

रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सकारात्मक बातमी आहे. महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयांना दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारनं महत्त्वाचे निर्देश दिलेत.
खासगी रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवा आणि सुविधांचे दर मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये ठळकपणे दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आलंय. रुग्णांना उपचारांचा खर्च समजावा. शुल्काबाबत संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने शासन परिपत्रक जारी केलंय.
महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी नियमावली २०२१ मधील अनुसूची तीनमध्ये नमूद केलेल्या वैद्यकीय सेवा आणि सुविधांचे दर रुग्णालयात सहज दिसतील अशा ठिकाणी लावण्याचे निर्देश दिलेत. रुग्णालयाच्या दर्शनी भागात किंवा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना सहज पाहता येईल अशा ठिकाणी हे दरपत्रक प्रदर्शित करावे लागणार आहे.
त्यामुळे उपचारांसाठी दाखल होण्यापूर्वी रुग्णांना विविध सेवांच्या शुल्काची माहिती मिळण्यास मदत होईल. रुग्णालयातील नोंदणी कक्ष, चौकशी कक्ष आणि बिलिंग विभागाने रुग्णांना दरपत्रकासंबंधी माहिती देण्यासाठी सहकार्य करावे, असेही आदेशही सरकारनं दिलेत.
दरपत्रक मराठी आणि इंग्रजी भाषेत लावावे.
शासनाच्या निर्देशानुसार रुग्णालयांनी उपचारांचे दरपत्रक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करणे आवश्यक आहे. हे दरपत्रक रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा सहज दिसेल अशा प्रमुख ठिकाणी लावावे.
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना दरपत्रक सहज वाचता येईल आणि त्यातील माहिती समजेल, याची काळजी घेण्याचे निर्देश
बिलासंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी माहिती द्यावी.
रुग्णालयांनी बिलासंबंधी तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी.
नोंदणी कक्ष, चौकशी कक्ष आणि बिलिंग काउंटरवर संबंधित माहिती उपलब्ध असावी. रुग्णांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी तसेच आवश्यक मार्गदर्शन मिळविण्यासाठी योग्य व्यवस्था असणे अपेक्षित
आंतरराष्ट्रीय रुग्णांसाठी विशेष पॅकेज दर
वैद्यकीय व्हिसा किंवा आयुष व्हिसावर भारतात उपचारासाठी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय रुग्णांसाठी लागू असलेले विशेष पॅकेज दरही स्पष्टपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश.
रुग्णालयांच्या नोंदणी, नियमन आणि देखरेखीची जबाबदारी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी या नियमांच्या अंमलबजावणीचा वेळोवेळी आढावा घ्यावा.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुद्ध आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी.
सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महानगरपालिकांचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील खासगी रुग्णालये व इतर वैद्यकीय आस्थापनांना या निर्देशांची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन करावे, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.