Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात भयंकर अपघात, कार दरीत कोसळून व्यावसायिकाचा मृत्यू

Businessman Shrinivas Bendkhale Dies : ताम्हिणी घाटात कार खोल दरीत कोसळून रायगडमधील उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांचा मृत्यू झाला. मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनवरून शोधमोहीम राबवण्यात आली. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
Businessman Shrinivas Bendkhale Dies
Businessman Shrinivas Bendkhale DiesSaam TV
Published On: 

सचिन कदम, रायगड प्रतिनिधी

Tamhini Ghat Accident Death : माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात भरधाव कार खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Businessman Shrinivas Bendkhale Dies)

कशी घडली घटना?

श्रीनिवास बेंडखळे हे शनिवारी पहाटेपासून आपल्या कारसह बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांकडून शोध सुरू असताना त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाटातील असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी आणि शोध पथकाने घाटात शोधमोहीम राबवली असता, त्यांची कार खोल दरीत कोसळलेल्या अवस्थेत आढळून आली.

मृतदेह बाहेर काढला; पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि रात्री उशिरा खोल दरीतून बेंडखळे यांचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, कार नेमकी कशी आणि का दरीत कोसळली, या अपघातामागील कारणांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Businessman Shrinivas Bendkhale Dies
Accident Death : महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर; एकाच कुटुंबातील ९ जणांचा अपघाती मृत्यू, देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

आईसोबतचा प्रवास ठरला अखेरचा!

मेहकर-जानेफळ मार्गावर भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. कंचणीचा महाल परिसरात बोलेरो पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात लोणार तालुक्यातील कोयाळी दहातोंडे येथील दत्तात्रय वसुदेव दहातोंडे आणि त्यांची आई रत्नमाला दहातोंडे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना जालना परिसरात दत्तात्रय यांची प्राणज्योत मालवली. तर आई रत्नमाला यांच्यावर जालना येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Businessman Shrinivas Bendkhale Dies
Ramrao Vadkute Passes Away: भाजप खासदार रामराव वडकुतेंचं मध्यरात्री निधन, महाराष्ट्रावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.