, सूरज अंबासे या कर्मचाऱ्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
पंढरपूरहून आषाढी एकादशीची यात्रा करून शेगावकडे परतीच्या मार्गाने निघालेल्या संत गजानन महाराज यांच्या पालखीचे धाराशिवच्या भुम शहरात भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्यासह गजानन महाराज व्यापारी सेवा मंडळाच्या वतीने पालखीवर पुष्पवृष्टी करत व फटाक्याची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले.या पालखीचा शहरातील कुंतलगिरी रोडवरील श्री संत गजानन महाराज मंदिरात मुक्काम व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.हा पालखी सोहळा आषाढी यात्रेसाठी शेगावहून पंढरपूरकडे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला जातो. त्यानंतर ही पालखी पंढरपूरवरून भूममधून परतीच्या मार्गान जात असते दरम्यान पालखी दाखल होताच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
धाराशिव जिल्ह्यातील राजकारण आज चांगलंच तापल आहे.भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व्यंकटराव गुंड यांच्या रूपामाता परिवारातर्फे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना वगळण्यात आलं तर दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मात्र मानाचे स्थान देण्यात आलं.मैत्री दिनाचा धागा पकडत भारतीय जनता पार्टीची व आमची मैत्री ही दिलसे दिल तक असल्याचं खासदार ओम राजे निंबाळकरांनी सांगितलं तर ओमराजेचा हाच धागा पकडत बसवराज पाटील यांनीही त्यांना दाद दिली.भाजप आ.राणाजगजितसिंह पाटील हे भाजपातील जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप व्यंकटराव गुंड यांनी राणाजगजितसिंह पाटलांवर आरोप केले.माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी देखील परखड भाष्य करत भारतीय जनता पार्टी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नसून कोणा एका कुटुंबाच्या जीवावर चालत नसल्याचा हल्लाबोल करत अप्रत्यक्षपणे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर टिका केल्याने भाजपातील अंतर्गत वाद अधिकच चव्हाट्यावर आला आहे.
पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ
माझ्या हत्येचा कट रचला गेला
रायगडच्या राजकिय वर्तुळातुन मोठी बातमी आहे. दक्षिण रायगडमध्ये शिंदे सेनेने मनसेला मोठा धक्का दिला आहे. जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या आठ प्रमुख नेत्यांसह शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थिती माणगाव येथे हा प्रवेश सोहळा पास पडला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसे माजी रायगड संपर्क अध्यक्ष दिलीप सांगळे, विद्यार्थी सेना रायगड जिल्हा अध्यक्ष प्रतिक रहाटे, तळा तालुका अध्यक्ष बाबू फुलारे, माथाडी अध्यक्ष राजा टेंबे या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
रत्नागिरीतील गुहागर तालुक्यातील हेदवी येथील विद्यानिकेतन विद्यालयाच्या परिसरात दुर्मिळ कस्तुरी मांजर (सिव्हेट) आढळलेय.त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालीय. या दुर्मिळ वन्यप्राण्याला पाहण्यासाठी परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.कस्तुरी मांजर हा कोकणातील जंगल परिसरात अधूनमधून आढळणारा, अत्यंत लाजाळू आणि निशाचर स्वभावाचा वन्यप्राणी आहे. ग्रामीण भागात त्याला 'जावडी मांजर' या नावानेही ओळखले जाते. जंगलातील अधिवास कमी होणे, अन्नाच्या शोधात भटकंती किंवा पावसाळ्यातील बदलत्या परिस्थितीमुळे हे प्राणी कधीकधी मानवी वस्तीकडे वळतात.
-पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाल्यामुळे महाबळेश्वर-मेढा-सातारा मार्गावरील केळघर घाट आज २ ऑगस्ट पासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने परिसराची पाहणी करून हा निर्णय घेतल आहे तरीही दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता घटनास्थळी जेसीबी आणि डंपर सज्ज ठेवण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव प्रवाशांनी आणि पर्यटकांनी घाट क्षेत्रात कुठेही वाहने न थांबवता सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
माळशेज घाटातील करंजाळ येथे खचलेल्या रस्त्याजवळ स्थानिक तरुणांमध्ये हाणामारी झाली. मद्यधुंद तरुणाला मारहाण केल्यानंतर मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पोलिसांशी तरुणाने हुज्जत घातली मात्र पोलिस आधिकारीही कारवाई न करताच निघून गेले
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे नळगंगा धरण सध्या ७३ टक्के भरले असून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मोताळा शहरासह २५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणातील वाढत्या पाणीसाठ्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यंदाच्या पावसामुळे जलस्रोत भरू लागल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील कोंडाईबारी घाटात खड्ड्यांमुळे 16 चाकी ट्रक पलटी...
