Maharashtra News Live Update: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महामार्ग रोको आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत

Marathi Breaking Live Headlines Updates : नवरात्रौउत्सव, सीजीपी दिल्ली आंदोलन, अभिजित दीपके, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महामार्ग रोको आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महामार्ग रोको आंदोलनामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोगनोळी टोलनाक्यावर सुरू असलेल्या या आंदोलनाचा फटका आता प्रवासी वाहतुकीसह मालवाहतुकीलाही बसू लागला आहे. दोन्ही राज्यांदरम्यान धावणाऱ्या बसेस, अवजड वाहने आणि कंटेनर अडकून पडले आहेत. बेळगाव जिल्ह्यातून कोल्हापुरात येणारा भाजीपाला आणि कोल्हापुरातून विविध दूध संघांकडे जाणाऱ्या दुधाच्या वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत वाढली असून शेतात जाताना रात्रीच्या वेळेस बिबट्या शेतात दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी परिसरातील शेतात बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात माजी महापौरांच्या पतीची ७ तासांपासून चौकशी

ठाण्यातील उद्धव ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणी ठाण्याचे माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र ऊर्फ राजू शिंदे यांची गेल्या सात तासांपासून ठाणे खंडणीविरोधी पथकाकडून चौकशी सुरू आहे.

पूर्णेकर यांच्या हत्येनंतर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावे पुरवणी एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. दरम्यान, मीनाक्षी शिंदे यांनाही येत्या काही दिवसांत चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.

हार्बर रेल्वे मार्गावर लोकल गाड्यांचा खोळंबा

CSMT ते पनवेल आणि गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांचा वाहतुकीवर परिणाम

तांत्रिक बिघाडामुळे अनेक लोकल गाड्या थांबल्या

अनेक लोकल गाड्या प्लॅटफॉर्मवरच

रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पत्रकार परिषद

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे

देशातला मतदार मोदींसोबत

राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावे

गुजरातमध्ये कॉँग्रेसचा सातत्याने पराभव

कॉँग्रेस लोकशाही विरोधी पक्ष

राहुल गांधींची झूट की गुंज सुरू

‘लोकशाही पुन्हा लागू करण्यासाठी एकच आंदोलन’; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

देशात लोकशाही शासनपद्धती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी समांतर नव्हे, तर एकच आंदोलन सुरू असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनाचे ठिकाण बंद करण्यात आल्याचा आरोप करत, या निर्णयाविरोधात लढा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशाचे संविधान नष्ट करणे इतके सोपे नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी कालचे आंदोलन केवळ राजकीय पक्षांचे नव्हे, तर देशातील नागरिकांचे आंदोलन असल्याचे म्हटले.

तसेच, नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि देहरादूनमध्ये असल्याचा उल्लेख केलेल्या एका महिलेचा संदर्भ देत, या सर्वांना जबाबदारीला सामोरे जावे लागेल, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.

महाविकास आघाड़ी भूमिकेमुळे शेकाप नाराज

महाविकास आघाडीमधील सन्मानजनक वागणूक न मिळाल्यामुळे शेतकरी कामगार पक्ष नाराज

वेळोवेळी केवळ शेकापच नाही, तर महाविकास आघाडीतील इतर छोटे मित्रपक्षही (जसे की डावे पक्ष आणि इतर स्थानिक आघाड्या) अनेकदा महत्त्वाच्या निर्णयांमध्ये डावलले गेल्याची भावना

संविधानाच्या रक्षणासाठी INDIA आघाडीचा लढा सुरूच राहणार; सुप्रिया सुळे यांची भूमिका

INDIA आघाडीचा भाग म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने एकजुटीने उभे आहोत. देशात संविधानाला दुय्यम ठरवले जात असून, संविधान सध्या धोक्यात आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या अधिकारांच्या रक्षणासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील, असे त्या म्हणाल्या. एका व्यक्तीकडून, एका सरकारचे प्रतिनिधित्व करताना, नागरिकांचे घटनात्मक अधिकार पायदळी तुडवण्याचा गंभीर प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

