सूर्य आग ओकू लागलाय..आणि उष्णतेच्या लाटेनं राज्यात अक्षरशः कहर केलाय. एप्रिल महिन्यातच राज्यात तापमानाने आजवरचे सर्व विक्रम मोडलेत. कोकणापासून विदर्भापर्यंत महाराष्ट्र तापला..राज्यातील विविध भागांतील तापमान 45 अंश सेल्सियसच्या वर पोहोचलंय. त्यामुळे वाढत्या उष्णतेमुळे राज्यातील नागरिक अक्षरशः हैराण झालेत. अकोल्यात जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. इतकंच नाहीतर अख्खा विदर्भ उष्णतेच्या लाटेत होरपळतोय. आतापर्यंत उष्माघातानं 7 जणांचा बळीदेखील गेलाय. तर दुसरीकडे उष्माघाताच्या रुग्णांमध्येही वाढ होतेय.
राज्यात उष्माघातामुळे रविवारी चौघांचा बळी गेलाय. परभणी, नागपूर, हिंगोली, लातूरमध्ये उष्माघातामुळे मृत्यूची नोंद झालीये. इतकंच नाहीतर अकोला, वाशिम, बुलढाणा, अहिल्यानगरमध्येही चौघांचा बळी गेल्याची माहिती समोर आलीये. विशेष म्हणजे, 1 मार्च ते 25 एप्रिलदरम्यान राज्यात उष्माघाताचे एकूण 39 रुग्ण नोंदवले गेलेत. यात अकोल्यात 7, नंदुरबारमध्ये 5 तर रत्नागिरीत 4 रुग्णांची नोंद झालीये.
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागाकडून विविध जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातोय. त्यातच विदर्भात उष्णतेच्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर होण्याची शक्यताही वर्तविलीये.
वाढत्या उन्हामुळे राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभागही सज्ज झाला असून त्यानुसार एसओपी पण जाहीर केलीये. तसंच, शेतकऱ्यांच्या पिकांवर उष्णतेच्या मोठा परिणाम होतो. वाढत्या उष्णतेमुळे वीजेच्या मागणीतही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते. त्यामुळे पुढील महिन्यात सर्वांसमोर वाढत्या तापमानाचं मोठं आव्हान असणार आहे. अशावेळी विशेषतः दुपारच्या वेळेस आवश्यकता नसताना घरातून अजिबात बाहेर पडू नका. डॉक्टरांचा आपल्याला नेहमीच एक सल्ला असतो, 'प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर' म्हणजेच पुढचा महिना कडक उन्हाचा असल्याने आजारी पडण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.