Farmer Yojana : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आरोग्य सवलत योजना, डॉक्टर दाम्पत्याचा कौतुकास्पद प्रयत्न

Buldhana Drought Farmer Yojana : बुलढाण्यातील संग्रामपूर येथे डॉ. योगेश सपकाळ आणि डॉ. वर्षा सपकाळ यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांसाठी आरोग्य सवलत योजना सुरू केली आहे.
Maharashtra farmer scheme news
Maharashtra farmer scheme news AI Image
Published On: 
Summary
  • बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे दुष्काळग्रस्तांसाठी आरोग्य सवलत योजना

  • डॉ. योगेश सपकाळ आणि डॉ. वर्षा सपकाळ यांनी हा उपक्रम सुरू केला

  • शेतकरी आणि शेतमजुरांना तपासणी, डॉक्टरांचा सल्ला व आवश्यक उपचारांमध्ये सवलत देण्याचा प्रयत्न

राज्यातील अनेक भागात यंदा पाऊस कमी पडला. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना दैनंदिन गरजा भागवणंही कठीण झालंय. अशा परिस्थितीत कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आजारपण आलं, तर उपचारांचा खर्च करायचा कसा, असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहतो. याच परिस्थितीची जाणीव ठेवत बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील डॉक्टर दाम्पत्याने कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे.

डॉ. योगेश सपकाळ आणि डॉ. वर्षा सपकाळ यांनी आपल्या खासगी रुग्णालयात दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांसाठी ‘दुष्काळग्रस्त आरोग्य सवलत योजना’ सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक अडचणीत असलेल्या गरजू रुग्णांना नियमित उपचारांच्या तुलनेत सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Maharashtra farmer scheme news
New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक कुटुंबांचा आर्थिक गाडा आधीच अडचणीत असताना, आजारपणाचा अतिरिक्त खर्च त्यांच्यासाठी मोठं आव्हान ठरतो. हीच बाब लक्षात घेऊन तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक उपचारांमध्ये सवलत देण्याचा प्रयत्न या योजनेतून केला जात आहे. संग्रामपूर हा आदिवासी तालुका असून परिसरातील अनेक शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळे या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. उपचारांचा खर्च काही प्रमाणात कमी झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या कुटुंबांना आरोग्यसेवा घेणं सुलभ होत आहे.

Maharashtra farmer scheme news
Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

दुष्काळ हा केवळ शेतीपुरता मर्यादित प्रश्न नाही, तर त्याचा थेट परिणाम कुटुंबाच्या आरोग्यावर आणि आर्थिक परिस्थितीवरही होतो. अशा कठीण काळात वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी करून गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न डॉ. सपकाळ दाम्पत्याने केला आहे. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना आरोग्यसेवेतून दिलासा देणारा हा उपक्रम सध्या संग्रामपूर परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com