शिक्षक मतदारसंघात महायुतीत फूट, महायुतीत पाचही जागांवर बंडखोर

Pune Teachers Constituency Sees Mahayuti Split: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासह पाचही मतदारसंघात भाजप, शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील इच्छुकांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
Maharashtra MLC Elections
Maharashtra MLC Electionssaam tv
Published On: 

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात महायुती आणि मविआतील बंडखोरी उघड झालीय... शिंदेसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीची मागणी धुडकावून भाजपनं 4 ऑक्टोबरला पाच पैकी तीन मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली...ज्यामुळे शिंदेसेना आणि अजितदादांच्या पक्षातले बंडखोर मैदानात उतरले आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघात तर महायुतीत उभी फूट पडलीय...

भाजपनं पुणे शिक्षकसाठी कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी दिलेली तर शिंदेसेनं मंगेश चिवटेंना पक्षाचा एबी फॉर्म दिल्यानं महायुतीत उभी फुट पडलीय.. तर दुसरीकडे शिंदेसेनेचे सचिन सानप यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केलाय...तसचं भाजपच्या बब्रुवाहन रोंगे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय...

त्यामुळे शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा, असा नारा देत मंत्री उदय सामंतांचे OSD सचिन सानप यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय...भाजपनं ऐनवेळी स्मिता जाधव यांना पुणे पदवीधरसाठी उमेदवारी दिल्यानं भाजपचे नाराज इच्छुक उमेदवार शरद लाड यांनीही बंडखोरी करत अर्ज दाखल केलाय...तर मंत्री मुश्रीफ यांचे निकटवर्तीय आणि दादांच्या राष्ट्रवादीचे प्रताप माने यानीही बंडखोरी केलीय..

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातही दादांच्या राष्ट्रवादीनं सतीश चव्हाणांना अधिकृत उमेदवारी दिली असली तरी भाजपच्या एम.के. देशमुख यांनी बंडखोरी केलीय..

दुसरीकडे अमरावती शिक्षक मतदारसंघात

शिंदेसेनेचे विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असली तरी शिंदेसेनेच्या श्रीकांत देशपांडेंनी पक्षाविरोधातच बंडखोरी केलीय.. तर दुसरीकडे मित्रपक्ष भाजपच्या शेखर भोयर, सुमित पवार, सुनील महाराज चव्हाण,संगीता बोंडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय...

दरम्यान नागपूर पदवीधर मतदारसंघात

सुधाकर कोहळेंना भाजपनं अधिकृत उमेदवारी दिली असली तरी भाजपच्या अनिल सोले आणि VHPच्या रमन सेनाड यांनी बंडखोरी केलीय..

बंडखोरीनंतर अनिल सोलेंनी काहीशी नाराजीही व्यक्त केलीय.

एकंदरित महायुतीत पाचही मतदारसंघात बंडखोरी पाहायला मिळतेय.. तसचं मविआतही बंडखोरी समोर आलीय...अमरावती शिक्षक मतदारसंघात

काँग्रेसनं आदिती पोहरेंना अधिकृत उमेदवारी दिली असली तरी ठाकरेसेनेच्या दत्तात्रय लहानेंनी बंडखोरी केलीय...

तर नागपूर पदवीधर मतदारसंघात

काँग्रेसनं विद्यमान आमदार अभिजित वंजारींना पुन्हा उमेदवारी दिली असली तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नितेश कराळे यांनी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करून बंडखोरी केलीय.. आता विधानपरिषदेसाठी 9 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. तोपर्यंत बंडखोरांची समजूत काढण्यात वरिष्ठ नेत्यांना यश येते की ही बंडखोर उमेदवार पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा विजय धोक्यात आणतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com