लाखांचे ग्रॅनाईटचे नुकसान झालं असून चालक बालंबाल बचावला...
नंदुरबार जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर खड्ड्यांचा साम्राज्य...
जीवघेणे खड्डे अन् महामार्ग प्राधिकरणाचा हलगर्जीपणा....
गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांकडून पाद्यपूजन करून घेतल्याच्या प्रकाराविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), पुणे शहरच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. अप्पर बिबवेवाडी येथील संविधान चौकात जोडेमारो आंदोलन करत कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. आंदोलनादरम्यान भाजपा नगरसेविका वर्षा साठे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा साठे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
माजलगाव शहरातील स्मारकाचे रखडलेले काम स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांबाबत साथ प्रमुख मागण्या सह गेल्या दोन दिवसापासून माजलगाव शहरात तरुणांचे आमरण उपोषण सुरू असून या मरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे स्मारक संघर्ष समितीच्या वतीने हे उपोषण करण्यात येत असून या उपोषणास आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट दिली असून लवकरच मार्ग काढून अतिक्रमण हटवण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देण्यात येणार असल्याचे प्रकाश सोळंके यांनी सांगितले आहे.
कल्याण–आहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटातील रस्ता खचल्याने वाहतुकीस बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात धोकादायक मार्गावरूनच हजारो पर्यटक प्रवास करत असल्याचे चित्र समोर आले असून प्रशासनाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिल्लीच्या आंदोलनात काही मुलांनी अभद्र शब्द बोलले त्या आंदोलनात असामाजिक तत्व घुसले त्यांनी हिंसा करण्याचा प्रयत्न केला. त्या असमाजिक तत्त्वावर पोलिसांनी नियंत्रण मिळवलं...
काही लोकांना भारतामध्ये मोदींसोबत वैर आहे.कारण २०१४ पासून ते २०२६ पर्यंत जगातील मोठी शक्ती भारताला बनवलं....
देशात बांगलादेश, नेपाळ सारखी परिस्थिती झाली पाहिजे, यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत.
- मोरांगणा (खरांगणा) येथील एटीएम अज्ञातांकडून फोडल्याची घटना
- एटीएम मशीन जळालेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ
- एटीएममधून धूर व आग दिसताच पोलिसांनी अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न
- त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग पूर्णपणे विझवली
- घटना रात्री उघडकीस; माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले
मोरवाडी येथील करिष्मा ग्लोरी सोसायटीच्या रूम नंबर 201 या ठिकाणीही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत पती-पत्नी आणि मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विनोद पिल्ले वय 50 वर्षे, सिरजा पिल्ले वय 45 वर्ष, आणि पौर्णिमा पिल्ले वय 19 वर्ष अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावं आहेत.
पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात आज पावसाचा जोर कमी असला तरीही पर्यटकांचा आकर्षक असलेल्या भुशी डॅमवर पर्यटकांची मोठी गर्दी असल्याचे चित्र दिसत आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून पावसाचा आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात दाखल झालेले आहे. त्यामुळे चिक्की व्यवसायिकांना सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे. दरम्यान प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात प्रशासनाकडून देण्यात येत...
- पाकिस्तानात तयार होणारी ‘गोरी ब्युटी क्रीम’ आणि ‘गोरी डे अँड नाईट क्रीम’ संगमनेरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा धक्कादायक प्रकार उघड..
- अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संगमनेर शहर पोलिसांच्या मदतीने गोल्डन मार्केटमधील दुकानावर छापा टाकला..
