Maharashtra : चारा बियाण्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय, ही अट रद्द; जाणून घ्या कुणाला होणार फायदा?

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल केल्या आहेत. वैयक्तिक लाभार्थ्यांना ४ हजार रुपये, तर शेतकरी गटांना २० हजार रुपयांपर्यंतच्या चारा बियाण्यांचा १०० टक्के अनुदानावर लाभ मिळू शकतो.
Maharashtra Government
Maharashtra Government saam tv
Published On: 

Maharashtra Government Changes Fodder : दुष्काळ आणि पाण्याच्या तीव्र टंचाईने होरपळणाऱ्या राज्यातील पशुपालकांसाठी अखेर एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. कमी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आणि त्यांच्या पशुधनासाठी राज्य सरकारने चारा बियाणे वाटपाच्या नियमांमध्ये मोठी सवलत जाहीर केली आहे.

दुष्काळी परिस्थिती जाहीर झालेल्या २६५ तालुक्यांतील पशुपालकांना दिलासा देण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’च्या अटी शिथिल केल्या आहेत. चारा टंचाईवर मात करण्यासाठी या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थी तसेच शेतकरी गटांना अतिरिक्त चारा बियाणे व ठोंबे वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही विशेष सवलत सन २०२६-२७ या एकाच वर्षासाठी लागू असणार आहे.

योजनेच्या ९ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, वैयक्तिक लाभार्थ्याकडे स्वतःचे किमान तीन ते चार पशुधन असणे आवश्यक होते. मात्र, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन ही किमान पशुधनाची अट चालू वर्षासाठी शिथिल करण्यात आली आहे.

Maharashtra Government
Water Cut : नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पाणी कपातीचा निर्णय नाईकांनी फेटाळला; आयुक्तांवर थेट ताशेरे

वैयक्तिक लाभार्थ्यांना चार हजार रुपयांचे चारा बियाणे

योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना एक हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत १०० टक्के अनुदानावर चार हजार रुपये किमतीचे चारा बियाणे देण्यात येते. संबंधित लाभार्थ्याकडे चारा उत्पादनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यास आणि प्रथमच लाभ मागणाऱ्या नवीन अर्जदारांची मागणी प्रलंबित नसल्यास, एकापेक्षा अधिक वेळा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

शेतकरी गटांना २० हजार रुपयांपर्यंत लाभ

शेतकरी समूह किंवा गटांना पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत १०० टक्के अनुदानावर २० हजार रुपये किमतीचे चारा बियाणे देण्यात येते. चारा उत्पादनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असलेल्या गटांना, प्रथमच लाभ मागणाऱ्या अर्जदारांची मागणी पूर्ण झाल्यानंतर, उपलब्धतेनुसार एकापेक्षा अधिक वेळा बियाणे वाटप करता येणार आहे.

Maharashtra Government
EVM सोडा, बॅलेट पेपरवरही भाजपचा एकतर्फी विजय; विरोधकांची अवस्था पाहून बसेल धक्का, पाहा निकाल

सर्वसाधारणपणे ही योजना वर्षातून एकदाच राबविण्यात येते. मात्र, सध्याची दुष्काळी परिस्थिती विचारात घेऊन चारा उत्पादनासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध असल्याची खातरजमा केल्यानंतर अतिरिक्त लाभ देण्याची सवलत देण्यात आली आहे. यासाठी संबंधित उपायुक्त पशुसंवर्धन यांनी पाणीसाठा उपलब्ध असल्याचे प्रमाणित करणे आवश्यक आहे. तसेच, प्रथमच लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांची मागणी प्रलंबित नसल्याची खात्री करण्याचे निर्देश जिल्हा व विभागीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. योजनेबाबत अधिक माहितीसाठी पशुपालकांनी १९६२ या कॉल सेंटर क्रमांकावर किंवा ९०६३१४२२९९ या व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com