राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वर खामगाव जवळ वळण मार्गावर सकाळी अपघात.
कार धुळे येथून नागपूर कडे जाताना सकाळी झाला अपघात.
अपघातात कार मधील दोघे गंभीर जखमी. जखमींवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.
पिंपरी चिंचवड शहरातील जुन्या पुणे मुंबई महामार्गावर एका मोठ्या टँकर ला अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकर चालकाचं त्याच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. चिंचवड कडून पुण्याच्या दिशेने जाताना सेंट मदर टेरेसा उडान पुलाखाली हा अपघात झाला आहे. अपघात झालेला टँकर हा अग्रवाल ग्रुपचा आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
12 ऑगस्टला जॉय विले सोसायटी समोर क्रिशाला बिल्डरच्या साइटवर जाणाऱ्या एका डंपर ट्रक खाली चिरडून अकरा वर्षाच्या चिमुकल्या प्रत्युषा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी डंपर ट्रक चालक फरहान मन्नू शेख याला अटक केली आहे. मात्र या प्रकरणात क्रिशाला बिल्डरवरही गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी प्रत्युषाच्या वडिलांनी काल क्रिशाला बिल्डर च्या कार्यालयासमोर हातात फलक घेऊन आंदोलन केला आहे. मात्र यावेळी हिंजवडी पोलिसांकडून प्रत्युषाचे वडील संतोष बोराटे यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिजवडी परिसरामध्ये बेदरकारपणे चालविण्यात येणाऱ्या डंपर ट्रक मुळे अनेक निष्पपांचे जीव जात आहेत. या अपघातांना डंपर ट्रक चालक आणि बांधकाम व्यावसायिक जबाबदार आहेत त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी आणि परिवहन विभागांनी कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रत्युषाच्या कुटुंबीयांनी केली आहे.
कल्याण शीळ रोडवर गेले काही दिवस प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे, यातच मध्यरात्री अचानक मोठा दिशादर्शक फलक अचानक रस्त्यावर कोसळला आणि काही काळ दोन्ही साईडची वाहतुक ठप्प झाली होती. पोलीस, फायब्रिगेड यांनी पडलेला फलक बाजूला काढला.. दरम्यान या घटनेत एक बाइक स्वार जखमी होता होता वाचला.. सुदैवाने कोणतीही हानी नाही
बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथे काल मध्यरात्री जुन्या वैमनस्यातून बुलढाणा येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या बाब्या उर्फ शेख नफिज शेख हफिज याचा धारदार शस्त्राने वार करत तसेच लाकडी दांड्याने मारहाण करून खून केल्याची घटना घडलीय.. सैलानी येथील बरीबाबा दर्गा असलेल्या रस्त्यावर हल्लेखोरांनी बाब्या वर प्राणघातक हल्ला चढवला.. अलेक्स इनोक जोसेफ ऊर्फ रोनी , शेख सलमान शेख अशपाक , आणि सैयद वाजीद सैय्यद राजू ऊर्फ वाजीद टोपी , सर्व राहणार सैलानी, या तिघांनी मिळून धारदार शस्त्र तसेच लाकडी दांड्याने बाबूवर हल्ला केला... दरम्यान गंभीर जखमी झालेल्या बाबूचा घटनास्थळीच मृत्यू झाला.. घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलिसानी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.. मात्र आरोपी घटना स्थळावरील फरार झाले होते.. पोलिसांनी तात्काळ पथक तयार आरोपींचे मागे लावले , आणि तांत्रिक बाबींचा वापर करून आरोपींना जाफराबाद येथून अटक केलीय .. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलाय .. आरोपींनी खुनाची कबुली सुद्धा दिलीय .. मात्र या घटनेने सैलानी परिसरात एकच खळबळ उडालीय ...
नाशिक मध्ये सुरू असलेल्या पावसामुळे सतत वातावरणात होणाऱ्या बदलाने नाशिककरांच्या आरोग्यावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. गेल्या महिन्याभरात नाशिकमध्ये 4 हजार 408 तापाच्या रुग्णांची नोंद झाली असून यात 64 डेंगूच्या रुग्णांची देखील भर पडली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सहाही विभागात 150 पथक नेमून डेंग्यू नियंत्रणाबाबत नाशिक आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत. आरोग्य विभागाच्या पथकांनी केलेल्या तपासणी 1हजार 431डास अळी आढळून आल्या आहेत.
