Solapur : दिलदार सोनू सूद सोलापुरात येणार, पूरस्तांना दिला मदतीचा हात | VIDEO

Sonu Sood Helps Flood Affected People In Solapur : सोनू सूद पुन्हा एकदा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत या संदर्भात माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक कुटूंबांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करत सोनू सूदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत या संदर्भात माहिती दिली आहे. त्याबद्दल तो म्हणाला, “सोलापूरमध्ये पूरस्थितीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आमची टीम प्रत्यक्ष माहिती घेत असून, गरजू कुटुंबांपर्यंत आम्ही खाण्याचे साहित्य व मेडिकल किट्स पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे.” तसेच, लवकरच सोलापूरमध्ये भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे आश्वासनही सोनू सूदने दिले आहे. कोरोना काळात तसेच विविध आपत्तीच्या वेळी लोकांना मदत करणारा अभिनेता म्हणून त्याची ओळख निर्माण झाली असून, पुन्हा एकदा पूरग्रस्तांसाठी तो धावून आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com