या अन्याय आणि दडपशाहीविरोधात INDIA आघाडी एकजुटीने लढा देणार असून, दिल्लीपासून ते तळागाळापर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा निर्धार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

ज्ञानेश कुमार एक माफिया आहेत- संजय राऊत

INDIA आघाडीच्या आंदोनलाना मोठं यश’; मल्लिकार्जुन खरगे यांची मोदी सरकारवर टीका

गेल्या चार दिवसांत INDIA आघाडीने राबवलेल्या उपक्रमांना मोठे यश मिळाल्याचा दावा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी जनतेच्या प्रश्नांवर गांभीर्याने आणि समर्पित भावनेने आवाज उठवला, असे खरगे यांनी म्हटले.

दिल्लीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येण्याचे प्रसंग क्वचितच घडतात. विशेष म्हणजे, यावेळी तरुण आणि नागरिक स्वतःहून पुढाकार घेत एकत्र आले, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कथित ‘मतचोरीची योजना’ जनतेसमोर उघड करण्यासाठी आता सर्वजण सज्ज असल्याचा दावा खरगे यांनी केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत INDIA आघाडीच्या आंदोलनाचे समर्थन केले.

राहुल गांधींसह इंडिया आघाडीची पत्रकार परिषद 

दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक संपली आहे. बैठकीत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. मत चोरीचा प्लान समोर आणण्यासाठी सर्व एकत्र असं खर्गे म्हणाले.

आलेगाव पागात तीन एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याची नुकसानभरपाईची मागणी 

शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथे विद्युत तारांच्या घर्षणातून आग लागल्याचा आरोप करण्यात येत असून, या आगीत शेतकरी मारुती राक्षे यांचा तीन एकर ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी धुळ्यात विरोधकांचा मोर्चा

निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातही आंदोलन करण्यात आले.

अकोला जिल्ह्यात बजाज फायनान्सविरोधात वंचित बहुजन आघाडीचे लोटांगण आंदोलन

अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर होऊनही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुली सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विरोधात वंचित बहुजन आघाडीने अकोट येथील बजाज फायनान्स कार्यालय गाठून आक्रमक भूमिका घेतली. शेतकरी आणि शेतमजुरांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना कर्जाचे हप्ते कसे भरायचे, असा सवाल उपस्थित करत शाखा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कथित सक्तीच्या वसुलीची शासनाने दखल घ्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने लोटांगण आंदोलन केले.

नवी मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट! स्वतःचं धरण असूनही शुक्रवारपासून १०% कपात

नवी मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवलं असून येत्या शुक्रवारपासून पाणी कपात लागू होणार आहे. पहिल्या टप्प्यात १० टक्के पाणी कपात केली जाणार असून पुढील टप्प्यात कपातीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मार्चपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा ऑगस्टपर्यंत पुरवण्याचं आव्हान महापालिकेसमोर आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.

सोनसरी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी कारवाई; अधीक्षिका निलंबित करण्याचे आदेश

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सोनसरी शासकीय आश्रमशाळेतील १४ वर्षीय विद्यार्थिनी रानू हलामी हिच्या मृत्यूची आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी गंभीर दखल घेतली आहे. मंगळवारी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात भेट देत त्यांनी मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबीयांना आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत २ लाख रुपयांच्या अनुग्रह अनुदानाचा धनादेश देण्यात आला.

तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ; तुळजापुरात भाविकांची मांदियाळी 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवात आज तिसऱ्या माळेनिमित्त तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. घाटशीळ परिसरातील दर्शन रांगेपासून मंदिरापर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांतूनही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल होत आहेत. दरम्यान, मंदिराच्या मुख्य महाद्वारावर फुलांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली मोराची आकर्षक थीम भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे आणि पप्या शिंदे यांची एकत्रित चौकशी

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीयांनी आरोप केलेले राजेंद्र शिंदे यांची गुन्हे शाखेकडून मागील तीन तासांपासून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान राजेंद्र शिंदे आणि पप्या शिंदे या दोघांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, पप्या शिंदेची पोलीस कोठडी आज संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या चौकशीतून कोणती माहिती समोर येते आणि न्यायालयात गुन्हे शाखा कोणते पुरावे सादर करते, याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

