Exit poll: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? सट्टा बाजाराचे वारे कोणाच्या बाजूने?

Maharashtra Exit poll Satta Bajar : २३ तारखेला महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार, हे स्पष्ट होणार आहे. त्याआधी सट्टा बाजाराचा अंदाज समोर आलाय.
Exit Poll
Maharashtra exit Poll Saam tv
Published On

मुंबई: (Exit poll Satta Bajar 2024)  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान प्रक्रिया संपली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रआतल्या स्ट्राँगरूममध्ये असलेल्या पेट्यांमध्ये उमेदवारांचे भविष्य बंद आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आता निवडणूकीमध्ये लागलेले आहे. 288 जागांच्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत कोणाला मिळणार हे 23 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार असले तरी निकालापूर्वी सट्टाबाजारात मोठी उलाढाल सुरू आहे.

काय आहे सट्टा बाजाराचा कौल?

एक्झिट पोल व्यतिरिक्त, सट्टेबाजीचा बाजार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरही सट्टा लावत आहे. देशात सर्वाधीक सट्टा ज्या ठिकाणी चालतो त्या फलोदी बेटिंग मार्केटचे आकडे समोर आले आहेत. या आकडेवारीवर नजर टाकल्यास भारतीय जनता पक्ष (भाजप) महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. सट्टा बाजाराच्या आकडेवारीनुसार राज्यात एकट्या भाजपला 90 ते 95 जागा मिळू शकतात. 

शिवसेनेच्या शिंदे गटाला जवळपास 40 जागा मिळू शकतात

भाजपनंतर त्यांचा मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) या पक्षाला 36 ते 40 जागा मिळू शकतात. महायुतीमध्ये समाविष्ट असलेला तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) 12 ते 16 जागा जिंकू शकतो. फलोदी सट्टा बाजारच्या मते, महाराष्ट्रात महायुती आघाडी 142-151 जागा जिंकून सरकार बनवणार आहे. म्हणजेच फलोदी सट्टा बाजारात महायुतीचा बोलबाला आहे. 

बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन सट्टा बाजारची आकडेवारी काय सांगते?

फलोदी सट्टा बाजार व्यतिरिक्त, बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन सट्टा बाजार यांनी देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर काही अंदाज वर्तवले आहेत. त्यातही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला बहुमत मिळण्याची अपेक्षा आहे. सट्टा बाजाराच्या मते एकूणच महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागांचा फार कमी फरक पडणार असल्याचेही या दोन्ही सट्टेबाजांमधून बोलले जात आहे. याशिवाय अपक्ष आणि छोटे पक्षही राज्यात आपली उपस्थिती नोंदवणार आहेत.

या निवडणूकीत महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. महाराष्ट्राचे राजकारण पाहिल्यास अंतिम टप्यात नेमकं काय घडेल याची कल्पना कोणालाच नसते. त्यामुळे संपूर्ण देशाचे डोळे महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेकडे लागलेले असते. सध्या प्रत्त्येक पक्ष आपआपल्या उमेदवारांना जपण्याकडे विशेष लक्ष देत आहे. 23 नोव्हेंबरला संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. 

Edited by- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com