Election commission : निवडणुकीची घोषणा, याद्यांचा घोळ कायम; पत्रकारांच्या प्रश्नांवर आयोगाची भंबेरी, VIDEO

Maharashtra Election commission : मतदार याद्यांमधला घोळ कायम असताना राज्य निवडणुकीचं आयोगानं पालिका निवडणुकीची घोषणा केलीय...दुबार मतदारांना आळा घालण्यासाठी आयोगानं काय तोडगा काढलाय? राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना आयोगाची कशी भंबेरी उडाली? पाहूयात हा विशेष रिपोर्ट
 Election commission
Maharashtra Election commissionSaam tv
Published On

राज्य निवडणुक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन 246 नगपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकीची घोषणा केली...विरोधकांनी रान पेटवलेल्या दुबार मतदाराच्या मुद्यावर आयोगाकडे कोणतंही ठोस उत्तर नसल्याचं उघड झालंय. दुबार मतदार रोखण्यासाठीचा आयोगानं दोन स्टारचा फॉर्म्युला वापरणार असल्याचं सांगितलंय. नेमका हा 2 स्टारचा फॉर्म्युला काय आहे ते पाहूयात....

दुबार मतदारावर डबल स्टारचा तोडगा

संबंधित मतदार कुठे मतदान करतो याची अधिकारी माहिती घेणार

मतदाराचे नाव, लिंग, फोटो, पत्ता सर्व बाबी तपासल्या जाणार

दोन ठिकाणी नाव असल्यास मतदाराच्या इच्छेनुसारच एकाच ठिकाणी मतदान करता येणार

मतदान केंद्रावर इतर कुठेही मतदानं न केल्याचं प्रतिज्ञापत्र घेतले जाणार

 Election commission
Mumbai Crime : बनावट पोलीस अधिकाऱ्याचा कारनामा; अख्खी हॉटेल इंडस्ट्री हादरली होती, असा अडकला जाळ्यात

मात्र शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला हा राज ठाकरेंचा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर निवडणूक आयोगाची चांगली भंबेरी उडाली.

गेल्या काही दिवसांपासून विरोधक दुबार आणि बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेत...याद्या स्वच्छ होईपर्यंत निवडणूक जाहीर न करण्याची मागणी करण्यासाठी विरोधकांनी सत्याचा मोर्चाही काढला...इतकचं काय तर विरोधकांनी केंद्रीय निवडणुक आयुक्तांची थेट घेतली...मात्र तरीही आयोगानं निवडणूक जाहीर केल्यामुळे विरोधकांनी संताप व्यक्त केलाय.

 Election commission
Pune Kukri Gang : पुण्यात कोयत्यानंतर 'कुकरी' गँगची एन्ट्री, दिवसाढवळ्या तरुणाची हत्या; धक्कादायक कारण समोर

दुबार मतदारांना रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने समोर आणलेला डबल स्टारचा तोडगा विरोधकांनी धुडकावून लावलाय...दुबार मतदार असल्याचं आयोगाला मान्य असल्यामुळेच त्यांनी दोन स्टारचा तोडगा काढलाय. त्यामुळे मतदार याद्या स्वच्छ करूनच निवडणुका का घेतल्या नाहीत? या दोन स्टारच्या तोडग्यामुळे दुबार मतदारांना रोखता येणार का? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com