न्यायमूर्ती मोहना यांची प्रकृती अस्वस्थ्य असल्यानं सुनावणी पुढे ढकलली

न्यायमूर्ती अनुपस्थित असल्यानं सुनावणी पुढे ढकलली

आज शिंदे सेनेचे वकील करणार होते युक्तिवाद

शेतकऱ्यांकडून जबरदस्ती कर्जवसुली करू नका - कृषिमंत्री दत्ता भरणे

राज्यातील शेतकरी सध्या कठीण परिस्थितीतून जात असल्याने त्यांच्याकडून जबरदस्तीने कर्जवसुली करू नये, असे आदेश कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी बँकांना दिले आहेत. जबरदस्तीने वसुली केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

इसरूळमध्ये निकृष्ट पाण्याच्या टाकीविरोधात ग्रामस्थांचे शोले आंदोलन

जलजीवन मिशनअंतर्गत इसरूळ येथे बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. टाकीत पाणी भरल्यास ती कोसळण्याचा धोका असल्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी सकाळपासून थेट टाकीवर बसून शोले आंदोलन सुरू केले आहे. संबंधित टाकी पाडून नवीन टाकी बांधावी, तसेच दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मोठी घडामोड; माजी महापौरांच्या पतीची चौकशी सुरू

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पती राजेंद्र शिंदे उर्फ राजा यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. खंडणीविरोधी पथकाकडून गेल्या एक तासापासून त्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीमागील नेमके कारण आणि तपासातून कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर पुढील तपशील स्पष्ट होणार आहेत.

महायुतीत एकनाथ शिंदे पुन्हा नाराज

महायुतीत एकनाथ शिंदे पुन्हा नाराज

वर्षावरील बैठकीत एकनाथ शिंदेंची दांडी

रायगडमध्ये गोडाऊनचे लोखंडी शेड कोसळले; एक कामगाराचा मृत्यू, २० ते २५ जण जखमी

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मानकिवळी येथे कस्तुरी लॉजिस्टिक्स कंपनीच्या गोडाऊनचे बांधकाम सुरू असताना लोखंडी शेड कोसळले. या दुर्घटनेत २० ते २५ कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे. हेल्प फाउंडेशन, ग्रामस्थ आणि पोलिसांनी जखमींना खोपोली रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान एका कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Delhi: कोर्टाने सांगूनही जंतर-मंतर परिसरातील बॅरिगेट्स पोलिसांनी काढले नाहीत

दिल्ली -

कोर्टाने सांगूनही जंतर-मंतर परिसरातील रस्त्यावर असणारे बॅरिगेट्स दिल्ली पोलिसांनी काढलेले नाहीत.

जंतर-मंतर परिसरात जाणाऱ्या गाड्या पोलिसांकडून अडवल्या जात आहेत

जंतर-मंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

Tulajapur: तुळजाभवानी मंदिरात पोलिसांनी मंदिर संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला केली मारहाण

धाराशिव -

तुळजाभवानी मंदिरात पोलिसांनी मंदिर संस्थानाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला मारहाण केली

पितळी गेटमधून प्रवेश नाकारल्याने मंदिर संस्थांनाच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्याला मारहाण करून केले गंभीर जखमी

पोलिस आरोपी असल्याने पोलिस गुन्हा दाखल करून घेईनात, मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांने व्यक्त केली खंत

Hingoli: जंतर-मंतर अमित शाह यांच्या घरचे नाही 140 करोड भारतीयांचे आहे - अभिजीत दीपके

हिंगोली -

मी आंदोलनासाठी निघालो आहे

तुम्हाला मला अटक करायची तर करा पण मी जाणार

जंतर-मंतर अमित शाह यांच्या घरचे नाही 140 करोड भारतीयांचे आहे

दिल्लीकडे रवाना होताना अभिजीत दीपके यांची प्रतिक्रिया

Pune: पुण्यातील पाषाण येथे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी बेमुदत आंदोलन सुरूच

पुणे -

सलग दुसऱ्या दिवशीही पुण्यातील पाषाण येथे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी बेमुदत आंदोलन सुरूच

सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर व ॲडव्होकेट श्री कीर्ती काळे यांच्या वतीने बाणेर- पाषाण लिंक रोड पाषाण पुणे येथे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामासाठी बेमुदत आंदोलन सुरू आहे.

