राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीची; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची मान्यता होणार रद्द

Marathi Language Now Mandatory in All School : सरकारने मोठा निर्णय घेत सर्व शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10 पर्यंत मराठी भाषा सक्तीची केली आहे. नियम मोडणाऱ्या शाळांवर दंड आणि मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.
Marathi Language Now Mandatory in All School
State government makes Marathi language compulsory in all schools from Class 1 to 10saam tv
Published On
Summary

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची

इयत्ता १ ते १० पर्यंत मराठी शिकवणे अनिवार्य

नियम मोडणाऱ्या शाळांवर दंडाची तरतूद

मराठी भाषेबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यम आणि मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली जाणार आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययनाची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई देखील केले जाणार आहे.

नियम मोडणाऱ्या शाळांवर १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. तर वारंवार आदेश धुडकावणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याची तरतूद नवीन शासन निर्णयात करण्यात आली आहे.

Marathi Language Now Mandatory in All School
ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

अनेक खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये अद्यापही मराठी विषय शिकविला जात नाही, ही बाब निदर्शनास आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान मराठी सक्तीच्या अंमलबजावणीसाठी विभागीय शिक्षण उपसंचालकांना 'सक्षम प्राधिकारी' म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Marathi Language Now Mandatory in All School
ZP आणि खासगी शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येकाला मिळणार कॅशलेस वैद्यकीय सुविधा

महाराष्ट्र भाषेचे अध्यापन व अध्ययन अधिनियम, २०२० नुसार राज्यात १ एप्रिल २०२० पासून मराठी सक्तीची करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार सर्व शाळांनी मराठी विषय शिकवण्यासाठी केवळ मराठी विषयातील विहित शैक्षणिक अर्हता प्राप्त शिक्षकांची नियुक्ती करणे अनिवार्य आहे. शाळा सुरू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत शिक्षण उपसंचालक किंवा शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाकडून शाळांची तपासणी केली जाईल.

या पथकात अनुभवी मराठी शिक्षकांचा समावेश असणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना नोटीस बजावण्यात येईल. नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत शाळेला आपला खुलासा सादर करावा लागेल. विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शाळेचा खुलासा समाधानकारक नसल्याचे आढळले तर अधिनियमातील कलम १२(१) नुसार संबंधित शाळेला १ लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल.

दंडाची रक्कम भरल्यानंतरही किंवा शिक्षण संचालकांच्या आदेशानंतरही संबंधित शाळेने मराठी विषयाचे अध्यापन सुरू केले नसेल तर अशा शाळांचा सविस्तर अहवाल शिक्षण आयुक्तांकडे पाठवला जाईल. शिक्षण आयुक्त या प्रकरणाची सुनावणी घेऊन संबंधित शाळेची मान्यता पुढील शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्याचे आदेश काढले जाऊ शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com