Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला मिळणार भरपगारी सुट्टी, कोणकोणत्या जिल्हा अन् शहरातील कामगारांना होणार फायदा?

ZP Election Voting 7 February: राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला मिळणार भरपगारी सुट्टी, कोणकोणत्या जिल्हा अन् शहरातील कामगारांना होणार फायदा?
Maharashtra voting Saam tv
Published On

Summary -

  • ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी भरपगारी सुट्टी जाहीर

  • उद्योग, कारखाने, दुकाने, IT कंपन्यांना आदेश लागू

  • पूर्ण सुट्टी शक्य नसल्यास २ ते ३ तासांची विशेष सवलत

  • १२ जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांतील कामगारांना मिळणार सुट्टी

राज्यातील नोकरदारवर्गासाठी महत्वाची बातमी आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी येत्या ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्य सरकारने भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ७ फेब्रुवारीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

उद्योग, आस्थापना आणि कारखान्यांमधील कामगार आणि कर्मचाऱ्यांना ७ फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे, असे परिपत्रक उद्योग, उर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने जारी केले आहे. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात आली आहे.

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला मिळणार भरपगारी सुट्टी, कोणकोणत्या जिल्हा अन् शहरातील कामगारांना होणार फायदा?
Zilla Parishad Election: राज्यात भाजपचा धमाका! ZP निवडणुकीआधीच उडवला विजयाचा बार, कोकणात १० जण बिनविरोध, विरोधकांना मोठा धक्का

७ फेब्रुवारीला सुट्टी उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू असेल. यामध्ये खासगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने आणि इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, माल्स, रिटेलर्स या सर्वांना सरकारचे हे आदेश लागू राहणार आहेत. याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना सुट्टी द्यावी लागेल किंवा त्यांना सवत द्यावी लागेल.

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला मिळणार भरपगारी सुट्टी, कोणकोणत्या जिल्हा अन् शहरातील कामगारांना होणार फायदा?
ZP Election: झेडपी निवडणूक ठरलेल्या वेळेतच होणार, आयोगाकडून महत्त्वाची माहिती

महत्वाचे म्हणजे, अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांना जर पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापन मालकांनी घेणे आवश्यक राहिल असे या परिपत्रकात सांगण्यात आले आहे.

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला मिळणार भरपगारी सुट्टी, कोणकोणत्या जिल्हा अन् शहरातील कामगारांना होणार फायदा?
ZP Election: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, पुण्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार थांबवला

राज्यातील या जिल्ह्यांमध्ये असणार सार्वजनिक सुट्टी -

रायगड -

पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, उरण, अलिबाग, मुरुड. रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर

रत्नागिरी -

मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर); सिंधुदुर्ग (वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी दोडामार्ग

पुणे -

जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड, मावळ, मुळशी, हवेली, दौंड, पुरंदर, वेल्हे, भोर, बारामती, इंदापूर)

सातारा -

खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, जावळी, सातारा, पाटण, कराड

सांगली -

आटपाडी, जत, खानापूर (विटा), कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा-ईश्वरपूर, शिराळा, मिरज

सोलापूर -

करमाळा, माढा, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट

कोल्हापूर -

शाहुवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज, चंदगड

छत्रपती संभाजीनगर -

सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण

परभणी -

जिंतूर, परभणी, मानवत, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, पालम, गंगाखेड)

धाराशीव -

परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशीव, तुळजापूर, लोहारा, उमरगा

लातूर -

अहमदपूर, जळकोट, उदगीर, चाकूर, रेणापूर, लातूर, शिरूर (अनंतपाळ), देवणी, औसा, निलंगा

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला मिळणार भरपगारी सुट्टी, कोणकोणत्या जिल्हा अन् शहरातील कामगारांना होणार फायदा?
ZP Election: निवडणूक अन् CTET परीक्षा एकाच दिवशी; इलेक्शन ड्युटी करुन परीक्षा कशी द्यायची? शिक्षकांच्या मनात संभ्रम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com