Hingoli: अभिजीत दीपके कारने जंगलात गेले अन् फोन करून सहकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

दिल्लीतील सहकाऱ्यांना अटक

अभिजीत दीपके यांनी पोलिसांना चकवा देत जंगल गाठलं

अभिजीत दीपके कार घेऊन जंगलात गेले

फोन करून सहकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

Mumbai: एसआयआरमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची नावं वगळल्याचा आरोप

मुंबई:

एसआयआरमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची नावं वगळल्याचा आरोप

मनसेचे शाखा प्रमुख संतोष साळी यांच्यासह अनेकांची नावं वगळली गेल्याचा आरोप

आज मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारणार

वडाळ्यातील निवडणूक कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालणार असल्याची माहिती

Mumbai News: वडाळ्यातील निवडणूक कार्यालयावर मनसेची धडक

मुंबई -

वडाळ्यातील निवडणूक कार्यालयावर मनसेची धडक

फॉर्म प्रक्रियेतील गैरप्रकारांवर संदीप देशपांडे आक्रमक

शाखाध्यक्षांचे फॉर्म चुकीच्या पद्धतीने भरले जात असल्याचा आरोप

वडाळ्यात निवडणूक नोंदणी प्रक्रियेवरून मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक

वडाळ्यात मनसेचा निवडणूक अधिकाऱ्यांना घेराव

फॉर्म प्रक्रियेतील गैरप्रकारांवरून जाब विचारला

Mumbai: मुंबई क्राइम ब्रँचच्या युनिट १२ कडून जासूसी रॅकेटचा तपास सुरू

मुंबई -

मुंबई क्राइम ब्रँचच्या युनिट १२ कडून जासूसी रॅकेटचा तपास सुरू.

एका CDR किंवा SDR साठी प्रत्येकी ४ हजार रुपये घेतल्याचा आरोप.

जासूसीच्या कामासाठी ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत वसुली केल्याचा संशय.

कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), सबस्क्रायबर डिटेल रेकॉर्ड (SDR) आणि मोबाईलचे लाइव्ह लोकेशन बेकायदेशीरपणे मिळवून दिल्याचा आरोप.

आतापर्यंत ५० हून अधिक व्यक्तींची गोपनीय माहिती काढल्याचा संशय.

संजय उर्फ हंजला मुबारक सैयद हा रॅकेटचा कथित मुख्य सूत्रधार.

Pune: पुण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रचार सभा

पुणे -

पुण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रचार सभा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

जयंत आसगावकर आणि हर्षदा जाधव यांच्या प्रचारासाठी सभा

पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात प्रचार सभा पार पडणार

Belgaon: बेळगावच्या हत्तरगी टोलनाक्यावर कर्नाटकातील रयत संघटनेचे आंदोलन सुरू

बेळगाव -

हत्तरगी टोलनाक्यावर कर्नाटकातील रयत संघटनेचे आंदोलन सुरू

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील कर्नाटकातील हत्तरगी टोलनाक्यावर रयत संघटनेच्या वतीने आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होत आहे.

Delhi : कॉक्रोच जनता पार्टीने आज जंतर-मंतरवर तिरंगा फडकवला

दिल्ली -

कॉक्रोच जनता पार्टीने आज जंतर-मंतरवर तिरंगा फडकवला

जंतर-मंतरचा अभेद्य किल्ला पुन्हा काबीज केला

Delhi: गुन्हे दाखल करा किंवा अटक करा आम्ही थांबणार नाही - संजय राऊत

दिल्ली -

भाजप सरकार पडण्याबाबत राऊत यांचे मोठं विधान

सहा महिन्यात मोदी शाह यांना गाशा गुंडाळावा लागणार

5 नाही 5 हजार गुन्हे दाखल केले तरी घाबरणार नाही

गुन्हे दाखल करा किंवा अटक करा आम्ही थांबणार नाही

आंदोलन कुठे करायचं हे आम्हाला शिकवू नका! अमित शाह यांच्या घरासमोरही आंदोलन करू; संजय राऊतांचा थेट इशारा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि प्रशासनाला थेट इशारा देत गृहमंत्री अमित शाह यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचे संकेत दिले आहेत.

