उन्हाचा ताप वाढत चाललाय तसं दुष्काळग्रस्त भागांत पाण्यासाठी लोकांची वणवण वाढलीय.. दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या बीड जिल्ह्यांत तर परिस्थिती अधिक गंभीर झालीय. नद्या-विहीरी कोरड्या पडत चालल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आलेत. मात्र टँकर मधील पाणी पिण्यासाठी वापरता येत नाहीये. कारण हे पाणी क्षारयुक्त आहे. गावांमध्ये शेकडो विहिरी कागदावर मंजूर आहेत, मात्र प्रत्यक्षात एकही विहीर दिसत नाही.
बीडसारखीच परिस्थिती साताऱ्यात आहे. माण, खटाव आणि फलटणमध्येही लोकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय..
केवळ बीड आणि साताराच नव्हे, तर राज्यातील अनेक दुष्काळग्रस्त भागांत पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे. त्यातच उन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळे जलाशयातील पाणीसाठाही कमी होऊ लागलाय. प्रशासनाचे कागदी घोडे आणि अनास्था यामुळे नागरिकांचं जगणं मुश्कील झालंय. विहिरी-योजना फक्त कागदावर मंजूर होत राहतात, मात्र हंडाभर पाण्यासाठी नशिबी येणारी वणवण दुष्काळाच्या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालीये...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.