ऐन गणेशोत्सवात 2 शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार आणखी किती अंत बघणार?

Maharashtra Farmers Hit By Drought And Debt Crisis: लातूर आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकरी कुटुंबांवर संकट. दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आर्थिक अडचणी वाढल्या असून शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे.
Maharashtra farmers facing drought and debt crisis
Maharashtra farmers facing drought and debt crisissaam tv
Published On: 

संदीप भोसले/विश्वभूषण लिमये, साम टीव्ही

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या डोंगरगाव बोरी येथील 33 वर्षीय अंकुश काळे या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्जबाजारीपणा आणि दुष्काळी परिस्थितीमुळे ते आर्थिक संकटात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अंकुश काळे यांच्यावर SBI निटूर शाखेचे सुमारे 1 लाख रुपयांचे, तर डीसीसी बँकेचे 40 हजार रुपयांचे कर्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. दुष्काळामुळे शेतीचे नुकसान आणि वाढता आर्थिक ताण यामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

Maharashtra farmers facing drought and debt crisis
दुष्काळ उठला बळीराजाच्या जीवावर, मराठवाड्यात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

पावसाअभावी दुष्काळ झालाय, त्यामुळे कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा असा प्रश्न त्यांच्या पुढे पडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे डोंगरगाव बोरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Maharashtra farmers facing drought and debt crisis
20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती, राज्यातील 91 तालुक्यातील पिकं करपली

सोलापुरात 55 वर्षीय शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातही शेतकऱ्याच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. कासारी गावातील 55 वर्षीय शेतकरी सुभाष भानुदास माळी यांनी दोन दिवसांपूर्वी शेतात विषारी कीटकनाशक प्राशन केल्याची माहिती आहे. कर्ज आणि नापिकीमुळे सुभाष माळी चिंतेत होते आणि त्यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला.

Maharashtra farmers facing drought and debt crisis
राज्यात दुष्काळ कधी जाहीर होणार? CM फडणवीसांनी तारीखच सांगितली; 2016-17च्या थकीत शेतकऱ्यांनाही कर्जमाफी

या घटनेनंतर माळी यांच्या कुटुंबीयांनी शासनाने या प्रकरणाची दखल घेऊन कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे. दोन्ही घटनांमुळे दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि शेतीतील संकटाचा शेतकरी कुटुंबांवर होत असलेला परिणाम पुन्हा समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com