आंदोलनाच्या जागेवरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, "आम्ही यापूर्वी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासासमोरही आंदोलन केलेले आहे. त्यामुळे गरज पडल्यास दिल्लीतील कृष्णा मेनन मार्गावर (अमित शाह यांचे निवासस्थान) आंदोलन करण्यासही आम्ही मागे-पुढे पाहणार नाही."

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत बजावले की, "आंदोलन कुठे करायचे आणि कुठे नाही, हे आम्हाला कोणीही सांगण्याची गरज नाही," या शब्दांत त्यांनी विरोधक व प्रशासनाला ठणकावून सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षावर बोलावली बैठक

राज्यात कचऱ्यापासून तयार होणार कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षावर बोलावली बैठक

शेतीचा कचरा, नागरी घनकचरा आणि पशुधनाच्या शेणापासून तयार करणार सीबीजी

राज्यातील ४२३ नागरी स्थानिक संस्थांमधील कचऱ्याची समस्या

कचऱ्यातून गॅस निर्माण करण्याची महत्त्वाची मोहीम

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बैठकीसाठी राहणार उपस्थित

जंतर-मंतरवर खळबळ! CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका जंतर-मंतरवर पोहोचले होते. त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली

सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके 12:00 वाजता दिल्लीकडे रवाना होणार

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील लढा तीव्र करण्यासाठी अभिजीत दिपके पुन्हा एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरणार आहेत. आजींच्या अंत्यसंस्कारासाठी दोन दिवसांपासून हिंगोलीत असलेले अभिजीत दिपके आज दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाप्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

१२ ऑक्टोबरच्या आंदोलनानंतर एकूण ५ FIR दाखल

BNSS कलम १६३ च्या उल्लंघनासह विविध कलमांखाली गुन्हे नोंद

तिलक मार्ग पोलीस ठाण्यात २ FIR

कनॉट प्लेस, मंदिर मार्ग आणि बाराखंबा पोलीस ठाण्यात प्रत्येकी १ FIR

आंदोलनानंतर कायदेशीर कारवाईला वेग; दिल्ली पोलिसांचा तपास सुरू'

CJP कार्यकर्त्यांकडून जंतर मंतर इथ पोहोचण्याचा प्रयत्न

आज सकाळी काही कार्यकर्ते अचानक जंतर मंतर इथ पोहोचले

मागच्या गेटने पोहोचून हातात तिरंगा घेत कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी

घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

जंतर मंतर परिसरात आंदोलनाची परवानगी नसताना CJP समर्थक यांनी तिथे पोहोचून घोषणाबाजी केली

आशुतोष रांका यांनी CJP कार्यकर्त्यांचा व्हिडिओ पोस्ट केलाय

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ!

मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

सुधारित वेळापत्रक

✅ दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : 31 ऑगस्ट ते 26 ऑक्टोबर 2026

✅ दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया : 31 ऑगस्ट ते 10 नोव्हेंबर 2026

✅ अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार : 16 नोव्हेंबर 2026

पात्र मतदारांनी काय करावे?

प्रारूप मतदार यादीत आपले नाव व तपशील तपासा. नाव वगळले असल्यास नाव समाविष्ट करण्यासाठी, नोंदीत चूक असल्यास दुरुस्तीसाठी किंवा आवश्यकतेनुसार हरकत नोंदवण्यासाठी 26 ऑक्टोबर 2026 पूर्वी संबंधित अर्ज दाखल करा.

फेस रिकग्निशनपासून वाचण्यासाठी अभिनेत्री Richa Chadhaचा अनोखा मेकअप

बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढानं आंदोलकांच्या समर्थनात एक खास व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये तिनं फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानापासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर खास मेकअप कसा करावा, हे स्वतः करून दाखवलंय. पाहूयात

शिरुरमध्ये १० एकर ऊस जळून खाक; ऊसतोडीपूर्वीच आगीचा फटका, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे विद्युत तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे १० एकर अडसाली ऊस जळून खाक झालाय. विशेष म्हणजे, काही दिवसांतच या उसाची तोड होणार होती; मात्र त्याआधीच आग लागल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.

