Maharashtra Government: अर्ज मिळाल्यानंतर 30 दिवसात मोजणी होणार, राज्य सरकारचा आणखी एक धडाडीचा निर्णय

Private Land Surveyors: जमीन मोजणी जलद करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने खाजगी जमीन सर्व्हेक्षकांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. नागरिकांना आता अर्ज केल्यानंतर ३० दिवसांच्या आत जमीन मोजणी प्रमाणपत्रे मिळतील, अशी घोषणा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
Private Land Surveyors
Maharashtra government announces new land measurement policy — citizens to get certificates within 30 days through private surveyors.saam tv
Published On
Summary
  • महाराष्ट्र सरकारनं जमिनीच्या मोजणीसंदर्भात मोठा निर्णय.

  • खासगी भूमापक नेमले जाणार, ३० दिवसात प्रमाणपत्र दिले जाणार

  • चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली निर्णयाची माहिती.

राज्य सरकारनं जमिनीच्या मोजणीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. राज्यात खासगी भूमापक येणार असून खासगी भूमापक आणल्यामुळे अर्ज मिळाल्यानंतर 30 दिवसात मोजणीचं प्रमाणपत्र मिळेल. खासगी भूमापक यांना शासनाच्या रोवर दिला जाईल. त्यानंतर सिटी सर्वेयर रोवर मॅच करुन प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी माहिती दिलीय. जमाबंदी आयुक्तांची मोठी मागणी होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय.

Private Land Surveyors
Gram Panchayat Fund: किती निधी आला? कुठे खर्च केला? ग्रामपंचायतीचा कारभार नागरिकांना थेट मोबाईलवर पाहता येणार

राज्यात मोठ्या प्रमाणावर खरेदी खत होतात, पोट हिस्से होतात. गुंठेवारी कायद्यानं घरं कायदेशीर होतात. फ्लॅट बनत आहेत, मोठं मोठे लेआऊट पडत आहेत. रोज लाखो अर्ज मोजणीसाठी येत आहेत. साडेतीन कोटी लोकांच्या मोजणी आमच्याकडे करायच्या आहेत.

दररोज २५ ते ३०हजार अर्ज मोजणीचे येतात. साधारण मागणी काय आहे, खरेदीखत करताना मोजणी करुन खरेदी खत केले तर खरेदी खतात आणि मोजणीत फरक राहणार नाही. आता खरेदीखत आणि फेरफार होतोय, खरेदी खतात एरिया चुकला तर कायमस्वरुपी चुकतो, असतो चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राज्य सरकारनं खासगी भूमापक आणण्याची अधिसूचना जाहीर केली आहे.

Private Land Surveyors
Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील दुकाने राहणार 24 तास खुली, कोणती दुकाने असतील बंद

या राज्यामध्ये खासगी परवानाधारक भूमापक येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून राज्याची मोजणी चालू होईल. सीटी सर्वे ऑफिसर, डेप्युटी एसएलआर आहेत ते त्याला सर्टिफाईड करतील, अशी माहितीहीबावनकुळेंनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कायद्यात दुरुस्ती करत नियमावली करून इतर राज्यामध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेश जे केलंय.

Private Land Surveyors
'प्रधानमंत्री धन–धान्य कृषी' योजना; ९ जिल्ह्यांचा होणार कायापालट, कृषी उत्पादन वाढीसह शेतकऱ्यांना मिळेल कर्जाची सुविधा

त्या पद्धतीनं आमच्याकडे जमाबंदी आयुक्ताकडे प्रत्येक जिल्ह्यात परवानाधारक खासगी भूमापक आणायची. मोठ्या प्रमाणावर त्याची अंमलबाजावणी करायची. मोठ्या प्रमाणावर क्वालिफिकेशन फिक्स करायचं, या मोजण्या तीस दिवसाच्या आत पूर्ण झाल्या पाहिजेत. मोजणीनंतर खरेदीखत आणि तसेच फेरफार केले पाहिजेत. जेणेकरुन कुणाच्याही फ्लॅटची रजिस्ट्री अधिकृत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com