- 14 हजार रुपयांचा पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त
अभिजीत दिपके पुढील आठवड्यात पुण्यातील आंदोलनात सहभागी संयोजकांची बैठक घेण्याची शक्यता
पुण्यात झालेल्या आंदोलनामध्ये ज्या संयोजकांनी सहभाग घेतला त्यांची ही बैठक असण्याची शक्यता
पुण्यातील कॉकरोच पार्टीच्या कार्यकर्त्याने घेतली संभाजीनगर मध्ये अभिजीत दीपके यांची भेट
भीमा खोर्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण शंभर टक्के भरले आहे.
पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून सध्या 75 हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत सुरू आहे.
धरण शंभर टक्के भरल्याने वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
नीरा नदीवर असलेले वीर धरण हे शंभर टक्के भरले
धरणाच्या सर्व दरवाजातून निरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे
महिलांना अपशब्द वापरल्यास गुजर समाजात तीव्र संताप...
व्हायरल ऑडिओ क्लिप मध्ये केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे एकनाथ खडसे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याने समाज आक्रमक...
पाटीदार गुजर समाजाचा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतले संत सोपान काका महाराज पालखीचे दर्शन
परतीच्या प्रवासामध्ये घेतले पालखीचे दर्शन
संकष्टी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात सकाळपासून गर्दी पाहायला मिळाली. चतुर्थी निमित्त मंदिरात पहाटे याग आणि अभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आलं. नवीन महिन्याच्या सुरुवातीला दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
एक दिवसाच्या विश्रांतीनंतर नंदुरबार शहरात पुन्हा पावसाची हजेरी...
नंदुरबार शहरासह परिसरात सकाळपासून पावसाला सुरुवात...
हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे वातावरणात गारवा.
नाशिकच्या नांदगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान कंटेनरच्या मधल्या चाकाखाली सापडून २४ वर्षीय सुनील साठे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला..शनिवारी रात्री ही घटना घडली. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने येवला रोड येथे मिरवणूक सुरू होती.यावेळी झालेल्या वाहतूक कोंडी दरम्यान हा अपघात घडला..या अपघातानंतर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती..मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली..दरम्यान, कंटेनर चालक फरारी झाला असून, रात्री उशिरापर्यंत पोलिसांत घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते..
नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा अन कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या देगलूरकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालीय. विशेष म्हणजे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना टोल द्यावा लागतो, तरी देखील रस्त्यातील खड्ड्यावर प्रशासनाचे दुर्लक्ष झालेय. याच रस्त्यावर वजरगा आणि देगांव फाट्यावर अपघात होऊन दोघांचे बळी गेले तरी देखील रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होतंय. आता पावसाळ्यात हा रस्ता आणखीनच धोकादायक बनला असून त्यामुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केलाय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा सिडको पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सिडको पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केलेल्या कारवाईत चोरीच्या तब्बल 28 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या चौकशीतून आणखी काही मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यावर मागील चार दिवस अतिवृष्टी आणि पुराचे मोठे संकट ओढावले होते. पर्लकोटा नदीसोबतच पामुलगौतम नदीलाही पूर आल्याने तालुक्यावर दुहेरी संकट निर्माण झाले. अनेक प्रभागांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
जळगाव जिल्ह्यात ३० आणि ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, प्राथमिक अहवालानुसार सुमारे ५० हजार १९९ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांची हानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका १५ तालुक्यांतील ५७८ गावांमधील ७८ हजार ५३२ शेतकऱ्यांना बसल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
