महाराष्ट्रात दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या आणि डोक्यावर वाढणारा कर्जाचा डोंगर यामुळे बळीराजा पुन्हा एकदा नैराश्याच्या गर्तेत लोटला गेलाय.... राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र थांबलेलं नाही. गेल्या २४ तासांत राज्यात 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.. काळीज पिळवटून टाकणारा हा आक्रोश आहे... लातूरमधील 33 वर्षीय शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा...दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण पोरानं आत्महत्या केल्यानं आई-वडीलांचा आधार कायमचा हरवून गेलाय...
दुसरीकडे हिंगोलीतही कोरड्या दुष्काळामुळे विठ्ठल वाढवे या शेतकऱ्यानं शेताच्या बांधावर गळफास घेत आत्महत्या केल्य़ानंतर त्याच्या बायकोनं शेताच्या बांधावरच अक्षरशा टाहो फोडलाय...
गेल्या 20 दिवसांत हिंगोली जिल्ह्यात झालेल्या या सहाव्या आत्महत्येमुळे ग्रामस्थही आक्रमक झालेत... सोलापूरच्या बार्शी तालुक्यात तर एका 55 वर्षीय शेतकऱ्यानं शेतात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली...वाढते कर्ज आणि नापीकतेमुळे गेले काही दिवस हा शेतकरी चिंतेत होता...यामुळे मात्र एका तरूण मुलाचा आधार हरपलाय.
यवतमाळ जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबत नाहीय.... तरुण अल्पभूधारक शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्यानं संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करतयं...खरीप हंगामात पावसानं दडी मारल्यानं कपाशीचं उत्पादन होणार नाही आणि शेतीतून काहीच उत्पन मिळणार नाही... या विवंचनेतून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. आधीच कर्जबाजारी त्यात दुष्काळानं घाव घातल्यामुळे आता हे सारं बळीराजाच्या जीवावर उठू लागलाय. एका पाठोपाठ एक आत्महत्येच्या घटनांमुळे सरकारच्या धोरणांवर आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे सरकारने तात्काळ आर्थिक मदत देऊन शेतकऱ्याला दुष्काळाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्य़ाची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.