Maharashtra Government: सरकारचं दिवाळीत ₹२१०० खास गिफ्ट, कुणाला होणार फायदा? किटमधील २५ वस्तूंची यादी

Maharashtra Government Diwali Gift: महाराष्ट्र सरकारने पुरग्रस्तांना दिलासा दिला आहे. आता दिवाळीत पुरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत.
Maharashtra Government
Maharashtra GovernmentSaam Tv
Published On

राज्यात यावर्षी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगर या ठिकाणी पावसाने अगदी झोडपून काढले होता. लाखो नागरिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले आहेत. अक्षरश: अनेकांचे संसार वाहून गेले आहेत.

Maharashtra Government
Solapur : दिलदार सोनू सूद सोलापुरात येणार, पूरस्तांना दिला मदतीचा हात | VIDEO

पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार माजला होता. १०८ गावांमध्ये पाणी शिरले होते. नदीकाठच्या जवळपास ११ हजार ८०५ घरांमध्ये पाणी घुसले होते. त्यामुळे त्यांच्या घरातील अनेक वस्तू वाहून गेल्या. अन्नधान्यांचे नुकसान झाले. या नागरिकांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता या नागरिकांना शासनाकडून जीवनावश्यक वस्तूंचे किट मिळणार आहे. यामध्ये २५ वस्तू असणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठवला आहे.

Maharashtra Government
Small Saving Schemes: सरकारचा मोठा निर्णय! बचत योजनांवरील व्याजदर जैसे थे वैसे; वाचा सविस्तर

दिवाळीला २१०० रुपयांच्या वस्तू भेट

१८ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरु आहे. त्याआधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अजूनही पंचनामे सुरु आहेत त्यामुळे शासनाकडून मदत मिळण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे दिवाळी चांगली जावी, यासाठी काही वस्तू पूरग्रस्त नागरिकांना दिल्या जाणार आहेत. या वस्तू २१०० रुपयांच्या असणार आहेत.

Maharashtra Government
Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यावर दिवाळीत ₹३०००? सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

दिवाळीला मिळणार गिफ्ट

पूरग्रस्त नागरिकांना दिवाळीत टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, मेणबत्ती, तेल, गहू, साखर, चने, डाळ, तेल,गूळ अशा अनेक वस्तू दिल्या जाणार आहेत.एकूण २५वस्तू असणार आहेत. या किटची किंमती २१०० रुपये असणार आहे. याचसोबत पूरग्रस्त कुटुंबियांची दिवाळी चांगली जावी, त्यांना नवीन कपडे खरेदी करता यावे, यासाठी पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई देण्याचेही काम सुरु आहे.

Maharashtra Government
Solapur Rain : सीना नदीचं रौद्ररूप! पूरामुळे रेल्वे-रस्ते वाहतूक ठप्प, ९ ट्रेन रद्द, प्रवाशांचे हाल | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com