‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून बुलढाण्यात वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. पुस्तकाचे शीर्षक बदलावे, अन्यथा त्यावर बंदी आणावी, अशी मागणी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांनी केली आहे.
उद्याच्या रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मोर्चाचे स्वागत असल्याचे सांगत, मोर्चादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज असा सन्मानपूर्वक उल्लेख करूनच पुस्तकाचे वाचन करावे, अशी अटही त्यांनी घातली आहे. दरम्यान, काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोर्चात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी माहिती मिळत असल्याचा दावा करत, जर आमदार गायकवाड यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य झाले तर त्याला मोर्च्यातच जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही राजपूत यांनी दिला आहे