शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच शिक्षक भरती घेण्यात येणार आहेत. राज्यभरातील जिल्हापरिषदेचे सुमारे 1 हजार खासगी शिक्षण संस्थांमधील 20 हजारांहून अधिक जागांच्या जाहिराती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
यातच अंतर्गत तब्बल 16, 500 जागांवर मुलखात न घेता नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच उर्वरित जागांवर मुलाखती घेऊन नियुक्त केल्या जातील, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, कृषी विद्यापीठे तसेच संलग्न महाविद्यालयांतील शिक्षक व अध्यापकांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 62 वरून 60 वर्षे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे करण्याबाबत 2015 मध्ये घेण्यात आला होता. (Latest Marathi News)
या विद्यापीठांमधील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता, शारीरिक शिक्षण निदेशक, क्रीडा अधिकारी, ग्रंथपाल, अधिष्ठाता आणि संचालक दर्जातील अध्यापकांचा यात समावेश आहे.
विद्यापीठांमध्ये अधिक कार्यक्षम मनुष्यबळ निर्मिती करणे आवश्यक असून भारतीय कृषी अनुसंशोधन परिषदेने नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची शिफारस केली आहे. हे पाहता नवीन भरतीमुळे विद्यापीठामंध्ये संशोधन व शिक्षण या क्षेत्रात अनुभवी व कुशल अध्यापकीय मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.