धाराशिव च्या तुळजापूर मधील पिता पुञाची अज्ञात आरोपींनी अधिक पैशाच्या आमिषाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. कालिदास लिंबाजी गवळी व मुलगा कृष्णा याला आरोपींनी अधिक पैशाचे आमिष दाखवले.एक बनावट लिंक तयार करुन ती व्हॉट्सअॅपने पाठवली या लिंक द्वारे पिता पुञाची १६ लाख ८५ हजार ४९८ रुपयांची अॉनलाईन फसवणूक करण्यात आली आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधुन फिर्यादीचा विश्वास संपादन करत बनावट योजनेत गुंतवले व आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दिली असुन पोलिस अधिक तपास करत आहेत.
- नागपूर सहित विदर्भातील काही भागात बुधवारी पावसाचा अंदाज
- मंगळवार ते बुधवार दरम्यान नागपूर सह विदर्भात पावसाचा अंदाज
- मंगळवारी नागपूर,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट
- तर बुधवारी या पाच जिल्ह्यांसह अमरावती, वर्धा अशा सात जिल्ह्यांना येलो अलर्ट
- तर गुरुवारी संपूर्ण विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असल्याने अनेक राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते गट,गण आणि वॉर्डचे नियोजन करत असताना धाराशिव जिल्ह्यातील केकस्थळवाडी या गावानं नगरपरिषद क्षेत्र आम्हाला नको अशी भूमिका घेतलीय.2008 साली झालेल्या हद्दवाडीत केकस्थळवाडी, राघोचीवाडी आणि जाधववाडी या ग्रुप ग्रामपंचायत मधील गावांचा समावेश धाराशिव नगरपरिषद क्षेत्रात समावेश करण्यात आला मात्र 17 वर्षात या गावांना कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत,खराब रस्ते,अस्वच्छ गटार,बंद पडलेली जिल्हा परिषदेची शाळा,अपुरी लाईट व्यवस्था यामुळे 300 लोक वस्तीच्या केकस्थळवाडी गावातील सर्व ग्रामस्थांनी आम्हाला नगरपरिषद क्षेत्रात नको अशी भूमिका घेतलीय.
आवडीच्या ठिकाणी बदली न मिळाल्याने दीर्घ काळ रजेवर राहणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध भूमी अभिलेख विभागाने कारवाई सुरू केली आहे.
नाशिकच्या उपसंचालक पदावरील महिला अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, आणखी १० अधिकाऱ्यांविरोधात प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आले आहेत.
यामध्ये दोन जिल्हा अधीक्षक आणि सात ते आठ उपअधीक्षकांचा समावेश आहे. बदलीनंतर विदर्भ, मराठवाड्यात रुजू होण्यास टाळाटाळ होत असल्याने स्थानिक कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे दीर्घकाळ रजेवर राहणाऱ्यांविरोधात थेट निलंबनाची कारवाई होणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
गरजू रुग्णांना गरीब रुग्ण (आयपीएफ) योजनेचा लाभ सहज मिळावा, यासाठी सह धर्मादाय आयुक्त कार्यालयाने महत्त्वाचा आदेश काढला आहे.
त्यानुसार राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी २४ तास योजनेची माहिती देणाऱ्या समन्वयक किंवा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. सध्या समाजसेवक ठरावीक वेळेतच उपलब्ध असल्याने अनेक रुग्णांना विशेषतः रात्री अडचण येते.
त्यामुळे तत्काळ मार्गदर्शन व उपचार मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नियमानुसार धर्मादाय रुग्णालयांनी १० टक्के खाटा निर्धन व १० टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे.
स्पर्म व्हेल हा संरक्षित व लुप्तप्राय प्राणी असून, वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार एम्बरग्रीसचा व्यापार बेकायदेशीर आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. प्राथमिक सुनावणीनंतर तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची वनकोठडी ठोठावली होती. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर आणखी तीन दिवसांची वनकोठडी देण्यात आली. प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने आणखी कोण सामील आहेत, याचा तपास वनविभागाकडून सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलसमोर अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघा परप्रांतीय तरुणांना अटक करुन बाणेर पोलिसांनी ३ किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.रवि विजय वर्मा (वय १९, रा. शिव काूलनी, पिंपळे सौदागर, मुळ रा. भरतकुप जि. चित्रकुट, उत्तर प्रदेश), कौशेलेंद्र नथुप्रसाद वर्मा (वय २३, रा. शिव कॉलनी, पिंपळे सौदागर, मुळ रा. बरथवाल, भरतकुप, जि. चित्रकुट, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलीस अंमलदार दत्ता संभाजी काळे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई २२ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा वाजता बाणेरमधील ज्युपिटर हॉस्पिटलच्या समोर करण्यात आली.
