Delhi Crime: मुलीनं टाकला आईच्या घरातच दरोडा; रोख रक्कम आणि बहिणेचे दागिने केले लंपास, दिल्लीतील घटना

Daughter Robbery In Mother House: दिल्लीमध्ये एक चोरीची घटना घडली आहे. मुलीने आईच्या घरीच चोरी केली आहे. तिने आईच्या घरातून रोख रक्कम आणि बहिणीचे दागिने लंपास केले आहेत. मुलीनं असं पाऊल का उचललं, ते आपण जाणून घेऊ या.
crime news
crime newsSaam Tv

Daughter Robbery In Mother House Delhi

राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ३१ वर्षीय महिलेनं तिच्या आईच्याच घरात चोरी केली आहे. उत्तम नगरमधील मोहन गार्डन परिसरात ही घटना घडली. तिला कोणी ओळखू नये म्हणून तिने बुरखा घालून ही चोरी केली आहे.  (Latest Crime News)

दिल्ली पोलिसांनी या महिलेला तिच्या आईच्या घरातून दागिने चोरल्याच्या आरोपाखाली अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने पैशांची गरज होती आणि आईकडून मला जास्त प्रेम मिळत नाही, म्हणून हे (Daughter Robbery In Mother House) पाऊल उचलल्याचं सांगितलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आईच्याच घरात केली चोरी

या महिलेनं आईच्या घरातून पंचवीस हजार रुपयांच्या रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. ही घटना (crime) ३० जानेवारी रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान घडली आहे. घरफोडी विरोधी सेलने पुराव्यांचा आढावा घेतला. त्यानंतर आरोपी महिलेचे भिंग (robbery) फुटलं आहे. आरोपीवर कर्ज असल्याचंही समोर आलं आहे.

चौकशीमध्ये या महिलेनं आपला गुन्हा कबुल केला आहे. आई तिच्यापेक्षा तिच्या लहान बहिणीवर जास्त प्रेम करते. या रागातून तिने आईच्याच घरी चोरी केल्याचं सांगितलं आहे. तिला आर्थिक अडचण असल्यामुळं तिला चोरी ( daughter robbery) करावी लागली. तिच्या आईचं जास्त प्रेम तिच्या लहान बहिणीला मिळत होतं. आपल्या बहिणीचा हेवा आणि राग वाटत असल्यामुळे तिने दरोड्याची योजना आखल्याचं कबूल केलं आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली होती.

crime news
Crime News: भररस्त्यातून २२ वर्षीय तरुणीचे अपहरण, जबरदस्ती दारू पाजत धावत्या कारमध्ये अत्याचार; चौघांवर गुन्हा

'अशी' केली चोरी

जानेवारीमध्ये, आरोपीने तिच्या आईला घर मोहन गार्डन परिसरातून उत्तम नगर येथे स्थलांतरित करण्यासाठी मदत केली. ३० जानेवारी रोजी तिने सामान पॅक करत असताना चतुराईने घराच्या चाव्या ( daughter steal jewelry and cash) चोरल्या. ती एका सार्वजनिक शौचालयात गेली. तिथे तिने कपडे बदलले आणि नंतर तिने आईच्या घरी जाऊन चोरी केली. नंतर तिने चोरीबद्दल पश्चातापही व्यक्त केला, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. तेव्हा त्यांना ही घटना थोडी संशयास्पद वाटली. एका काळा बुरखा घातलेल्या महिलेनं घराचं कुलुप उघडून घरात प्रवेश केला होता. तिने दरवाजा तोडला नाही, त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यांचा संशय या महिलेच्या मुलीवर होता. त्यानंतर मुलीने तिचा गुन्हा (Delhi Crime) कबूल केला आहे.

crime news
Pune Robbery News |आजोबांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून 27 लाख लंपास केले! कसे सापडले पोलिसांच्या हाती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com