राज्यात दुष्काळ कधी जाहीर होणार? CM फडणवीसांनी तारीखच सांगितली; 2016-17च्या थकीत शेतकऱ्यांनाही कर्जमाफी

Maharashtra Drought Crisis: राज्यातल्या दुष्काळावरून जोरदार राजकारण पेटलंय.. मुख्यमंत्र्यांनी आता दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा जीआर काढण्याची तारीख बदललीय. तर उद्धव ठाकरेंनी पाच मागण्या केल्या आहेत. आता दुष्काळ कधी जाहीर होणार? उद्धव ठाकरेंच्या मागण्या काय आहेत? पाहूयात हा रिपोर्ट......
MaharashtraDrought
MaharashtraDroughtsaam tv
Published On

मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला असला तरी राज्यातल्या दुष्काळावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलंय. दुष्काळ जाहीर करण्यासाठी उशीर कशाला असा सवाल ठाकरेसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलाय. त्यामुळे सरकारनं आता शनिवारऐवजी शुक्रवारीच दुष्काळाचा जीआर काढण्याची घोषणा केलीय. दुष्काळाच्या दौऱ्यादरम्यानच मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २०१६-१७ च्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

दरम्यान, राज्यातील गंभीर परिस्थिती पाहता उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारसमोर पाच मागण्या केल्यात. उद्धव ठाकरेंनी केलेल्या मागण्या कोणत्या आहेत?... ते पाहूयात....

1. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना जाहीर केलेलं पॅकेज किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं याची माहिती जारी करा

2. नुकत्याच करण्यात आलेल्या कर्जमाफीचा किती शेतकऱ्यांना लाभ झाला याची यादी जाहीर करा

3. पीक विमा कंपन्यांच्या मनमानीमुळे कुठे 5 रुपये, कुठे 21 रुपयांचा चेक शेतकऱ्यांना मिळाला आहे. या गुन्हेगार कंपन्यांना शिक्षा व्हायला हवी

4. सोलापूर, संभाजीनगर, विदर्भात तातडीने कॅबिनेटची बैठक घ्या

5. येत्या दोन ते तीन दिवसात विशेष अधिवेशन बोलवा

एव्हंढच नव्हे तर दुष्काळी दौऱ्यातील काजू-बदाम प्रकाराचाही ठाकरेंनी समाचार घेतला. खऱंतर, मराठवाडा आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात दुष्काळाचं भीषण संकट आहे. केंद्राच्या मदतीची भाषा करणारे मंत्री शरद पवारांच्या पत्रानंतर खडबडून जागे झाले आणि थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या मागण्यांबाबत सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com