जालन्यात FDA ची मोठी कारवाई, मन:प्रभावी औषधांचा बेकायदेशीर साठा जप्त

Maharashtra FDA Action: अन्न आणि औषध प्रशासन आणि एटीएस यांनी जालन्यात संयुक्त धाड टाकून दोन ठिकाणांवरून १,०८० बेकायदेशीर 'अल्प्राझोलम' (अँझिलम ०.५) गोळ्या जप्त केल्या. या बेकायदेशीर सायकोट्रॉपिक (मानसिक स्थितीवर परिणाम करणाऱ्या) औषधांच्या साठ्याबाबत तपास सुरू आहे.
Maharashtra FDA Action
FDA AND ATS SEIZE ILLEGAL PSYCHOTROPIC DRUG STOCK IN JALNA; 1,080 ALPRAZOLAM TABLETS RECOVEREDsaam tv
Published On

संजय गडदे,साम प्रतिनिधी

अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि दहशतवाद विरोधी पथक (ATS), जालना यांच्या संयुक्त कारवाईत Anzilum 0.5 (Alprazolam Tablets IP 0.5 mg) या मन:प्रभावी औषधांचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत दोन ठिकाणांहून एकूण 1,080 गोळ्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे 4,333 किंमत आहे.

Maharashtra FDA Action
आयुक्त तुकाराम मुंढेंची नागपूरनंतर धुळ्यातही मोठी कारवाई; २३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

गोपनीय माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी रेख अफसर रेख अन्वर (रा. दुर्गा नगर, जालना) याच्याकडे छापा टाकला. त्याच्याकडून 16 स्ट्रिप्समधील 240 गोळ्या जप्त करण्यात आल्या. चौकशीत वैध डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होत असल्याचे समोर आले. त्यानंतर आरोपीने औषधे मे. वसंत मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, काद्राबाद रोड, जालना येथून घेतल्याची माहिती दिली. या दुकानावर टाकलेल्या छाप्यात 76 स्ट्रिप्समधील 840 गोळ्या जप्त करण्यात आल्या. औषध खरेदीची वैध बिले उपलब्ध नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

Maharashtra FDA Action
आयुक्त तुकाराम मुंढेंची नागपूरनंतर धुळ्यातही मोठी कारवाई; २३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

प्राथमिक चौकशीत गंभीर अनियमितता आढळल्याने संबंधित मेडिकल स्टोअर्सला पुढील आदेशापर्यंत औषध खरेदी-विक्रीचा व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणी आरोपी रेख अफसर रेख अन्वर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 278 तसेच NDPS Act, 1985 मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, 1940 मधील संबंधित कलमांनुसारही पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय मन:प्रभावी औषधांची विक्री, साठवणूक किंवा अनधिकृत वितरण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com