पिंपळसुटी येथे ११ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. शेतातून गेलेल्या विद्युत वाहिनीची तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज शेतकरी रावसाहेब फराटे यांनी व्यक्त केला आहे. या आगीत गट क्रमांक २७० आणि २७१ मधील फराटे व त्यांच्या नातेवाईकांचा सुमारे १० एकर अडसाली ऊस जळून खाक झाला. काही दिवसांतच ऊसतोड होणार असल्याने शेतकऱ्यांना उत्पन्नाची अपेक्षा होती; मात्र तोडणीपूर्वीच आग लागल्याने हातातोंडाशी आलेलं पीक जळून मोठं आ…

सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून दहा टक्के पाणी कपातीचे निर्देश,

सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून दहा टक्के पाणी कपातीचे निर्देश, 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन..

जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाचे पाऊल..

सोलापूर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन काढले आदेश

31 ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज सुरक्षित ठेवण्यासाठी जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन केले जाणार..

16 ऑक्टोंबर 2026 पासून महानगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायतसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणी वापरात दहा टक्के कपात करण्याचे आदेश..

देवगड समुद्रात मालवणच्या मच्छीमार बोटीला आग

देवगड समुद्रात मालवणच्या 'भगवती' बोटीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग लागताच समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी बोटीवरील सर्व २५ खलाशी सुखरूप बचावकार्य केले.

​मालवण येथील मच्छीमार गोपी तांडेल यांची 'भगवती' नावाची नौका मासेमारीसाठी देवगड समुद्रात गेली होती. बोटीच्या इंजिनमधील वायरिंगमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे आगीचा भडका उडाला. समुद्रात बोटीला आग लागल्यामुळे खलाशांमध्ये धावपळ उडाली मात्र वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे बोटीवरील सर्व २५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

जळगाव महापालिकेचा महिनाअखेर ६०ऐवजी ४५ मिनिटेच पाणीपुरवठ्याचे नियोजन

यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने वाघूर धरणातील पाणीसाठ्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शहरात महिनाअखेर ६०ऐवजी केवळ ४५ मिनिटेच पाणी पुरवले जाईल, असे संकेत मनपा पाणीपुरवठा विभागाने दिले आहेत. दरम्यान, १०० मोठ्या इमारतींची बांधकामेही थांबण्याची शक्यता आहे.

'ऑक्टोबर हीट' दशकातील सर्वाधिक तापमान पारा ३८ अंशांपर्यंत शहरात उन्हाचा कडाका कायम

जळगाव, पावसाळा संपल्यानंतर वातावरणात गारवा जाणवण्याची अपेक्षा असताना यंदा कमी पावसामुळे ऑक्टोबरमध्ये उन्हाचा चटका वाढलेला आहे. जळगावमध्ये सध्या कमाल तापमान वाढलेले असून सध्या ३८ अंशांपर्यंत पोहोचलेला आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार गेल्या दशकात ऑक्टोबरमध्ये यंदा उच्चांक तापमानाची नोंद झाली आहे.

नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्वेलर्सच्या दुकानात चोरीची घटना उघडकीस

- चोरट्यांनी सोने खरेदी करण्याचा बहाणा करून सुमारे ७० हजार रुपयांचे दागिने लंपास केले.

- आशिष ज्वेलर्स नावाच्या दुकानात दोन अज्ञात युवक आले, त्यांनी सोन्याची अंगठी पाहण्यासाठी हातात घेतली आणि संधी साधून अंगठीसह पळ काढला.

- त्यांचा तिसरा साथीदार दुचाकी घेऊन काही अंतरावर तयार होता, तिघेही दुचाकीवरून पसार झाले, दुकानदाराने चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र त्यांना पकडण्यात यश आले नाही.

