
राम गणेश गडकरी यांचे ‘राजसंन्यास’ नाटक वादानंतर खंडातून वगळले.
आमदार अमोल मिटकरी यांनी या नाटकाविरोधात आक्षेप नोंदवले होते.
राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने एकमताने निर्णय घेतला.
संभाजी महाराजांवरील वादग्रस्त उल्लेखांमुळे नाटकाला शासकीय संन्यास.
राज्य साहित्य व संस्कृती मंडळ प्रकाशित करत असलेल्या 'संपूर्ण गडकरी खंड 1' मधून राम गणेश गडकरी यांचे 'राज्यसंन्यास' नाटक वगळण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारने आमदार अमोल मिटकरी यांनी नोंदवलेले आक्षेप राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे पाठविले होते. या आक्षेपांवर मंडळाने एकमताने शिक्कामोर्तब करत ते खंडातून वगळण्याचा निर्णय घेतलाय.
'राजसंन्यास' नाटकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप आमदार मिटकरींनी केला होता. यासंदर्भात विधिमंडळात हा प्रश्न मांडत पुरावे राज्य सरकारकडे सादर केले होते. लवकरच सरकार आगामी 'राम गणेश गडकरी 1' मधून वगळण्याची अधिकृत घोषणा करणार आहे. यासंदर्भात आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य साहित्य व संस्कृती मंडळ अन् सरकारचा आभार मानले आहेत.
राज्य सरकार कोणत्याही महापुरुषांची बदनामी खपवून घेणार नसल्याचा इशारा यावेळी आमदार म्हणून मिटकरी यांनी दिला होता. दरम्यान, यासोबतच इतर महापुरुषांच्या संदर्भात youtube आणि इतर ठिकाणी असलेले बदनामीकारक मजकूर लवकरच काढून टाकावेत, राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे मिटकरी म्हणालेत.
राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनीही प्रतिक्रिया दिलीय. नाटक वाचून कोणी छत्रपत्री संभाजी महाराजांविषयी मत बनवले तर ते महाराजांवर अन्यायकारक ठरेल. त्यामुळे सरकार जर नाटक शासकीय संग्रहातून वगळण्याचा निर्णय सरकार घेणार असेल तर त्यास मंडळाचा पाठिंबा असेल, असं सदानंद मोरे म्हणालेत.
आमदार अमोल मिटकरी यांनी राम गणेश गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ या नाटकातील मजकुरावर आक्षेप नोंदवणारे पत्र तसेच हे लिखाण वगळण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली. त्यानंतर सरकारने मंडळास या संदर्भात मत विचारले. केवळ हे नाटक वाचून कोणी छत्रपत्री संभाजी महाराजांविषयी मत बनवले तर ते महाराजांवर अन्यायकारक ठरेल.
तेव्हा हे नाटक शासकीय संग्रहातून वगळण्याचा निर्णय सरकार घेणार असेल तर त्यास मंडळाचा पाठिंबा असेल. सद्य:स्थितीत या निर्णयास पर्याय नाही”, असे मत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी बोलताना व्यक्त केलं. गडकरींनी हे नाटक लिहिल्यानंतर अनेक पुरावे समोर आले. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांविषयीचे मत बदलण्यास मदत होईल, असं सदानंद मोरे यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.