कोकण, मध्य महाराष्ट्र अन् विदर्भातच हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडा आणि उत्तर महष्ट्रात तुलनेत पाऊस खूप कमी झाला आहे.
गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यात तुफान पाऊस सुरू आहे.
त्याचा परिणाम म्हणून राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस सुरू झाला आहे.
बहुतांश भागात हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली. यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना समावेश आहे. असाच पाऊस 29 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे
भंडाऱ्याचा तुमसर येथे तुमसरचे आमदार राजु कारेमोरे यांचा दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. तुमसर -मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनीही हजेरी लावली. दरम्यान, नागरिकांसह डीजेच्या तालावर थिरकत आमदार यांनी आनंद लुटला. नागरिकांचा डीजेचा तालावर थिरकताना बघून आमदारांना मोह आवरला नाही. आमदारांचा डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसतोय.
पोळ्याच्या सणात ग्रामीण भागात जुगार मोठ्या प्रमाणात खेळल्या जातो. लाखनी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या केसलवाडा वाघ या गावात एका ठिकाणी जुगार खेळल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी केलेल्या या कारवाई 7 जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून 6 मोबाईल, 4 दुचाकी, रोख रक्कम असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल लाखनी पोलिसांनी जप्त केला.
यंदाच्या गणेशोत्सवात पनवेलकरांना एक वेगळीच झलक पाहायला मिळणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रंगीत रसायनांच्या ऐवजी पर्यावरणपूरक कागदी पेपर पासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तींना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
तळोजा मधील नितलस गावातील स्थानिक तरुण प्रत्येक मोरेश्वर पवार या कलाकारानी पर्यावरण पूरक संकल्पनेला प्रत्यक्षात आणले असून, जुन्या कागदाचे पुनर्वापर करून गणरायाच्या आकर्षक मूर्ती घडवल्या आहेत. या मूर्तींची खासियत म्हणजे त्यांचे विसर्जन केल्यावर पाण्यात कोणतेही प्रदूषण होत नाही, उलट पाण्यात सहज विरघळून पर्यावरणाचे रक्षण करते.
:तुळजापुरात नाभिक समाजाचे आराध्य संत शिरोमणी श्री संत सेना महाराज नाभिक समाज सभागृहाचे भूमिपूजन तुळजापूर मधील कुंभार गल्ली कारपार्किंग शेजारील नियोजित जागेवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नाभिक समाजाच्या या सेवाकार्यास निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे मत आमदार पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केल.सकल नाभिक समाजाचा तुळजापूर येथील मागील 40 वर्षापासुन प्रलंबित जागेचा प्रश्न आमदार राणाजगजितसिंह पाटील माध्यमातून यंदा मार्गी लागला असून या जागेवर संत सेना महाराज सभागृह निर्माण कार्यास शुभारंभ नाभिक बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कोकणातील घरगुती गणेशोत्सवासाठी कळंबोलीतून सिंधुदुर्गच्या दिशेने गणेशभक्तांचा लोंढा रवाना झाला. तळकोकणातील विविध तालुक्यातून नोकरीनिमित्त कळंबोलीत स्थायिक झालेल्या सुमारे १५० कुटुंबांच्या विनंतीवरून सिंधुदुर्ग शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातून भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते यात्रेकरूंकरिता खास बससेवा उपलब्ध करून देण्यात आली.
बस रवाना करताना “गणपती बाप्पा मोरया”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी भाजप शहराध्यक्ष रविंद्र पाटील आणि पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका प्रमिलाताई पाटील उपस्थित होत्या.
रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाळ्या दरम्यान वारंवार घडणाऱ्या दरड दुर्घटनेच्या घटनांच्या पार्श्वभुमीवर रायगड आणि पुणे जिल्हा प्रशासनाने वरंध घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या बंदीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता तर आगामी गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात या रस्त्यावरील वाहतूक सुरु करण्याची मागणी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून केली जात होती. या मागणीच्या अनुषंघाने रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी परिपत्रक काढून वरंध घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला केला असून अतिवृष्टीचे काळात घाटातुन वाहतुक बंद ठेवण्याच्या निर्देश देखील केल्या आहेत.
यवतमाळच्या दारव्हा शहरातील शिवकृपा ज्वेलर्स दुकानातून चार जोडे सोन्याचे कानातील लटकन लंपास करणाऱ्या महिलेला एलसीबीने अकोला येथून अटक केली.दरम्यान ही घटनेना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून एलसीबीने बारकाईने तपासाचा छडा लावून महिलेला अटक केले.मुमताज परवीन अब्दूल शकील असे चोरी करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.