अमरावती शहरातील राजापेठ पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत अकोली रोडवरील साई हेरिटेज परिसरातून २२ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले आहे. आरोपीच्या ताब्यातून सुमारे २७७ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), एक फोर्ड इकोस्पोर्ट कार आणि दोन मोबाईल असा एकूण ५३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापेठ पोलीस करत असून अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 ऑगस्ट रोजी रायगडच्या एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा माणगाव येथून प्रारंभ होणार असून ते या दौऱ्यादरम्यान मुंबई गोवा महामार्गाची पहाणी करणार असल्याची माहिती संदिप देशपांडे यांनी दिली आह आहे. माणगाव बायपासचे रखडलेले काम, नवीन रस्त्याला पडलेले खड्डे आणि धोकादायक पुलांची पहाणी राज ठाकरे या दौऱ्यादरम्यान करतील. या बरोबर माणगाव, पेण आणि पनवेल येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन देखील राज ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा पश्चिम भागामध्ये कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे.त्यामुळे धरण व्यवस्थापनाने धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. त्यामुळेच नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. साताऱ्यातील संगम माहुली परिसरात असणाऱ्या कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमाच्या परिसरात आता पाण्याची पातळी लक्षणे वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच ठिकाणी असलेल्या साताऱ्याच्या छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी आता पाण्याखाली गेलेली आहे.कन्हेर आणि उरमोडी या दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे त्यामुळेच संगम माहुली परिसरामध्ये नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्यात वाढ झालेली आहे. साताऱ्यातील संगम माहुली येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी
तब्बल ३३ दिवसांच्या खंडानंतर स्टार एअरची सोलापूर-मुंबई विमानसेवा आज, रविवार, २ऑगस्टपासून पुन्हा सुरू होत आहे.कांही तांत्रिक कारणास्तव २९ जूनपासून ही सेवा स्थगित करण्यात आली होती.त्यामुळे व्यापारी,उद्योजक,नोकरदार,वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला जाणारे रुग्ण आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.अखेर सेवा पूर्ववत झाल्याने सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी आणि अभियांत्रिकी कामांसाठी नऊ तासांचा विशेष मेगा ब्लॉक
अनेक उपनगर आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही लांब पल्ल्याच्या गाड्या पुणे स्टेशनऐवजी खडकी, हडपसर आणि शिवाजीनगर स्थानकांवरून सुरू होतील किंवा तेथेच प्रवास समाप्त करतील
माळशेज घाट मार्ग पुर्णपणे वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर पर्यायी मार्गांवर रात्रभर भीषण वाहतूक कोंडी झाली. रात्रभर भर पाऊसात तासन्तास वाहनांमध्ये अडकलेल्या पर्यटक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
कल्याण–आहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाट मार्ग बंद झाल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. मात्र अरुंद आणि एकेरी रस्त्यामुळे रात्रभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पर्यटक, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक तासन्तास वाहनांमध्ये अडकून पडले. रात्रीच्या वेळी मदत आणि वाहतूक नियोजनाचा अभाव असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करूनही तातडीची मदत मिळाली नसल्याची नाराजी अनेक प्रवाशांनी व्यक्त केली. रविवारच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो माळशेज घाट मार्गावरील प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
कल्याण आहिल्यानगर माळशेज घाट मार्ग बंद पर्यायी मार्ग वाहतूककोंडी
कल्याण ➜ मुरबाड ➜ म्हसा ➜ पिंपळगाव जोगा धरण (मागील मार्ग) ➜ खिरेश्वर ➜ सांगणोरे ➜ पिंपळगाव जोगा ➜ राजगड हॉटेल ➜ आहिल्यानगर
अंबरनाथमध्ये शिवसेना (शिंदे गट)तील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाल्याचे दिसून आले आहे. पक्षाकडून आयोजित कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट)चे अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार काय करतात संध्याकाळी फार्म हाऊस वर जाऊन बसणं या शब्दात वाळेकर यांनी जोरदार टीका केली.
अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बस स्टँड जवळून एका हात गाडीवरून बाबासाहेब आव्हाड या युवकाने तीन चिक्कीचे पॅकेट घेतले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवंत अळ्या आढळून आल्याने संताप व्यक्त केला आहे. संबंधित हातगाडी वाल्याला विचारले असता त्यांनी हा माल माळीवाडा येथील एका किराणा स्टोअर मधून घेतल्याचे सांगितले. जिल्ह्यात अनेक दुकानांमध्ये आळ्या बुरशी तसेच मुदत संपलेल्या मालाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याची शक्यता असून याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरी असा खराब माल विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 14 हजार हेक्टरवरील कापूस तर 8 हजार हेक्टरवरील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे एकूण 26 हजार हेक्टर वरील पीक उध्वस्त उद्ध्वस्त झाली आहे. 286 हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याचे पुढे आले आहे मात्र हा आकडा आणखी वाढण्याची स्थिती आहे कृषी विभागाची यंत्रणा अजून नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोचलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.