Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

NYC India Event: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये भारतीयांचा उत्सव; 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने वातावरण भारावून टाकले. भारतीय परंपरा आणि अभिमानाचे दृश्य शहरात साजरे झाले.
Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं
Published On
Summary
  • न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये भारतीयांचा सांस्कृतिक उत्सव

  • 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जयघोष वातावरण भारावून टाकले

  • भारतीय परंपरा, संस्कृती आणि अभिमानाचे दृश्य अमेरिकेत साजरे

  • अमेरिकेतील भारतीय समुदायासाठी ऐतिहासिक आणि भावनिक अनुभव

अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज 

न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून गेलं आहे. न्यूयॉर्कमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या 'इंडिया डे परेड'चे याच परेडमध्ये शिवप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण उजाडला आहे. छत्रपती फाउंडेशनच्यावतीने सजविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तिरथाने मॅडिसन अव्हेन्यू भगवामय करून टाकला आहे.

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्ताने न्यूयॉर्कमध्ये दरवर्षी इंडिया डे परेड आयोजित केली जाते. न्यूयॉर्कच्या मॅडिसन अव्हेन्यूवर हजारो भारतीय आणि अमेरिकन नागरिकांच्या उपस्थितीत जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात हा ऐतिहासिक क्षण साक्षीदार ठरला आहे. यावर्षी छत्रपती फाउंडेशनच्या शिवकीर्तिरथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रथावर शिवाजी महाराज, जिजाऊ, बाल शिवबा आणि मावळ्यांच्या भूमिका बालक, महिला आणि युवकांनी दिमाखदार अभिनयासह साकारले आहेत. तर जल्लोश ढोल-ताशा पथकाच्या पन्नासहून अधिक वादकांनी न्यूयॉर्क शहराचे वातावरण दणाणून सोडले आहे.‌ बॉलीवूड दिग्दर्शक संदेश रेड्डी यांच्या रुद्र डान्स अकॅडमीच्या मुलींनी लेझीमसह नृत्यप्रकार सादर करून परेड रंगतदार केली आहे. मिशिगन राज्याचे खासदार श्रीनिवास ठाणेदार कीर्तिरथावर खास पाहुणे म्हणून सहभागी झाले आहेत.

न्यूयॉर्कचे महापौर एरिकॲडम्स यांच्या हस्ते परेडची सुरुवात झाली आहे. तर भारताच्या न्यूयॉर्क येथील राजदूत बिनाया प्रधान यांनी छत्रपती फाउंडेशनचे कौतुक करत “त्यांचा रथ जितका दिमाखदार, त्यांचे कार्य त्याहूनही प्रभावी आहे” असे गौरवोद्गार काढले आहे. या परेडला खास आकर्षण ठरले लोकप्रिय अभिनेते विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मीका मंदाना या दोघानही यंदा 'ग्रँड मार्शल'चा मान मिळाला आहे.

Q

हा कार्यक्रम कुठे झाला?

A

हा कार्यक्रम न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये पार पडला.

Q

या कार्यक्रमात कोणत्या जयघोषांचा समावेश होता?

A

'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषांचा उत्सव करण्यात आला.

Q

हा कार्यक्रम कोणत्या समुदायासाठी आयोजित केला होता?

A

हा कार्यक्रम मुख्यतः अमेरिकेतील भारतीय समुदाय आणि भारतीय संस्कृती प्रेमींसाठी आयोजित केला गेला होता.

Q

कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य काय होते?

A

भारतीय परंपरा, राष्ट्रीय अभिमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान हा या कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com