खासगी शाळेतील शिक्षकांसाठी 'टीईटी' अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Maharashtra Education Department : महाराष्ट्र शिक्षण विभागाने खाजगी विनाअनुदानित आणि स्वयं-अर्थसहाय्यित शाळांमधील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. शिक्षण क्षेत्रात मोठी साफसफाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra Education Department
BIG DECISION! TET MADE MANDATORY FOR PRIVATE SCHOOL TEACHERS IN MAHARASHTRA
Published On
Summary
  • खासगी शाळांतील शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य.

  • शिक्षण विभागाचा मोठा निर्णय शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय.

  • बोगस आणि अपात्र शिक्षकांवर नियंत्रण येणार.

आतापर्यंत केवळ शासकीय शाळांच्या शिक्षकांना 'टीईटी' म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात येत होती. परंतु आता खासगी विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील शिक्षकांसाठी टीईटी द्यावी लागणार आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे बोगस किंवा अपात्र शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. खासगी शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Education Department
खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर भरती प्रक्रियाही होणार ऑनलाईन, संस्थापकांची मनमानीला लगाम

शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. परंतु अनेक खासगी शाळा या नियमांना धाब्यावर बसवत अपात्र शिक्षकांची भरती केले, अशा तक्रारी आल्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने खासगी शाळांनाही या नियमातून पळवाट काढता येणार नाही अशी उपाययोजना केली आहे.

Maharashtra Education Department
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीची; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची मान्यता होणार रद्द

त्यानुसार शाळा मूल्यांकन आणि गुणवत्ता आश्वासन आराखड्यांतर्गत आता प्रत्येक शाळेला आपली सविस्तर माहिती ऑनलाइन भरणे बंधनकारक आहे. यात शिक्षकांच्या पात्रतेचा एक विशेष रकाना देण्यात आलाय. शाळांनी भरलेली ही माहिती केवळ कागदावर राहणार नाही, तर एका त्रयस्थ संस्थेमार्फत या माहितीची 'क्रॉस व्हेरिफिकेशन' केलं जाणार आहे.

यामुळे ज्या शाळांनी कागदोपत्री घोळ केला असेल तर त्यांचे बिंग फुटणार आहे. किती अपात्र शिक्षक सेवेत आहेत ही माहिती समोर येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने टीईटी अनिवार्य असल्याचा निकाल दिल्यानंतर या परीक्षेला बसणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये ही संख्या पावणेपाच लाख होती, तर आगामी जून २०२६ च्या परीक्षेसाठी तब्बल ६ लाख शिक्षकांनी अर्ज केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com