Rahul Gandhi यांची आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात, याचिकेत तब्बल 14 त्रुटी

राहुल गांधींची सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाविरोधात याचिकासुप्रीम कोर्टातील याचिकेत तब्बल 14 त्रुटीसुप्रीम कोर्टात आज सुनावणीची शक्यता कमीराहुल गांधीसह इंडियाच्या 11 नेत्यांची सुप्रीम कोर्टात यचिका

यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण भागात कृषी फिडर कोलमडले

यवतमाळ जिल्ह्यामध्ये सध्या उन्हाचा पारा 37 अंशापर्यंत वर चढल्याने खरिप हंगामातील पीक होरपळण्याच्या वाटेवर आहेत.अशा वेळी पाण्याची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक वाचविण्यासाठी धडपड सुरू केली असून याचवेळी कृषी फिडर कोलमडल्याने शेतकऱ्यांना सिंचन करणे अवघड झाले आहेत. सुरळीत वीजपुरवठा देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

धाराशिवमध्ये दुष्काळातही महाविद्यालयाकडून परीक्षा शुल्क वसुली - कैलास पाटील आक्रमक

राज्य सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीची घोषणा केली असतानाही महाविद्यालयांकडून प्रत्यक्षात परीक्षा शुल्क वसूल केले जात असल्याचा प्रकार धाराशिव मध्ये समोर आला आहे.विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी कळंब शहरातील महाविद्यालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परीक्षा शुल्क वसुली तत्काळ थांबविण्याची मागणी केली. दहावी बारावीच्या धर्तीवर विद्यापीठांच्या परीक्षा अर्ज प्रणालीत सुधारणा करून विद्यार्थ्यांचे अर्ज एकही रुपया न घेता स्वीकारावेत, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

सोनसरी आश्रमशाळेत विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात असलेल्या सोनसरी येथील आश्रमशाळेत एका आठव्या वर्गातील विद्यार्थिनीने शाळेच्या वस्तीगृहातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना सोमवारी (१२ ऑक्टोबर) उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

दुपारी दोन वाजता शिंदे सेनेचे वकील नीरज किशन कौल करणार युक्तिवाद

सुप्रीम कोर्टाने 30 ऑक्टोबर पूर्वी सुनावणी पूर्ण करण्याबाबत वक्तव्य केल्यामुळे आजच्या सुनावणी कडे लक्ष

राहुल गांधींच्या निवासस्थानी आज इंडिया आघाडीची बैठक

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या निवासस्थानी आज इंडिया आघाडीची बैठक

सायंकाळी चारच्या सुमारास बैठक

इंडिया आघाडीच्या खासदारांना राहुल गांधींनी चहापानासाठी आमंत्रित केले

‘व्होट चोरी’विरोधातील संयुक्त आंदोलनाची रणनीती ठरण्याची शक्यता

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यावरही चर्चा होणार

चर्चेनंतर मोर्चा किंवा पत्रकार परिषद होण्याची शक्यता

मात्र, पुढील रणनीती अद्याप गुलदस्त्यात

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार गटाची सत्ता

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी अंतिम टप्प्यात आले असून या निवडणुकीत अजित पवार गटाने 21 च्या 21 जागा जिंकून कारखान्यावर पुन्हा वर्चस्व सिद्ध केलं आहे तर विरोधी दोन्ही पॅनलला एक खाते देखील उघडता आले नाही

Maharashtra News Live Update : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅकेवर महायुतीने रोवला झेंडा

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत बँकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून रात्री उशीरापर्यंत चाललेल्या मतमोजणीत 25 जागेपैकी महायुतीला 16 जागांवर विजय मिळवून बहुमत मिळवले आहे. यामुळे आता महाविकास आघाडीच्या ताब्यात असलेल्या बँकेच्या चाव्या महायुतीच्या हाती गेल्या आहेत. महाविकास आघाडीला 8 जागेवर उमेदवार निवडून आले आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आलाय. भाजपचा महायुतीच्या मित्र पक्षांना सोबत घेत शिंदेसेनेने बँकेच्या सत्तेत मोठा वाटा मिळविला आहेत. या निवडणुकीत संचालक पदाच्या 25 जागेपैकी तालुका गटातील दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या त्यानंतर 23 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी महायुतीला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.