Dharashiv : धाराशिवमध्ये दुष्काळाचं भीषण वास्तव; नोव्हेंबरमध्येच येडोला साठवण तलाव कोरडा, शेतकऱ्यांवर स्थलांतराची वेळ?

Dharashiv Drought News : धाराशिवमध्ये दुष्काळाचे भीषण वास्तव समोर आले आहे. येडोला साठवण तलावातील पाणी पूर्णपणे आटल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई वाढल्यास शेतकऱ्यांवर स्थलांतराची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे.
Dharashiv Drought
Dharashiv DroughtSaam TV
Published On: 

Dharashiv Drought | Dushkal Desha : धाराशिवच्या येडोलामधील साठवण तलाव पूर्णपणे कोरडा पडल्यानं बळीराजाच्या काळजाचा ठोका चुकला आहे. पाण्याअभावी तलावाच्या तळाला पडलेल्या भेगा म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्याला पडलेल्या चिराच जणू...पावसाळा सरून अवघे काही महिने उलटले असतानाच नोव्हेंबरमध्ये ही काळीज पिळवटून टाकणारी वेळ यावी, याहून मोठं दुःख काय असणार... (Dharashiv Drought News, Yedola Reservoir Latest News)

सकाळ समुहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी धाराशिवच्या येडोलामध्ये असलेल्या साठवण तलावाची काय अवस्था झाली याचा ग्राऊंड रिपोर्ट दाखवला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग परिसरात असलेल्या येडोला साठवण तलावाची पाणीपातळी पूर्णपणे खालावली असून तलाव कोरडा पडल्याचे भयावह चित्र यातून दिसत आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच नोव्हेंबर महिन्यात ही स्थिती निर्माण झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे

येडोला साठवण तलावाची पाणी साठवण्याची क्षमता एक दशलक्ष लिटर इतकी असून, या तलावातून साधारणतः ३०० एकर क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या तलावातील मातीला भेगा पडल्या असून पाण्याचा शेवटचा थेंबही सुकताना दिसत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, तलावात उरलेले थोडेफार पाणी मिळावे यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी खड्डा खणला होता, परंतु आता त्या खड्ड्यातील पाणीही पूर्णपणे आटले आहे.

Dharashiv Drought
Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात भयंकर अपघात, कार दरीत कोसळून व्यावसायिकाचा मृत्यू

आगामी काळात संकटाची तीव्रता वाढण्याची शक्यता

नोव्हेंबरमध्येच तलावाने तळ गाठल्यामुळे मे, जून आणि जुलैपर्यंत हीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांसमोर रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आ. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आणि सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Dharashiv Drought
Accident Death : महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर; एकाच कुटुंबातील ९ जणांचा अपघाती मृत्यू, देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.