उद्धव ठाकरेंना हादरा! ३ जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश, पाहा कोणा-कोणाचा समावेश?

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Shiv Sena : अहिल्यानगर, पुणे आणि नांदेड जिल्ह्यांतील उबाठा गटाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
Eknath Shinde welcomes former UBT Sena leaders into Shiv Sena.
Hundreds of UBT Sena leaders join Eknath Shinde-led Shiv Sena.Eknath Shinde
Published On

Eknath Shinde Uddhav Thackeray Latest News : राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून, अहिल्यानगर, पुणे आणि नांदेड जिल्ह्यांतील उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आज ठाण्यात शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे संबंधित भागात उबाठा गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा असून, मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाकडे होत असलेल्या राजकीय स्थलांतराची ही आणखी एक ठळक नोंद मानली जात आहे.

खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या पुढाकाराने अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे, राधाकिशन बोरकर, राहुल रणधीर, आशिष त्रिभुवन, नेवासाचे उपजिल्हाप्रमुख हरिराम शेळके, नीरज नागरे, पंकज लांभाटे, नितीन जगताप, राहुरीचे डॉ. अजय म्हसे, राजू गुंजाळ, विजय शिरसाट, दीपक पंडित, प्रशांत शिंदे, अकोलेचे महेंद्र धुमाळ, रामहरी तिकांडे, प्रदीप हासे, शिर्डी-राहताचे अनिल बांगरे, सोमनाथ गोरे, विजय मोहोर तसेच कोपरगावचे मुकूंद सिनकर, सचिन मलिक, अशोक पवार यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

Eknath Shinde welcomes former UBT Sena leaders into Shiv Sena.
Ladki Bahin Yojana : जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट अन् तारीख आली समोर

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील उबाठा गटाचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे, भीमराव भोसले, सुधीर पाटील, महादेव सोमवंशी, प्रवीण देवकर तसेच जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांच्या नेतृत्वाखाली गणेश धायगुडे, विजय थिटे, विजयकुमार देवकाते, डॉ. राहुल शंख आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

दौंड विधानसभा मतदारसंघातील दत्तात्रय शितोळे, संपत शिंदे, विजय गुंड, माजी जिल्हाप्रमुख ॲड. राजेंद्र काळे, विश्वास मांढरे, निलेश मदने, शहाजी दळवी, परेश भापकर यांनीही आपल्या समर्थकांसह शिवसेनेची वाट धरली.

Eknath Shinde welcomes former UBT Sena leaders into Shiv Sena.
Rain Alert : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! कुठे कोणता अलर्ट? हवामानाचा अंदाज एका क्लिकवर

नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, विजयकुमार पाटील सुगावकर, संजय रावणगावकर, गणपत पाटील मंडलापूरकर, किरण पाटील धामणगावकर या पंचायत समिती सदस्यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Eknath Shinde welcomes former UBT Sena leaders into Shiv Sena.
शिंदेसेनेत मोठा भूकंप! अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षाचा मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखावर हत्येचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नवागतांचे स्वागत करत, "शिवसेना ही सर्वसामान्यांची आणि विकासाला प्राधान्य देणारी संघटना आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वेच्छेने शिवसेनेत येत आहेत. जनतेचा विश्वास आणि विकासाची भूमिका हीच आमची खरी ताकद आहे," असे सांगितले. यावेळी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, आमदार विजयबापू शिवतारे, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, माजी खासदार आनंद परांजपे, आमदार रवींद्र फाटक, बालाजी पाटील खतगावकर तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com