Dam Water Level : राज्यातील धरणांमधील जलसाठा वाढला, कोणत्या विभागात किती पाणीसाठा? सरकारने दिली आकडेवारी

Maharashtra Dam Water Level : जुलैतील दमदार पावसानंतर महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा ५७ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोकणात सर्वाधिक ७९ टक्के तर पुणे विभागात ७१ टक्के जलसाठा नोंदवला गेला आहे.
Maharashtra dam reservoir water storage after monsoon rains.
Heavy monsoon rains boost water levels in Maharashtra reservoirs.
Published On

Maharashtra dam water storage latest update : जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात संपूर्ण राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालानुसार, राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा ३,०२९ प्रकल्पांमध्ये सध्या ५७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. दुसरीकडे, पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला आणि पानशेत धरणांमध्ये पाण्याचा मोठा साठा जमा झाल्याने पुणेकरांची पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या ३,०२९ प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता १,४२२.१२ टीएमसी आहे. त्यापैकी सध्या ८२७.१० टीएमसी (५७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी आजच्याच तारखेला हा साठा ६५.४७ टक्के इतका होता, म्हणजेच यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे ८ टक्क्यांनी साठा कमी असला, तरी जुलैतील पावसामुळे परिस्थिती वेगाने सुधारत आहे.

Maharashtra dam reservoir water storage after monsoon rains.
उद्धव ठाकरेंना हादरा! ३ जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश, पाहा कोणा-कोणाचा समावेश?

सध्या कोकण आणि घाटमाथा परिसरात पावसाची संतधार सुरू असल्याने येत्या दिवसांत राज्यातील एकंदरीत जलसाठ्यात आणखी मोठी भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकण विभागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तेथील धरणांमध्ये सर्वाधिक ७९ टक्के पाणी जमा झाले आहे. दुसरीकडे, मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर विभाग) आणि विदर्भात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

विभागनिहाय धरणांतील पाणीसाठा (विभाग: टक्केवारी)

नागपूर: ४८ टक्के

अमरावती: ४३ टक्के

छत्रपती संभाजीनगर: २७ टक्के

नाशिक: ६० टक्के

पुणे: ७१ टक्के

कोकण: ७९ टक्के

एकूण: ५७ टक्के

Maharashtra dam reservoir water storage after monsoon rains.
Rain Alert : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! कुठे कोणता अलर्ट? हवामानाचा अंदाज एका क्लिकवर

पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात संतधार; खडकवासला १०० टक्के भरले

पुणे शहर आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २ ते ३ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले असले, तरी जुलै मधील पावसामुळे धरणांनी आपली सरासरी पाणी पातळी गाठली आहे. चारही प्रमुख धरणांमध्ये मिळून सध्या ८९.११ टक्के मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

खडकवासला: १००% (पूर्ण क्षमतेने भरले)

पानशेत: ९४.११%

वरसगाव: ८७.४३%

टेमघर: ७७.७४%

मुख्य खडकवासला धरण १०० टक्के भरल्यामुळे आणि पानशेत धरणही ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असल्याने पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा मोठा प्रश्न तूर्तास सुटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com