तुम्हाला वाटेल की ही कुठली तरी कॉन्फरन्स सुरू असूनव यात आंतरराष्ट्रीय विषयावर मंत्री-खासदार आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे...मात्र ही आहे नांदेडमधील दुष्काळाची आढावा बैठक...दुष्काळावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत मंत्र्यांसह अधिकाऱ्यांसमोर टेबलावर चक्क काजू- बदाम ठेवण्यात आले...एकीकडे मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात यंदा पावसानं दडी मारल्यानं भीषण दुष्काळाचं संकट आहे.. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना दुसरीकडे मंत्र्यांसह अधिकारी वातानुकूलित सभागृहात बसून काजू- बदाम खात दुष्काळावर गप्पा हाणताना दिसतायत....
दुष्काळाच्या या आढावा बैठकीत.....
दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री
मेघना बोर्डीकर, पाणीपुरवठा राज्यमंत्री
नागेश पाटील आष्टीकर, खासदार, शिंदेसेना
संजय जाधव, खासदार, शिंदेसेना
रवींद्र चव्हाण, खासदार, कॉंग्रेस
बाबुराव कोहळीकर, आमदार, शिंदेसेना
हेमंत पाटील, आमदार, शिंदेसेना
राजेश पवार,आमदार, भाजप
राजू नवघरे, आमदार, राष्ट्रवादी (AP)
यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत काजू-बदामचा लाभ घेतलाय...
मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनीही या शाही मेजवानीचा आस्वाद घेतला...त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केलीय.
नेते आणि अधिकाऱी तुपाशी असताना दुष्काळामुळे उपाशी असलेल्या शेतकऱ्यांनी काय भावना व्यक्त केल्या आहेत त्या पाहा....
कृषीमंत्री दत्ता भरणेंनी तर काजू-बदाम तर आमच्या समोर आलेच नाहीत, ज्यांनी खाल्ले ते शुगर पेशंट असतील,असं म्हणत सारवासारव केलीय...तर बैठकीला उपस्थित असणाऱ्या खासदार संजय जाधवांनी दुष्काळ आहे म्हणून काजू- बदाम खायचे नाहीत का? अशी निर्लज्जपणे संतापजनक प्रतिक्रिया दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.