Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील दुकाने राहणार 24 तास खुली, कोणती दुकाने असतील बंद

Maharashtra Government : एका ऐतिहासिक निर्णयात, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स आणि आस्थापनांना २४ तास खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे. व्यवसाय आणि ग्राहकांसाठी एक मोठी सुधारणा.
Maharashtra Government approves 24x7 operation of shops, hotels, and establishments across the state.
Maharashtra Government approves 24x7 operation of shops, hotels, and establishments across the state.
Published On
Summary
  1. महाराष्ट्र सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला.

  2. राज्यातील सर्व दुकानं, हॉटेल्स आणि स्थापनं २४ तास उघडी ठेवता येणार.

  3. व्यवसाय, अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला मिळणार चालना.

महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतलाय. राज्यातील सर्व दुकाने आता २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. राज्यातील सर्व दुकानं, हॉटेल्स आणि इतर अस्थापना २४ तास उघडी ठेवता येणार आहेत. मात्र काही दुकानांसाठी हा नियम लागू नसेल.

कोणते दुकाने राहतील बंद

मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार हे २४ तास सुरू राहणार नाहीत. तर इतर सर्व आस्थापना ,खाद्यगृहं, आणि दुकाने आता 24 तास सुरू राहतील. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम २०१७ हा अधिनियम सर्व दुकाने, निवासी हॉटेल, उपाहारगृहे, खाद्यगृहे, थिएटर्स, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा येतील नोकरीला राहणारे. कर्मचाऱ्यांच्या इतर सेवांतील नियमन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा बाबींकरीता तरतूद करण्यासाठी महाराष्ट्रात हा नियम लागू करण्यात आला आहे.

महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकर्‍यांचे व सेवासंबंधी नियमन) अधिनियम, २०१७ च्या कलम २१(२) मध्ये “दिवस” अशी व्याख्या, मध्यरात्रीपासून सुरू होणारा २४ तासांचा कालावधी, अशी नमूद करण्यात आलीय. अधिनियमाच्या कलम १६ (१) (ख) मध्ये आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुल्या ठेवता येणार आहेत. मात्र तरीही प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून २४ तास सलग विश्रांती मिळेल, साप्ताहिक सुट्टी देण्यात येईल, अशी तरतूद कायद्यात करण्यात आलीय.

महाराष्ट्र सरकार दुकाने आणि आस्थापना (नोकर्‍यांचे व सेवासंबंधी नियमन) अधिनियम, २०१७ मधील कलम ११ अन्तर्गत एखाद्या क्षेत्रासाठी किंवा निरनिराळ्या क्षेत्रांसाठी आणि निरनिराळ्या कालावधीसाठी, निरनिराळ्या प्रकारच्या आस्थापनांच्या वर्गांच्या परिसरात व्यापारी संकुल किंवा मॉल यांच्यासाठी सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्याचे अधिकार राज्य शासनास प्रदान करण्यात आलेले आहेत.

या अधिनियमान्वये शासनाने २०१७ रोजी काढलेल्या अधिसूचनाद्वारे राज्यातील विविध क्षेत्रांतील परमिट रूम, बार, डान्सबार, हुक्का बार, डिस्कोथेक आणि अशा प्रकारच्या सर्व आस्थापना जेथे कोणत्याही प्रकारचे मद्यविक्री केली जाते. तसेच वाईन आणि बीअर अशा प्रकारचे मद्यविक्री करणारी दुकाने, थिएटर्स आणि सिनेमागृह अथवा चित्रपटगृह या आस्थापनांसाठी सुरू व बंद करण्याचे वेळापत्रक निर्धारित करण्यात आली आहेत.

शासनाने १९/१२/२०१७ रोजीच्या अधिसूचनेतून थिएटर्स अथवा सिनेमा गृह अथवा चित्रपटगृह यांना वगळण्याचा निर्णय नव्या ३१/०१/२०२० रोजी काढलेल्या नव्या अधिसूचनेत घेण्यात आला. त्यामध्ये राज्य शासनाने तरतुदीनुसार केवळ परमिट रूम, बिअरबार, डान्सबार, हुक्का बार, डिस्कोथेक अशा सर्व जेथे कोणत्याही प्रकारचे मद्य विक्री केली जाते ते सुरू व बंद करण्याच्या वेळा निश्चित झाल्या आहेत.

स्थानिक प्रशासनाकडून अथवा पोलीस विभागाकडून मद्य विक्री किंवा मद्य पुरविणाऱ्या आस्थापना सलग २४ तास सुरू ठेवण्याच्या बाबतची विविध निवेदनं शासनस्तरावर प्राप्त होत आहेत. तसेच या संदर्भात विविध लोकप्रतिनिधींचे देखील अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. काही तक्रारींची दखल घेऊन उक्त अधिनियमानुसार काटेकोर अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या.

कलम २ (२) मध्ये “दिवस” याचा अर्थ, मध्यरात्रीपासून सुरू होणारा २४ तासांचा कालावधी, असा आहे, अशी व्याख्या आहे. म्हणूनच उपरोक्त कलम १६ (१) मध्ये तरतूद असली तरीही ही मद्य पुरवठा/मद्य विक्री करणाऱ्या आस्थापना “म्हणून” इतर आस्थापनांप्रमाणे २४ तास सुरू ठेवता येतील.

Maharashtra Government approves 24x7 operation of shops, hotels, and establishments across the state.
EPFO News : PF खातेधारकांसाठी खुशखबर! एटीएममधून मिनिटांत काढता येणार पैसे, 'या' तारखेपासून सुरु होणार सेवा, जाणून घ्या

शासनाने २०१७ रोजीच्या अधिसूचनेन्वये राज्यातील विविध क्षेत्रांतील मद्यविक्री आणि मद्य पुरविणाऱ्या आस्थापनांच्या सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित केल्या होत्या. अशा आस्थापना २४ तास सुरू राहणार नाहीत. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना सदरहू निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com