मंत्रालयात 'कोडिंग' लाचखोरी! फाईलवरील 'दोन लाईन'चं गुपित उघड

Mantralaya Secret Code Bribery Scam: मंत्रालायात सिक्रेट कोडद्वारे लाचखोरी कशी चालते... मंत्रालयातील फाईलवरील दोन लाईनचं गुपित नेमकं काय आहे? राजेंद्र ढेरंगेंच्या लाचखोरी प्रकरणात कोणती नवी माहिती समोर आलीय... मंत्रालयातील रेटकार्ड कसं आहे?
Visual representation of Maharashtra Mantralaya amid allegations of a secret coded bribery system.
Visual representation of Maharashtra Mantralaya amid allegations of a secret coded bribery system.Saam Tv
Published On

महाराष्ट्राचं पॉवर सेंटर.... लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठीचं प्रशासकीय केंद्र म्हणजेच मंत्रालय... मात्र याचं मंत्रालयात आठवड्याभरापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाचा क्लर्क राजेंद्र ढेरंगेला लाचखोरीच्या आरोपाखाली रंगेहात पकडण्यात आलं... त्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली...अशातच या लाचखोरीच्या प्रकरणात सिक्रेट कोडद्वारे लाचखोरीचं रेटकार्ड चालवलं जात असल्याचा खळबळजनक दावा निर्मल शर्मा यांनी केलाय...याचं निर्मल शर्मांनी मंत्रालयातील लाचखोरीचं स्टींग ऑपरेशनही केलं होतं...

एसीबीने राजू ढेरिंगेला लाच घेताना रंगेहाथ पकडलं असलं तरी मंत्रालयातील रेटकार्ड चालवण्यात आणखी एका अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे... त्यामुळे मंत्रालयात रेट कार्ड नेमकं कसं आहे..

फाईलवरच्या लाईन्स् म्हणजे लाचखोरीचा कोडवर्ड...त्यामुळे मंत्रालयात कायदे नाहीत, तर 'कोडवर्ड' चालतात का? असा सवाल उपस्थित केला जातोय...फाईलमधले पेपर्स उघडून ही न बघता, नियमांची ऐशीतैशी करून फक्त 'लक्ष्मी' दर्शनासाठी या रेषा मारल्या जात होत्या. त्यामुळे या भ्रष्टाचाराच्या साखळीत आणखी किती अधिकाऱ्यांची नावं समोर येतात...हे पाहणं महत्त्वाचं ठरले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com