जनावरांचा भाव लाखाच्या आतच सांगा, असं व्यापारी म्हणताच या शेतकऱ्यानं जनावरांची विक्री करण्यास नकार दिलाय..दुष्काळी जिल्ह्य़ात सध्या सगळीकडे हीच परिस्थिती पाहायला मिळतेय... दुष्काळामुळे आधीच बळीराजा संकटात सापडलाय..मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळाची दाहकता जसजशी वाढू लागली आहे, तसतसा जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय. पोटच्या लेकरासारखं वाढवलेल्या जनावरांना बाजारात विकायला काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. मात्र, बाजारातही जनावरांची आवक वाढल्यानं आणि खरेदीदार नसल्याने पशुधनाचे दर पार कोसळलेत...
वाशिमध्ये जनावरांच्या बाजारात बैल, म्हशी, गाई मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आलेत..मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना योग्य दरही मिळत नाहीय...ज्यामुळे सरकारनं चारा छावण्या लवकर सुरु कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय...
लातूरच्या बाजारातही जनावरांना योग्य भाव मिळत नसल्याने पशुपालक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय..तर जास्तीच्या पैशांसाठी आता जीवापाड जपलेल्या जनावरांना खाटकाच्या हाती दिल्याशिवाय पर्याय नाही...मात्र तसं आम्ही करणार नाही, असं म्हणत काही शेतकऱ्यांनी व्यथेला वाट मोकळी करून दिलीय
एकीकडे दुष्काळामुळे जनावरांना विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली असताना दुसरीकडे व्यापाऱ्यांकडून भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत कुणीच जनावरं विकत घेत नसल्याची खतं एका व्यापाऱ्यानं व्यक्त केलीय... मात्र ज्या जनावरांना काही महिन्यांपूर्वी लाखांमध्ये भाव मिळायचा, त्याच जनावरांचे दर आता कसं घसरलेत.
दुष्काळाची झळ पशुधन बाजाराला
आधी आता
म्हैस (दु) 1लाख 60 हजार 1 लाख 25 हजार
जर्सी गाय 1 लाख 50 हजार 80 हजार
बैल जोडी 2 लाख 1लाख 50 हजार
बैल 1 लाख 70 हजार
गाय (देवणी)1 लाख 50 हजार 90 हजार
शेळी 4 हजार 4 हजार
बोकड 6 हजार 4 हजार
तरुण आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनी जोडधंदा पशूपालनाचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र दुष्काळामुळे त्यांची स्वप्न जमीनदोस्त झाली आहेत. जनावरांच्या पोटाची खळगी भरता येत नाही, आणि बाजारात भावही मिळत नाही अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडलाय... पिके गेली, पशुधनाचे भाव पडले त्यामुळे आता जगायचे कसे आणि जनावरांना जगवायचे कसे? असं भीषण संकट शेतकऱ्यांपुढे उभं ठाकलंय. त्यामुळे सरकारने आता कागदी घोडे न नाचवता तातडीने चारा छावण्या उभारण्याची मागणी जोर धरू लागलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.